413 episodes

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Sports कट्ट‪ा‬ Bingepods

    • Sport

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    MPL review: How Ratnagiri Jets defended their MPL title?

    MPL review: How Ratnagiri Jets defended their MPL title?

    Ratnagiri Jets defended their MPL 2023 title in style. But what is the secret recipe behind Azim Kazi and his team's success? Maharashtra Cricket Association successfully conducted the Maharashtra Premier League for the second consecutive year and they deserve credit for that. The MCA can take a lot of positives from the tournament but certain areas will need working on. Who makes Sports Katta's team of the tournament? Amol Gokhale reviews the MPL 2024 on Weekly Katta...

    अझीम काझीच्या रत्नागिरी जेट्सने MPL २०२४ चं विजेतेपद दिमाखात जिंकलं. रत्नागिरी संघाच्या यशाचं नक्की काय गमक आहे कि त्यांनी २०२३ मध्ये जिंकलेलं विजेतेपद २०२४मध्ये कायम राखलं? MPL सलग दुसऱ्या वर्षी होणं हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं खूप मोठं यश आहे. ह्या स्पर्धेच्या सकारात्मक गोष्टी कुठल्या? कुठल्या गोष्टी अजून चांगल्या होऊ शकतात आणि मुख्य म्हणजे IPLच्या धर्तीवर MPL हे महाराष्ट्रासाठी नवीन खेळाडू तयार करायचं व्यासपीठ होऊ शकतं का? MPL २०२४ चा आढावा घेतला आहे अमोल गोखलेने वीकली कट्ट्यावर...

    • 14 min
    Meet Devieka Palshikar, from a girl next door to a leading women's cricket coach

    Meet Devieka Palshikar, from a girl next door to a leading women's cricket coach

    She may have started playing gully cricket in the bylanes of Pune when she was eight years old but only discovered girls could play leather-ball cricket only after turning 18. Not only did she represent India as an allrounder but Devieka Palshikar has also emerged as one of the prominent women's cricket coaches in India. A bespectacled Devieka narrates her journey in a freewheeling chat with Amol Gokhale on "Kattyawarchya Gappa"  

    तिने आठव्या वर्षी टेनिस बॉलवर गल्ली क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण १८ व्या वर्षापर्यंत मुलीदेखील 'लेदर बॉल' क्रिकेट खेळतात याची तिला कल्पनाच नव्हती. तिथून त्यांनी महाराष्ट्र, एअर इंडिया, आसाम आणि भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आणि आज त्या महिला क्रिकेटमधील एक अग्रगण्य प्रशिक्षक आहेत. पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये संस्मरणीय पदार्पणाच्या त्यांच्या काय आठवणी आहेत? रेल्वेमधून किटबॅगवर झोपत साध्या तिकिटांवर प्रवास ते ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये पुरेश्या थंडीच्या कपड्यांअभावी क्रिकेट खेळणं हे दिवसदेखील त्यांनी बघितले. प्रशिक्षक म्हणून आसाम, मुंबई, भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंबरोबर काम करतानाचा काय अनुभव होता? अमेरिकेत क्रिकेटमध्ये काम करताना कुठल्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं आणि तिथलं स्थानिक क्रिकेट कसं आहे? मुंबई इंडियन्स भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक संघ का आहे? या व भारतीय महिला क्रिकेटमधील विविध विषयांवर अमोल गोखलेबरोबर दिलखुलास 'कट्ट्यावरच्या गप्पा' मारल्या आहेत देविका पळशीकर यांनी

    • 1 hr 31 min
    Early exit for England and Pakistan?

    Early exit for England and Pakistan?

    Team India handed their arch-rivals Pakistan their second successive defeat of the 2024 T20 World Cup on Sunday night. That leaves the 2022 World Cup finalists on the brink of early exit from the mega event in the USA and West Indies. The defending champions England too face the similar fate after Scotland thrashed Oman. Will see see both finalists of the 2022 T20 World Cup make at early exit? Halfway through the league stage, Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, discuss the possiblities

    • 36 min
    Can out of form Pakistan surprise in-form India in T20 World Cup?

    Can out of form Pakistan surprise in-form India in T20 World Cup?

    It's India vs Pakistan! Again! But is there enough buzz around the mother of all cricket rivalries returning after seven months? Or is it going to be a no-contest, considering an in-form India pitted against Pakistan, who lost to minnows USA earlier in the week. Will the T20 World Cup match in New York live up to its billing? Or will the lopsided conditions on a drop-down pitch emerge as the decisive factor? Will Virat Kohli be the king yet again or will Rishabh Pant at No 3 turn out to be India's masterstroke? Watch Aditya Joshi (https://x.com/aditya1387) and Amol Karhadkar (https://x.com/karhacter), The Hindu's sports journalist, discuss it in a special episode and tell us who is your favourite for Sunday night.भारत विरुद्ध पाकिस्तान! पुन्हा एकदा! पण सात महिन्यांनंतर परतणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात कट्टर सामन्याबद्दल पुरेशी चर्चा आहे? किंवाअमेरिकेकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानविरुद्ध भारताचा फॉर्मात असलेला संघ लक्षात घेता ही स्पर्धा नो-कॉन्टेस्ट असणार आहे? न्यूयॉर्कमधील T२० विश्वचषक सामना त्याच्या बिलिंगनुसार होईल का? किंवा ड्रॉप-डाउन खेळपट्टी निर्णायक घटक म्हणून उदयास येईल? विराट कोहली पुन्हा राजा होईल, का तिसऱ्या क्रमांकावर असलेला ऋषभ पंत भारताचा मास्टरस्ट्रोक ठरेल? पहा आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर, द हिंदूचे स्पोर्ट्स जर्नलिस्ट, एका खास एपिसोडमध्ये करत असलेली चर्चा आणि रविवारी रात्रीबद्दल तुमचं प्रेडिक्शन सांगा आम्हाला

