150 episodes

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more.

Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free.

स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast foru‪m‬ Storytel India

  • Books
  • 4.3 • 15 Ratings

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more.

Also Storytel Selects where you can hear some stories and parts of new Originals for free.

स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

  गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

  गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

  जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहेत... याशिवाय तिचा आवाजाच्या विश्वातील प्रवासही तिनं उलगडून दाखवलाय... स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी मेघनाला बोलतं केलं आहे, तेव्हा चुकूनही चुकवू नका हा कट्टा!या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.मेघना एरंडेची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/search-meghana+erandeसिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 48 min
  चाणक्य समजून घेताना...देताना!

  चाणक्य समजून घेताना...देताना!

  एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका.या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillaiसिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 1 hr 7 min
  तुम्ही मिलेनियल्स आहात?

  तुम्ही मिलेनियल्स आहात?

  मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जनरेशन वाय’ या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह यांच्यासमवेतचा हा आगळा संवाद.'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpandeसिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 56 min
  'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

  'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

  नाथमाधव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्यावर जाणून घेतला आहे... तेव्हा चुकवू नये असा पॉडकास्ट नक्की ऐका!याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!वीरधवल ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/books/1265052-Veerdhawal सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 44 min
  मराठीकारण

  मराठीकारण

  मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता ‘मराठीकारण’ म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव.'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpandeसिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 1 hr 36 min
  क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...

  क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...

  स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा सिरीजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला... क्राईम थ्रिलर कशा लिहाव्यात याच विषयावर स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने निरंजन मेढेकर आणि योगेश शेजवलकर यांच्याशी संवाद साधला आहे... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!निरंजन मेढेकरच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/search-niranjan+medhekarयोगेश शेजवलकरच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/authors/186359-Yogesh-Shejwalkarसिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

  • 48 min

Customer Reviews

4.3 out of 5
15 Ratings

15 Ratings

RahulECT ,

No audiobooks at all

I searched lot but did not found any audiobook here.... disappointing

y2k156 ,

A nice Marathi podcast

Really enjoy some episodes a lot!

Top Podcasts In Books

Listeners Also Subscribed To