8 episodes

Real life poem with short story in Marathi .

Jyoti Sakpal Jyoti Sakpal

    • Society & Culture

Real life poem with short story in Marathi .

    Fathers day

    Fathers day

    चाहूल  लागताच  नव्या  पाहुण्याची तो आनंदाने  नाचतो 
    रोज नवीन नवीन स्वप्नांची सांगड  घालत असतो
    मुलगा झाला तर अस करेन, मुलगी  झाली तर तसं करेन म्हणतं असतो.
    ते  नऊ  महिने  त्याच्या  स्वप्नात   त्याचा  चेहरा तो बनवत  असतो

    आतुरता  त्याला हि आई  एवढीच  असते
    डोळ्यात  पाणी  त्याच्याही दाटून येत  असते
    स्पर्श होता त्याचा  तो सर्व दुःख  विसरतो 
    जगण्यासाठी त्याला आता नवा मार्ग  मिळतो.

    आई  ऐवढीच  त्यालाही काळजी खूप असते
    बाप  म्हणून  जबाबदारीची  जाणीवहि असते 
    वेळ  देता येत  नाही म्हणून  चीड चीड त्याची होते 
    भविष्याची त्याच्या तरतूद  त्याची  चालू  असते
    अस्तित्व  त्याचहि  आई  एवढेच  असते
    बाप  म्हणून  मिरवताना  त्याला खूप आवडते 
    कठोर  शद्बातहि त्याच्या माया खूप असते. 
    कधी   बाप तर कधी  मित्र  म्हणून त्याची  ओळख असते . 

    • 1 min
    आयुष्यावर बोलून काही

    आयुष्यावर बोलून काही

    आयुष्य  म्हणजे  पाणी , प्रवाह  मिळेल तसं वाहवत  जाणार ,  कधी न थांबणार. 

    आयुष्य म्हणजे शाळा , शेवट  पर्यन्त  शिकत  राहायच,  प्रत्येक  वळणावर  परीक्षा  देत राहायच.

    आयुष्य म्हणजे चांगले  तर कधी वाईट  अनुभव  घेते राहायचे,  आणि दुसर्यांनाही  देत राहायचे. 


    आयुष्यावर बोलू काही
    प्रवाहाबरोबर  वाहवत जाई 
    कधी शांत तर कधी खळखळ 
    आयुष्यावर  बोलू काही

    अशी शाळा  ज्याला वर्गच  नाही
    परीक्षा  मात्र रोजच होई 
    आयुष्यावर  बोलू काही


    अनुभव  याचा खूप निराळा 
    कधी चेहऱ्यावर  हसू येई 
    कधी अश्रूंची फुले होई 
    आयुष्यावर  बोलू काही. 

    आयुष्य  हे असं जगावं 
    मेल्यावरही जिवंत  राहावं 
    आयुष्याने  पुन्हा म्हणावं  
    आयुष्यावर  बोलू काही,  आयुष्यावर  बोलू काही. 




    मला वाटत  आयुष्य असं जगावं कि मेल्यावरही  जिवंत राहाव.
    मिळालेल्या  सर्व अनुभवातून शिकून  पुढे  जाण्याचा  प्रयत्न  करत राहायचे , कधी कोणाचा  अपमान  होणार नाही याची काळजी घ्यायची,  आपल्याकडे जे आहे त्यातून जमत असेल तर दुसऱ्यांना मदत करायची.  प्रवास  हा खडतर  आहे, आणि तोच कसा सुखकर होईल त्याचा सतत प्रयत्न  करत  राहायचे . 

    • 1 min
    सावराया तूच आहे

    सावराया तूच आहे

    तुला असं काय द्यावं
    मनात  कायमच  कसं राहावं

    तुझ्या दिसण्याने मी फुलावं
    तुझ्या नसण्याने मी मावळावं

    तूला मी म्हणावं माझ्या चंद्र  पाखरा
    रात्रीने ही सांगावं नाही कुणी तुझ्या सारखा

    हृदयाच्या त्या कुपीत तुला असे लपवावे
    जसे  कस्तुरी मृगाने  कस्तुरीला जपावे

    तू लांब जरी  माझ्या तरी  मी तुझीच  आहे
    मी एकटीच तरीही वाटतं सवराया तूच आहे.

    • 48 sec
    सांगावं तर लागेल ना

    सांगावं तर लागेल ना

    उशीरा  का होईना 
    सांगाव  तर लागेल ना 

    रत्न  पारखी  त्या डोळ्यांना 
    बोलावं  तर  लागेल  ना 

    रिमझीम  पडणाऱ्या  सरींना
    अंगावर  हळुवार झेलताना

    मनातल्या  तुझ्या  वादळाना
    तूला  थांबवाव तर  लागेल  ना 

    डोळ्यांना  समजलेल्या  भावनांना 
    शेवटी  शब्दात  मांडाव  तर  लागेल  ना .

    • 38 sec
    कणभर आयुष्यात

    कणभर आयुष्यात

    थेंब  थेंब  साचुन  डबके  भरत  होते 
    डोळ्यातल्या पाण्याचेही  असेच  काहीसे  असते
    शब्द  शब्द  लागून  मन भरत असते
    अश्रू बनून  मग  ते डोळ्यातून वाहत  असते

    हसवणारे प्रवासात हसवून  जात असतात
    जगण्यासाठी  वाटतं तेच  क्षण  पुरेसे असतात
    कणभर  आयुष्यात मनभर  अपेक्षा असतात
    जे प्रवासात एकटं सोडून गेले ते आपले कधीच नसतात

    • 52 sec
    एक लाट अशी

    एक लाट अशी

    बेधुंद मनाची लहर , लहरींच्या होती लाटा
    लाटा या झेलतांना  दुःखांना फुटली फाटा
    दुःखाच्या या वळणावरती मी नेहमीच एकटी आहे ,
    कधी स्वतःला धडपडताना बघत आहे
    तर कधी स्वतःच स्वतःला सावरून घेत आहे,
    अनुभवाच्या आलेखाने एक गोष्ट शिकवली
    भूक लागल्यावर पाण्याने मात्र भूक वीजवली.
    आपले  म्हणावे  असे  कोणीच  या  जगात  नसते ,
      लहरींच्या  या  लाटेवरती  फक्त फसवे  जग  वसते .

    • 1 min

Top Podcasts In Society & Culture

Fryktløs
Både Og & Blåkläder
Svarttrost Dok
Svarttrost
Grenseløs
BATONG MEDIA og Bauer Media
Hele historien
NRK
198 Land med Einar Tørnquist
PLAN-B & Acast
Morten
VGTV