सोपी गोष्ट

BBC Marathi Audio
Podcast “सोपी गोष्ट”

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

  1. 20 SEPT

    प्रेग्नन्सीदरम्यान बदलतो मेंदू, संशोधनातून झालं सिद्ध | BBC News Marathi

    प्रेग्नन्सीच्या काळात विसराळूपणा वाढणं, गोंधळ होणं, अचानक ब्लँक होणं असं झाल्यास त्याला प्रेग्नन्सी ब्रेन किंवा बेबी ब्रेन म्हटलं जातं. पण ही फक्त एक संकल्पना नसून प्रेग्नन्सीच्या काळात मेंदूत खरंच बदल होतात, हे आता अभ्यासातून समोर आलंय. गर्भार राहण्यापूर्वी, गरोदरपणाच्या 9 महिन्यांच्या काळात आणि त्यानंतर मेंदूमध्ये काय बदल होतात याचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे बदल दिसून आले. समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

    5 min
  2. 19 SEPT

    हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठीचं 'मिशन मौसम' काय आहे? BBC News Marathi

    11 सप्टेंबरला कॅबिनेटने मिशन मौसम नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल. यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. Ministry of Earth Science - म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. India Meteorological Department (IMD) म्हणजेच हवामान खातं, National Centre for Medium Range Weather Forecasting म्हणजे शेतीसाठी फायदयाचा मध्यम पल्ल्याचा राष्ट्रीय हवामान अंदाज मांडणारी संस्था आणि Indian Institute of Tropical Meteorology (IITM) म्हणजे भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विज्ञान संस्थान या तीन संस्थांमध्ये हवामान अभ्यासासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान या मिशन मौसमद्वारे आधुनिक करण्यात येईल. लेखन, निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  3. 19 SEPT

    GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

    उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील. कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं. काय आहे GNSS ...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

    5 min

Información

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Inicia sesión para escuchar episodios explícitos.

No te pierdas nada de este programa

Inicia sesión o regístrate para seguir programas, guardar episodios y conocer las últimas novedades.

Selecciona un país o una región

África, Oriente Medio e India

Asia-Pacífico

Europa

América Latina y el Caribe

Estados Unidos y Canadá