Parivartan - (परिवर्तन)

Shambhu Patil
Parivartan - (परिवर्तन) Podcast

परिवर्तन जळगाव सांस्कृतीक कार्य करणारी संस्था आहे जगण्याचा कलेच्या माध्यमातून घेतलेला शोध म्हणजे परिवर्तन आहे. परिवर्तनाआधी प्रयत्न असतो आणि प्रयत्नांमधून परिवर्तन होत असत. परिवर्तन ने अनेक भाषिक प्रयोग केलेले आहेत, ते भाषिक प्रयोग मांडण्याचा हे व्यासपीठ आहे.

  1. दंतकथा (Dantakatha)

    11/07/2020

    दंतकथा (Dantakatha)

    परिवर्तन जळगाव निर्मित दंतकथा  मूळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्ला  मराठी रूपांतर : भारत सासणे  अब्दुल बिस्मिल्ला हिंदी साहित्यात मानाच नाव आहे . मुळात मानवी जगण्यांमधील संघर्ष , त्यातली अनिश्चितता , आधुनिक जगण्यामध्ये आलेलं कृत्रिमपण व त्यातली हिंसकता याच दर्शन त्याच्या साहित्या मधून प्रतीत होत असते . ही दंतकथा मनोरंजन करतेच , हसवते , पण अंतर्मुख करते . ही केवळ कोंबड्याची गोष्ट आहे का ?  ऐकून तुम्हीच ठरवा  संकल्पना : डॉ किशोर पवार  दिग्दर्शक  : हर्षल पाटील  निर्मिती प्रमुख ; नीलिमा जैन  नेपथ्य : राजू बाविस्कर  प्रकाश योजना - विशाल कुळकर्णी  वाचक कलावंत : हर्षल पाटील , राहुल निंबाळकर , शीतल पाटील , अक्षय नेहे , हर्षदा पाटील , मोना निंबाळकर .

    42 min
  2. Warren Hastings चा सांड

    26/05/2020

    Warren Hastings चा सांड

    परिवर्तन जळगाव निर्मित वारेन हेस्टिंग चा सांड लेखक : उदय प्रकाश  मराठी अनुवाद; जयप्रकाश सांवत  हिंदी मधील सुप्रसिद्ध लेखक उदयप्रकाश यांचा गाजलेला कथासंग्रह म्हणजे तिरिछ व इतर कथा , या संग्रहांमधील वारेन हेस्टिंगचा सांड या कथेच हे अभिवाचन . वारेन हेस्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता , इतिहास ही गुंतागुंतीची गोष्ट आहे . ती समकालीन असतेच पण आजच्या वास्तवाशी पण मिळती जुळती असते . ही कथा म्हणजे इतिहास नाही पण ती केवळ गोष्टही नाही . कारण इतिहास निरंतर आहे . वारेन हेस्टिंगचा सांड  अभिवाचन संहिता :शंभु पाटील संकल्पना : विजय जैन दिगदर्शन : नारायण बाविस्कर  नेपथ्य व प्रकाश : राहुल निंबाळकर  कलावंत : नारायण बाविस्कर, अंजली हांडे, उदय सपकाळे,मंगेश कुळकर्णी,  चंद्रकांत इंगळे, मिलिंद जंगम, हर्षदा कोल्हटकर आणी हर्षल पाटील

