20分

DnyanBharati Marathi Podcast 51 episode ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट

    • ビジネスニュース

ज्ञान भारती मराठी पॉडकास्टचा 51 वा भाग सुप्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.खास लेख

*मुलांसाठी शब्दांची नवलाई लिहिणारे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड...*

खानदेशातील जळगाव येथील जैन इरिगेशनच्या कांताई हॉलमध्ये सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे ७ व ८ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कारही मिळाला; त्या निमित्ताने आव्हाड यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट होय. त्यांच्या लेखन प्रवासाबाबत त्यांच्याशी जळगाव येथील सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी खास गप्पा मारल्या. अत्यंत प्रेरक व बालसाहित्यातून शिशुगट ते कुमारगटातील मुलांवर उत्तम असे वाचन संस्कार या मुलाखतीमुळे होऊ शकतात म्हणून खास वाचकांसाठी...

एका चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेलं असतं. तो चित्रकार चित्रात रंगसंगती अफलातून वापरत असतो. अनेक लोक, रसिक त्या चित्रकाराचं प्रदर्शन बघायला येतात. चित्रांचे प्रदर्शन बघायला एक पत्रकार महिला देखील येते. ती चित्रकाराला विचारते, 'तुमची चित्र आकर्षक सुंदर आहेतच पण त्यातली रंगसंगती अधिक आकर्षित करून घेणारी आहे. फारच वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे.तुम्ही कोणत्या रंगात कोणता रंग मिसळता की त्यातून एक वेगळाच रंग तयार होतो.जो मनाला आकर्षित करतो. या प्रश्नावर तो चित्रकार पत्रकार महिलेकडे पाहून हसला आणि म्हणाला, 'मुली, मी असं ठरवत नाही की अमुक रंगात तमुक रंग मिसळायचा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळ