38 episodes

श्रोतेहो नमस्कार!खास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह!

https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar

इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha Bingepods

    • Fiction

श्रोतेहो नमस्कार!खास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह!

https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar

    गणपतीचे हत्तीचे मस्तक

    गणपतीचे हत्तीचे मस्तक

    गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.

    एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर

    फुले आणि झाडे लावलेली होती.

    • 5 min
    स्यमंतक मण्याची कहाणी

    स्यमंतक मण्याची कहाणी

    श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.

     

    एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून

    लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो

    आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का!

    • 11 min
    सत्यवतीचा विवाह

    सत्यवतीचा विवाह

    एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन

    शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे.

    हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता.

    • 10 min
    परिजात हरण - भाग 2

    परिजात हरण - भाग 2

    द्वारकेतला पारिजात वृक्ष

    कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारदमुनींनी द्वारकेत आल्यावर एकामागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या, की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णानी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या परिजात-हरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊया

    की श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या एका समारंभात गेले. तिथे इतर देव, गंधर्व, अप्सरा आणि देवर्षी यांच्याबरोबर नारदमुनी उमा-महेश्वरांची आराधना करू लागले.

    • 16 min
    पारिजात हरण - भाग 1

    पारिजात हरण - भाग 1

    द्वारकेत आले नारद मुनी

    एकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं.

    या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी सोबत बसले तेव्हा तिथे नारदमुनी आले. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीनं नारदांना

    अभिवादन केलं आणि आपल्या जवळच्या स्थानावर बसवलं.

    • 13 min
    कावळा चाले हंसाची चाल

    कावळा चाले हंसाची चाल

    द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल.

    आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला

    तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली केली.... तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे.

    आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली... ती अशी...

    • 7 min

Top Podcasts In Fiction

The Adventure Zone
The McElroys
The Sleepy Bookshelf
Slumber Studios
Table Read
Manifest Media / Realm
پادکست رخ
Rokh Podcast
Dungeon Masters
QCODE | Temple Hill
Legends of Avantris
Avantris Entertainment