    59 min
  3. पालखी : दि.बा.मोकाशी

    15/05/2020

    पालखी : दि.बा.मोकाशी

    परिवर्तन निर्मित पालखी : लेखक : दि.बा.मोकाशी   महाराष्ट्राची ओळख असलेली वारकरी परंपरा , लाखो लोक पायी वारीला जातात . काय असते ही वारी ..... दी .बा . मोकाशी मराठी साहित्यातील एक मोठं नाव , मोकाशींच्या या  पालखीला परिवर्तनच्या वारकऱ्यांनी खांद्यावर घेतले आहे .  अभिवाचन संहिता : शंभू पाटील  संकल्पना : राहुल निंबाळकर  दिग्दर्शक : पुरुषोत्तम चौधरी  निर्मिती प्रमुख : प्रतिक्षा कल्पराज , वसंत गायकवाड  गायक : निखिल क्षीरसागर, तबला : भूषण गुरव , हार्मोनियम : सुयोग गुरव , साथसंगत : मनीष गुरव  वाचक कलावंत : होरीलसिंग राजपूत ,  रश्मी कुरमभट्टी , प्रीती झारे , अभिजित पाटील व हर्षल पाटील

    1h 17m
  4. गालिब और मै

    14/04/2020

    गालिब और मै

    गालीब उर्दू शायरी मधला सर्वोच्च बिंदू ,  जगप्रसिद्ध असलेल्या या शायरचा शोध घेण्याचा प्रयत्न परिवर्तनने केला आहे . परिवर्तन अभिवाचन महोत्सवा मधील हा कार्यक्रम खास तुमच्या साठी गझलचा  गाढा अभ्यास असणारे दिलीप पांढरपट्टे सर यांच्या कडून गालीब समजून घेणं हा सुंदर अनुभव आहे . दिलीप पांढरपट्टे सर आता महाराष्ट्र राज्याचे माहिती संचालक आहेत . परिवर्तन जळगाव निर्मित  गालीब और मै  महान शायर गालीब यांचा शोध  संकल्पना  : शंभु पाटील  सादरकर्ते  : दिलीप पांढरपट्टे  सहाय्य     :संगिता म्हसकर  तंत्र सहाय्य : राहुल निंबाळकर  निर्मिती प्रमुख : पुरुषोत्तम चौधरी , होरीलसिंग राजपूत

    1h 22m
  5. प्रेमातून प्रेमाकडे

    10/04/2020

    प्रेमातून प्रेमाकडे

    प्रेमातून प्रेमाकडे  अरुणा ढेरे या मराठी मधील संवेदनशील लेखीका आहेत . प्रेम मानवी भावनांचा सर्वोच्च बिंदू आहे .  प्रेम व्यापक संकल्पना आहे . स्त्री , पुरुष प्रेम  ते देखील जगप्रसिद्ध स्त्री पुरुषांच्या प्रेमाचा अविष्कार अरुणा ढेरे यांच्या  'प्रेमातून प्रेमाकडे' या पुस्तकात बघायला मिळतो . या पुस्तकामधील  'टागोर व व्हिक्टोरीया' यांच्या प्रेमाचा शोध परिवर्तन जळगाव निर्मित  अभिवाचना मधून घेतला आहे. संकल्पना शंभु पाटील लेखिका अरुणा ढेरे  दिगदर्शिका मंजुषा भिडे  तंत्र सहाय्य राहुल निंबाळकर  निर्मिती प्रमुख ; मंगेश कुळकर्णी  व संदीप केदार  वाचन  हर्षल पाटील , मानसी जोशी ,  श्रिया सरकार , आर्या शेंदूरणीकर , व अनिल पाटकर .

    28 min

About

परिवर्तन जळगाव सांस्कृतीक कार्य करणारी संस्था आहे जगण्याचा कलेच्या माध्यमातून घेतलेला शोध म्हणजे परिवर्तन आहे. परिवर्तनाआधी प्रयत्न असतो आणि प्रयत्नांमधून परिवर्तन होत असत. परिवर्तन ने अनेक भाषिक प्रयोग केलेले आहेत, ते भाषिक प्रयोग मांडण्याचा हे व्यासपीठ आहे.

To listen to explicit episodes, sign in.

Stay up to date with this show

Sign in or sign up to follow shows, save episodes and get the latest updates.

Select a country or region

Africa, Middle East, and India

Asia Pacific

Europe

Latin America and the Caribbean

The United States and Canada