28 episodes

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast‪)‬ Vatvatkaar

  • Society & Culture

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.
मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast

वटवटकार: सागर, पराग आणि रोहित
लोगो: राजेश गोडे

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

  S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

  S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

  चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.   

  आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा.

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 41 min
  S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

  S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

  आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत म्हातारपणात आर्थिक स्वावलंबन कसं नियोजन असावं? त्यात पुन्हा “महंगाई डायन खाये जात है”. या जंजाळात पद्धतशीर लॅनिंग कसं करावं याबद्दल गप्पा मारायला आर्थिक सल्लागार शैलेश गद्रे आणि ऋजुता बापट-काणे आपल्यासोबत मेतकूट पाॅडकास्टच्या या भागात आलेले आहेत.


  या भागात आलेले संदर्भ : One Idiot / Rule of 72 / 4% Rule / Harsh Realities / Your Next Five Moves

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter

  शैलेश, ऋजुता आणि त्यांच्या टीम सोबत संपर्क साधण्यासाठी, 

  Whatsapp or call +91 99308 47334 | support@gkfsindia.com । GKFS Facebook | GKFS LinkedIn 

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  00:00:00 नमस्कार चमत्कार 

  00:08:35 पॅशन हेच करियर करण्याचं धाडस करण्या आधीची तयारी  

  00:16:05 आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांसाठी कसं नियोजन कराल 

  00:24:18 करियरच्या सुरुवातीलाच पेन्शनचं नियोजन? काहीतरीच काय! 

  00:30:50 एकीकडे महागाई, आणि दुसरीकडे आपल्या वाढ(व)लेल्या गरजा - Personal Inflation 

  00:36:20 आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढे आहेत कि मागे? 

  00:42:38 बचत आणि गुंतवणूक यातला फरक  

  00:47:50 लहानपणापासूनच मुलांमध्ये financial literacy कशी रुजवावी?  

  00:59:22 भविष्यातल्या महागाईचा फटका बसू नये म्हणून नियोजन कसे असावे ? 

  01:09:32 गुंतवणूक करतांना होणाऱ्या सामान्य चुका 

  01:13:20  एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नका (Portfolio diversification) 

  01:27:13  Life enjoy करता आलं पाहिजे 

  01:29:50 Financial goals - emergency fund, short / medium / long term vision 

  01:32:00  पैसे खर्च करताय कि वाया घालवताय? 

  01:44:40  सध्या काय वाचताय, पाहताय, लिहिताय?    
  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 1 hr 53 min
  S2.E9 - जय जय मनी!

  S2.E9 - जय जय मनी!

  देशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली असली, तरी थोड्या फार प्रमाणात याचा आभ्यास केला तर याचे फायदे लगेच कळतात. अशाच या Financial literacy बद्दल आज थोडंसं.

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 51 min
  S2.E8 - फ्रॉड अणि फसवणूक... रिश्ता वही, सोच नई

  S2.E8 - फ्रॉड अणि फसवणूक... रिश्ता वही, सोच नई

  जमाना बदल गया, लोग बदल गए, नव्या तंत्रज्ञानाबरोबर, नव्या प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या. पूर्वी घरफोडी व्हायची तशी सध्या क्रिप्टो चोरी होऊ शकते. म्हणजे चोर सुद्धा वर्क फ्रॉम होम करू शकतात. अशाच प्रकारच्या काही नव्या जुन्या फ्रॉड आणि फसवणुकींबद्दलची चर्चा करत करत आज आम्ही ऍमेझॉन कुपन्स पासून ते बँक ऑफ इंग्लंड आणि बिट कॉईन करत करत आपल्या स्वदेश NSE पर्यंत पोचलो.  तुम्हाला या बद्दल काय वाटतं? तुमच्या माहितीत असले काही किस्से असले तर तेही जरूर सांगा.

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 1 hr 9 min
  S2.E7 - Fourier Transform, Inventions and Passion

  S2.E7 - Fourier Transform, Inventions and Passion

  शाळा कॉलेजमध्ये धो धो शिकून पुढे कॉर्पोरेट कल्चर मध्ये घुसल्यानंतर धक्का बसल्यासारखं होतं का? कोणत्या गोष्टी बदलतात? कोणत्या गोष्टी आधीच माहिती असत्या तर बरं झालं असतं असं वाटतं? कधी हा विचार मनात येतो का की आपल्याकडे व्हाट्सऍप, फेसबुक किंवा इतरही नवे शोध का बरं लागले नसतील? नासामध्ये बसून उपग्रह सोडणं महत्त्वाचं की एखाद्या गावात लाईट बल्ब लावणं महत्वाचं अशा स्वरूपाचा प्रश्न पडून तुमचा मोहन भार्गव होतो का?

  अशाच काही प्रश्नांची उजळणी, आणि काही उत्तरांची नव्याने ओळख असा आजचा भाग घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे चर्चा सत्र अजून लांबेल असं दिसतंय. तेव्हा पुढचा भाग घेऊन लवकरच परत येऊ. आणि तेव्हा तुमच्यापैकी कोणाला आपलं मत मांडायचं असेल, तुमचा एखादा वेगळा मुद्दा असेल, तर जरूर सांगा.

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 1 hr 28 min
  S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा

  S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा

  अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या वळणाला लागून आत्ता कुठं थोडं फार मराठमोळ्या पक्वांनांपर्यंत व्याख्या रुंदावू शकलोय. पण याच्याही पलीकडे आपण जे खातो, जसे खातो, त्याचा इतिहास, त्याचा लहेजा, त्यामागच्या रूढी आणि परंपंरा उलगडून दाखवणारा, त्याची माहिती जाणून घ्यायला उत्सुक करवणारा उपक्रम राबवणारी व्यक्ती म्हणून प्रीती आणि राजेश देव यांची ओळख. त्यांच्या याच उपक्रमाबद्दलची अधिक माहिती, त्यामागची प्रेरणा आणि त्यांना आलेले अनुभव जाणून घेणे हा यंदाच्या एपिसोडचा उद्देश. 

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

  प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter  या भागात आलेले संदर्भ: 

  Two Hands UK / My UK Kitchen 

  रुचिरा / Julie & Julia / नल पाकदर्पण / भोजनकुतूहलम / सूपशास्त्र / Paat Paani

  दीन मोहम्मद शेख / आजीबाई बनारसे / वेणूताई चितळे  

  मनोज वसईकर / पूर्णब्रम्ह (जयंती कठाळे) / Chef's Table

  Shank's (film) / भारतीय पाककृतींची अन्नयात्रा

  Ethopian Cuisine in Spitalfields Market / झोमॅटो-स्विगी ची चलती 


  ---

  Send in a voice message: https://anchor.fm/metkoot/message

  • 2 hr 6 min

Top Podcasts In Society & Culture

iHeartPodcasts
This American Life
Pineapple Street Studios | Wondery | Amazon Music
Glennon Doyle & Cadence13
Freakonomics Radio + Stitcher
Apple TV+ / Campside Media