6 episódios

परराष्ट्र संबंधांची गोष्ट, भारताच्या दृष्टीने.

Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतू‪न‬ Sandesh Joshi

    • Governo

परराष्ट्र संबंधांची गोष्ट, भारताच्या दृष्टीने.

    Episode 5 - भारताच्या दृष्टीतून म्यानमार

    Episode 5 - भारताच्या दृष्टीतून म्यानमार

    गेल्या काही महिन्यांपासून म्यानमारमध्ये तिथल्या लष्कराच्या विरुद्ध आंदोलनं चालू आहेत. लोकशाही सरकार बरखास्त करून म्यानमारवर पुन्हा एकदा लष्करी सत्ता आली आहे. आणि यामुळे गेली दशकभर चालू असलेली लोकशाहीकडची पाऊलं, आता उलटी पडलेली आहेत आणि म्यानमार पुन्हा एकदा पाकिस्तानसारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, ज्या देशांमध्ये कोणत्याही सरकार पेक्षा लष्कराला जास्त महत्त्व असतं.
    तर अशा या म्यानमारची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.

    • 21 min
    Episode 4 - भारताच्या दृष्टीतून बांग्लादेश

    Episode 4 - भारताच्या दृष्टीतून बांग्लादेश

    बातम्यांमध्ये आपण बांगलादेश बद्दल बरंच ऐकत असतो, आणि नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांमध्ये देखील बांगलादेश आणि बांगलादेशींचा उल्लेख आपण बऱ्याच वेळा ऐकला देखील आहे.
    पण भारतीय माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर बांगलादेश बद्दल काही ठराविक गोष्टीच आपल्या कानावर येतात ज्या मुख्यतः निगेटिव्ह असतात.
    जस कि बांगलादेशी घुसखोरीचा प्रश्न, असमिया आंदोलन, बांगलादेश मधला वाढता इस्लामी मूलतत्व वाद आणि त्यातून होणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या कत्तली इत्यादी इत्यादी.
    पण या पलीकडे देखील बांगलादेश मध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील घडत आहेत ज्या सहसा आपल्या पर्यंत पोहोचत नाहीत.
    उदाहरणार्थ काही महिन्यांपूर्वी बांगलादेशने पर कॅपिटा जीडीपी मध्ये भारताला मागे टाकल, म्हणजे आता सर्वसाधारणतः बांगलादेशी नागरिकाचं उत्पन्न हे एका भारतीय नागरिकापेक्षा जास्त आहे.
    तसेच बांगलादेशने मोठ्या प्रमाणात स्तलांतरित झालेल्या रोहिंग्यांचा प्रश्न देखील बऱ्यापैकी मार्गी लावला आहे.
    पण यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तिथल्या स्थानिक राजकारणाला झुगारून भारतासोबतचे परराष्ट्र संबंध हे अधिक मजबूत केले आहेत, आणि ते येत्या काळात आणखी दृढ होतील.

    • 19 min
    Episode 3 - भारताच्या दृष्टीतून भूटान

    Episode 3 - भारताच्या दृष्टीतून भूटान

    जेंव्हा भारताच्या आजूबाजूचे देश हे चीनशी मैत्री करण्यात व्यस्त आहेत तेंव्हा भूटानचं असा एकमेव देश आहे की जो संपूर्णपणे भारताच्या बाजूने उभा आहे. हे का ते आपण या भागात जाणून घेऊ, ज्यात आपण ऐकणार आहोत भूटानची गोष्ट जी आहे भारतच्या दृष्टीतून.

    • 14 min
    Episode 2 - भारताच्या दृष्टीतून नेपाळ

    Episode 2 - भारताच्या दृष्टीतून नेपाळ

    गेली काही वर्षे भारत आणि नेपाळचे संबंध हे तणावपूर्ण राहिलेले आहेत. काळापाणीचा सीमावाद, नेपाळने चीनशी साधलेली जवळीक आणि के पी ओली यांची सतत भारत विरोधी वक्तव्य यांमुळे नेपाळ हा भारताच्या मैत्री परिघातून बाहेर पडतोय असं वातावरण निर्माण झालय.
    तर अशा या नेपाळची गोष्ट जाणून घेऊया आजच्या भागात जी असेल भारताच्या दृष्टीतून.

    • 14 min
    Episode 1 - भारताच्या दृष्टीतून अफगाणिस्तान

    Episode 1 - भारताच्या दृष्टीतून अफगाणिस्तान

    गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तान हा नेहमी चर्चेत राहिला आहे. सतत होणारे दहशतवादी हल्ले आणि युद्धाला अफगाणी जनता कंटाळलेली आहे. एक सामान्य भारतीयाला या सर्व गोष्टी दूर कोठेतरी घडत आहेत असं वाटतं. पण ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या अफगाणिस्तान हा नेहमी भारताच्या सांस्कृतिक मंडलामध्ये राहिला आहे. ते कसं हे आपण या पॉडकास्ट द्वारे जाणून घेऊ.

    • 14 min
    Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतून (Trailer)

    Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतून (Trailer)

    • 58 s

Top podcasts em Governo

STF Oficial
STF - Supremo Tribunal Federal
Wálter Maierovitch - Justiça e Cidadania
CBN
Conexão Brasília-Ceará
Donizete Arruda
CBN Morar Bem - Marcio Rachkorsky
CBN
A Voz do Brasil
Rádio Senado
5-4
Prologue Projects