    • 16 min
    Off-spinner & Left-arm spinner: Siddharth Mhatre's ambidextrous tale

    Off-spinner & Left-arm spinner: Siddharth Mhatre's ambidextrous tale

    Siddharth Mhatre is naturally right-handed. His father is a big Brian Lara fan. So, when Siddharth started batting at 3, his father taught him how to bat left-handed. Now he is an elegant south-paw batter. Similarly, he is naturally an off-spinner. But one day when there were no left-arm spinners in his college nets, he tried his hand at bowling left-arm spin and bowled fairly well. Seeing his accuracy, his coach encouraged him to bowl left-arm spin. Today, looking at the batter in front, Siddharth can seamlessly switch between bowling off-spin and left-arm orthodox spin. He grew up in Uran in Raigad district. The proximity to Mumbai led him to play most of his age-group cricket in Mumbai but he never really got an opportunity in Mumbai’s ultra-competitive environment. He moved to Maharashtra and had an impressive 2023 Maharashtra Premier League (MPL). He even made his debut for the state in all three formats last season. On the eve of MPL 2024, Siddharth shares his journey on Kattyawarchya Gappa with Amol Gokhale…

    सिद्धार्थ म्हात्रेने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात घेतली ती उजव्या हातात... पण वडिलांनी त्यांना ब्रायन लारा आवडतो म्हणून सिद्धार्थला डावखुरी फलंदाजी शिकवली. तो गोलंदाजी देखील उजव्या हाताने करायचा. तो ऑफस्पिन टाकतो. पण एक दिवस कॉलेजच्या नेट्समध्ये कोणी डावखुरा फिरकी गोलंदाज आला नव्हता म्हणून ह्याने डावखुरी गोलंदाजी देखील करुन बघितली आणि ती जमली देखील... एकदा डावखुरी गोलंदाजी जमतेय म्हटल्यावर त्याने त्यावरच लक्ष केंद्रित केलं आणि आता तो सहजतेने समोरचा फलंदाज कोण आहे ते बघून दोन्ही हाताने गोलंदाजी करतो. सिद्धार्थ मूळचा रायगड जिल्ह्यातल्या उरणचा; मुंबईत बरंच क्रिकेट खेळला पण योग्य संधी मिळाली नाही म्हणून महाराष्ट्राकडे आला आणि इथे येऊन त्याने संधीचं सोनं केलं. २०२३ महाराष्ट्र प्रिमियर लीगमध्ये (MPL) त्याने आपल्या कामगिरीने छाप सोडली आणि गेल्या हंगामात महाराष्ट्रासाठी तिन्ही प्रकारात पदार्पण केलं... २०२४ MPLच्या पूर्वसंध्येला त्याने अमोल गोखलेबरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपला प्रवास उलगडला आहे...

    • 32 min
    T20 World Cup: Cricket's American Dream

    T20 World Cup: Cricket's American Dream

    The United States of America and the West Indies are the co-hosts of the 2024 T20 World Cup. The USA will host only eight games out of 43 in this World Cup, but one can feel that the entire tournament is happening in the States. However, cricket needs the USA more than the other way around. What financial windfall will cricket see with those eight games and how do they compare to other ‘American sports?’ What does this event mean with Los Angeles set to host the 2028 Olympics, which will see cricket at the summer Olympics. For the first time, 20 teams are participating in the World Cup, a new record for the sport. The fate of India and Pakistan will drive the success or failure of this mega event. However, these two subcontinental giants are not the only teams in the fray. England are the defending champions and are placed in the same group as ODI World Cup winners Australia. Hosts West Indies are in the same group as New Zealand and Afghanistan. Sri Lanka, Bangladesh, South Africa and the Netherlands are in the same group. Who are the favourites for the title? Amol Gokhale, Aditya Joshi and The Hindu’s sports journalist Amol Karhadkar take a look at various aspects of the 2024 T20 World Cup on Weekly Katta…

    २०२४ T२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. ४३ पैकी केवळ ८ सामने हे अमेरिकेत आहेत पण चर्चा मात्र अमेरिकेत T२० वर्ल्ड कप अशी चालू आहे. अमेरिकेत T२० वर्ल्ड कप घेण्यामागे अमेरिकेला क्रिकेटची ओळख होईल ह्यापेक्षा क्रिकेटला अमेरिकेची ओळख झाल्याचा फायदा अधिक आहे. ह्यामागची आर्थिक गणितं काय आहेत? अमेरिकेमधील क्रिकेटचं 'मार्केट' काय आहे? २०२८ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश आहे, त्यासाठी हा विश्वचषक किती महत्त्वाचा आहे? अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या कामगिरीवर संपूर्ण स्पर्धेचं यशापयश ठरणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच तब्बल २० संघ सहभागी होणार आहेत.  गतविजेते इंग्लंड, एकदिवसीय विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलिया, यजमान वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे देखील विजेतेपदासाठी दावेदार संघ आहेत. वीकली कट्ट्यावर अमेरिकेतल्या ह्या वर्ल्ड कपविषयी चर्चा केली आहे अमोल गोखले, आदित्य जोशी आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने...

    • 26 min

Top Podcasts In Sport

The Rest Is Football
Goalhanger Podcasts
ESPN FC
ESPN
The MeatEater Podcast
MeatEater
Thinking Basketball
Thinking Basketball
Football Weekly
The Guardian
The Mismatch
The Ringer

More by Ideabrew Studios

The Punekar Podcast
Ideabrew Studios
MXM Cast
Ideabrew Studios
The RK Show
Ideabrew Studios
All Indians Matter
Ideabrew Studios