56 episodes

आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast

ज्ञानभारती मराठी पॉडकास्‪ट‬ Kishore Kulkarni

    • News

आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast

    Shridharji Phadke Birthday Episoe

    Shridharji Phadke Birthday Episoe

    Full

    • 10 min
    सेवा सदन संस्था परिचय

    सेवा सदन संस्था परिचय

    सेवा सदनचे श्रीयुत नितीन लेले यांची जयश्री पटवर्धन अर्थात आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत...
    आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

    • 18 min
    Dr. Shankarrao Magar Interview

    Dr. Shankarrao Magar Interview

    कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शंकरराव मगर यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत अत्यंत अभ्यासपूर्ण कृषी क्षेत्रातील भविष्य कृषी क्षेत्रातला डॉक्टर मगर यांचा दीर्घ अनुभव अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलाखतीत मांडण्यात आलेले आहेत आपल्या प्रतिक्रिया 9422776759 फोनवर अवश्य द्यावे

    • 39 min
    स्वेटर्स विणून 18000 जणांना मायेची ऊब देणार्‍या चौघुले आज्जी

    स्वेटर्स विणून 18000 जणांना मायेची ऊब देणार्‍या चौघुले आज्जी

    जळगाव येथील पत्रकार कॉलनीत राहणार्‍या मृणालिनी विजय चौघुले यांनी 28 वर्षात 18000 हजार स्वेटर विणून अनाथ बालकांना भेट दिले... या ईश्वर कार्याबद्दल मुलाखत

    • 9 min
    DnyanBharati Marathi Podcast 51 episode

    DnyanBharati Marathi Podcast 51 episode

    ज्ञान भारती मराठी पॉडकास्टचा 51 वा भाग सुप्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.खास लेख

    *मुलांसाठी शब्दांची नवलाई लिहिणारे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड...*

    खानदेशातील जळगाव येथील जैन इरिगेशनच्या कांताई हॉलमध्ये सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे ७ व ८ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कारही मिळाला; त्या निमित्ताने आव्हाड यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट होय. त्यांच्या लेखन प्रवासाबाबत त्यांच्याशी जळगाव येथील सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी खास गप्पा मारल्या. अत्यंत प्रेरक व बालसाहित्यातून शिशुगट ते कुमारगटातील मुलांवर उत्तम असे वाचन संस्कार या मुलाखतीमुळे होऊ शकतात म्हणून खास वाचकांसाठी...

    एका चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेलं असतं. तो चित्रकार चित्रात रंगसंगती अफलातून वापरत असतो. अनेक लोक, रसिक त्या चित्रकाराचं प्रदर्शन बघायला येतात. चित्रांचे प्रदर्शन बघायला एक पत्रकार महिला देखील येते. ती चित्रकाराला विचारते, 'तुमची चित्र आकर्षक सुंदर आहेतच पण त्यातली रंगसंगती अधिक आकर्षित करून घेणारी आहे. फारच वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे.तुम्ही कोणत्या रंगात कोणता रंग मिसळता की त्यातून एक वेगळाच रंग तयार होतो.जो मनाला आकर्षित करतो. या प्रश्नावर तो चित्रकार पत्रकार महिलेकडे पाहून हसला आणि म्हणाला, 'मुली, मी असं ठरवत नाही की अमुक रंगात तमुक रंग मिसळायचा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळ

    • 20 min
    DnyanBharati Marathi Podcast 50 episode

    DnyanBharati Marathi Podcast 50 episode

    श्रोते हो, आपल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळवणारे डॉक्टर राजस नित्सुरे यांची आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत. ज्ञानभारती मराठी पॉडकास्टचा हा 50 वा म्हणजेच सुवर्णमहोत्सवी भाग! आपण सर्व श्रोत्यांनी या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपलं ऋणी व्यक्त करतो. येणाऱ्या कोणत्या तरी एखाद्या शनिवारच्या भागात झालेल्या या 50 एपिसोडस् चा एक छोटासा आढावा आम्ही घेणार आहोत. येणाऱ्या या भागाकडे आपण नक्की लक्ष द्या...आढावा घेतलेला एपिसोड अपलोड झाल्यावर आपल्याला ते कळेलच परंतु; या सुवर्णमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या एपिसोडमध्ये आम्ही काही प्रमाणावर ती बदल करणार आहोत... उदाहरणार्थ आम्ही 'ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट'चा युट्युब एपिसोड याकडे देखील आता लक्ष देणार आहोत. युट्युब चॅनेल आणि हे ऑडिओ चॅनल या दोन्ही माध्यमातून आपल्या पर्यंत आम्ही पोहोचणार आहोतच, असेच प्रेम कायम असू द्या. काही सूचना काही एपिसोडच्या बाबतीमध्ये आपलं मत प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद! किशोर कुळकर्णी, ज्ञानभारती पॉडकास्टर 9422776759

    • 34 min

Top Podcasts In News

Global News Podcast
BBC World Service
The Morning Brief
The Economic Times
3 Things
Express Audio
ThePrint
ThePrint
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
Daybreak
The Ken