32 episodes

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast‪)‬ Vatvatkaar

    • Society & Culture

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

    S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र

    S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र

    वत्सा, तुला काय पाहिजे तो वर माग असं विचारलं तर बिनधास्त "इकिगाई" ची डिमांड करावी.

    समोर मांडून ठेवलेल्या या आयुष्याच्या पसाऱ्यात समाधान कशात शोधायचं? अशा या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नाचं जपानी लोकांनी शोधलेलं साधं उत्तर म्हणजे "इकिगाई". आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी काही सोपे मूलमंत्र जे अनेक गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीत वाट दाखवू शकतात.

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट


    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 45 min
    S3.E02 काय हवं? चहा की कॉफी?

    S3.E02 काय हवं? चहा की कॉफी?

    चहा, कॉफी किंवा त्यापेक्षा अधिक उत्तेजक पेयांबद्दल (आणि तत्सम सवयींबद्दल) केलेला हा खल !

    असं करता करता आम्ही चीन, जपान, मकाऊ आणि ध्यान-धारणा वगैरे ठिकाणहून चक्कर मारून परत एक-एक कप च्या प्यायला मूळपदावर परतलो

    #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट


    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 30 min
    S3.E01 सरकार पुरस्कृत चोरी?

    S3.E01 सरकार पुरस्कृत चोरी?

    तुम्ही आत्तापर्यंत काही देशात सुरु असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद ऐकला असेल. पण एक असा नमुनेदार देश आहे जो चक्क (डिजिटल) चोऱ्या / डाके / वाटमाऱ्या करण्यात अगदी निष्णात झाला आहे. ऐका त्याची ही डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट जी पाहता पाहता आपल्या पुणे कोल्हापूरपर्यंत येऊन ठेपली.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 37 min
    तिसऱ्या सत्राची नांदी

    तिसऱ्या सत्राची नांदी

    थोडा आळस, काही महत्तवाची कामं व वाढते व्याप यात जरा व्यस्त झाल्यामुळे दुसऱ्या सत्रानंतर आम्ही जरा थंडावलो, पण थांबलो मुळीच नाही… येत आहोत लवकरच तुमच्या भेटीला तिसऱ्या सत्रात नवनवीन विषय घेऊन

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 40 sec
    S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

    S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

    चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.   

    आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 41 min
    S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

    S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

    आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत म्हातारपणात आर्थिक स्वावलंबन कसं नियोजन असावं? त्यात पुन्हा “महंगाई डायन खाये जात है”. या जंजाळात पद्धतशीर लॅनिंग कसं करावं याबद्दल गप्पा मारायला आर्थिक सल्लागार शैलेश गद्रे आणि ऋजुता बापट-काणे आपल्यासोबत मेतकूट पाॅडकास्टच्या या भागात आलेले आहेत.


    या भागात आलेले संदर्भ : One Idiot / Rule of 72 / 4% Rule / Harsh Realities / Your Next Five Moves

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter

    शैलेश, ऋजुता आणि त्यांच्या टीम सोबत संपर्क साधण्यासाठी, 

    Whatsapp or call +91 99308 47334 | support@gkfsindia.com । GKFS Facebook | GKFS LinkedIn 

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    00:00:00 नमस्कार चमत्कार 

    00:08:35 पॅशन हेच करियर करण्याचं धाडस करण्या आधीची तयारी  

    00:16:05 आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांसाठी कसं नियोजन कराल 

    00:24:18 करियरच्या सुरुवातीलाच पेन्शनचं नियोजन? काहीतरीच काय! 

    00:30:50 एकीकडे महागाई, आणि दुसरीकडे आपल्या वाढ(व)लेल्या गरजा - Personal Inflation 

    00:36:20 आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढे आहेत कि मागे? 

    00:42:38 बचत आणि गुंतवणूक यातला फरक  

    00:47:50 लहानपणापासूनच मुलांमध्ये financial literacy कशी रुजवावी?  

    00:59:22 भविष्यातल्या महागाईचा फटका बसू नये म्हणून नियोजन कसे असावे ? 

    01:09:32 गुंतवणूक करतांना होणाऱ्या सामान्य चुका 

    01:13:20  एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका (Portfolio diversification) 

    01:27:13  Life enjoy करता आलं पाहिजे 

    01:29:50 Financial goals - emergency fund, short / medium / long term vision 

    01:32:00  पैसे खर्च करताय कि वाया घालवताय? 

    01:44:40  सध्या काय वाचताय, पाहताय, लिहिताय?    




    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/metkoot/message

    • 1 hr 53 min

Top Podcasts In Society & Culture

Inconceivable Truth
Wavland
This American Life
This American Life
Stuff You Should Know
iHeartPodcasts
Fallen Angels: A Story of California Corruption
iHeartPodcasts
Soul Boom
Rainn Wilson
Shawn Ryan Show
Shawn Ryan | Cumulus Podcast Network