1 episode

मला भावलेल्या कविता

KrutiKavya Krutika Shantaram Deore

    • Music

मला भावलेल्या कविता

    Kana Marathi Kavita।कणा मराठी कविता।। कुसुमाग्रज।kusumagraj।Krutika Deore।Poems

    Kana Marathi Kavita।कणा मराठी कविता।। कुसुमाग्रज।kusumagraj।Krutika Deore।Poems

    फक्त लढ म्हणा(कणा) हि वि.वा. शिरवाडकर यांची एक अतिशय लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता आहे. कणा
    ‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
    कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
    क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
    ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
    माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
    मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
    भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
    प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
    कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
    पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
    खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
    ‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
    मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
    पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

    • 2 min

Top Podcasts In Music

Djy Jaivane
Djy Jaivane
The Bishops_sd Podcast
The Bishops
Stixx 100% Production Mix
Stixx
DJ PH
DJ PH
Romeo Makota
Romeo Makota
Noxious Deejay Podcast
Noxious Deejay