1 episode

Life with Values

Adarsh Voice Adarsh News

    • Entrepreneurship

Life with Values

    जगणे धावपळीचे

    जगणे धावपळीचे

    जगण धावपळीचे
    आजचे युग म्हणजे स्पर्धेचे युग धावपळीचे युग मानले जाते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिवन जगण्यासाठी रोजच नवा संघर्ष करावा लागतो .रोजच नव नवीन समस्या समोर येतात त्या सोडवता सोडवताच जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो येथेच डार्विनच्या सर्वायवल ऑफ फिटेस्ट या सिद्धांताची प्रचीती होते. जो शक्तीशाली आहे तोच पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवेल आणि जो कमजोर आहे त्याचेअस्तित्व संपुष्टात येईल हाच हा सिद्धांत सांगतो. पण जर आपण एक माणूस म्हणून या सर्वांकडे पाहिले तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते हे धावपळीचे जगणे ही निसर्गाची देणगी नाही . निसर्गाने निसर्गात जगण्यासाठी इतर प्राण्यांप्रमाणेच मानवाला देखील आरोग्यमय नैसर्गिक वातावरण पर्यावरण दिले होते आणि आहे सुद्धा. मानवाला इतर प्राण्यांपेक्षा एक वरदान म्हणून मिळालेली गोष्ट म्हणजे त्याची बुद्धी परंतु हेच वरदान मानवाच्या अनेक प्रकारच्या लालसे पोटी कधी अचानक श्राप म्हणून मानवाचा काळ होत आहे हे समजलेच नाही. बुद्धीच्या जोरावर मानवाने अनेक प्रकारचा विकास केला त्यात सामाजिक, भौतिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, राजकीय, आर्थिक असे सर्वच क्षेत्र आहेत . हा विकास करत असताना मानवाचा विशेष कल हा भौतिक सुख सुविधा निर्माण करण्याकडे होता. या सुख-सुविधा मिळवण्याच्या नादातच मानव निसर्गापासून दुर होत गेला. अध्यात्मापासून दुर गेला. निसर्गाला आपल्या स्वार्थासाठी भौतिक सुखासाठी हानी पोहचवू लागला . मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गचक्र ढासळले. यामुळेच पर्यावरण ही बदलले. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या. वाढती लोकसंख्या यासारख्या समस्या मुळे बेरोजगारी.आणि बेरोजगारी मुळे आयुष्य जगण्यासाठी अस

    • 3 min