69 episódios

A Marathi podcast for personal development journey.

आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे !

जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे !

जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे !

ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे !

सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे.

आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे.

तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे..

नक्की ऐका

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडका‪स‬ मी पॉडकास्टर | Mi Podcaster

    • Educação

A Marathi podcast for personal development journey.

आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे !

जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे !

जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे !

ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे !

सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे.

आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे.

तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे..

नक्की ऐका

    EP 68 - Motivation Vs Actions

    EP 68 - Motivation Vs Actions

    भाग ६८

    मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ?

    मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ?

    काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ?

    अनुभव असं सांगतो कि मोटिवेशनचा डोस काही वेळात टाय टाय फीस होतो आणि आपण परत जैसे थे होतो.

    Motivation does not cause action, action motivates you to take further action ह्या अमृत देशमुखच्या वाक्यावर ह्या भागात ऊहापोह केला आहे.

    नक्की ऐका.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 6 min
    EP 67 - Find Your 'Why'

    EP 67 - Find Your 'Why'

    भाग ६७

    Find Your 'Why'

    Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ?

    ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे.

    पण त्यांनी हे कसं केलं ?

    सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे म्हणणे आहे, की ‘आपण कुठलीही गोष्ट ‘का’ करतो हे आधी माहिती हवं आणि मग ती कशी करायची हे आपण, आपणहून शोधून काढतो. त्याने बऱ्याच व्यावसायिक संस्थांचे उदाहरण त्यात दिले आहेत, जसे अँपल. अँपलला कल्ट फॉलोइंग आहे. त्याची काय कारणं आहेत याबद्दल विस्तृतपणे पुस्तकात दिले आहे, पण मुख्य मुद्दा हाच आहे की, कुठलंही काम करायच्या आधी आपल्याला आपण ते का करतो आहे, हे माहिती हवं. आपल्याला ‘का’ करायचं हे माहिती असलं की काय आणि कसे हे आपण शोधून काढतो.

    त्याने जी उदाहरणे दिली आहेत, ती सगळी अमेरिकन असल्यामुळे मी आपल्या उदाहरणांना हे लागू होतंय का याचा विचार करून बघितला आणि ते अक्षरशः खरं आहे, असं माझ्या लक्षात आलं. आजच्या भागात त्या बद्दल थोडा ऊहापोह केला आहे.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 11 min
    EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

    EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

    कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते.

    मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो का ?

    झालेली गोष्ट विसरून परत एकदा आपण कमला लागलो तर जास्त फायदा होईल का ? ऐकूया आजच्या भागात

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 10 min
    EP 65 - कठीण निर्णय घेताना

    EP 65 - कठीण निर्णय घेताना

    आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्याने आपण बरेचदा आलेली संधीला मुकतो.

    डॉ शारदा बापट ह्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये बरंच काही शिकलो, पण प्रामुख्याने एक फॉर्मुला शिकलो, ज्याचा उपयोग निर्णय घेण्यात नक्कीच होतो आहे.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 5 min
    EP - 64 -Perfection Vs Consistency

    EP - 64 -Perfection Vs Consistency

    Perfection Vs Consistency

    भाग २ मध्ये मला मेहक मिर्झा प्रभू हिच्याशी गप्पा करायची संधी मिळाली. तीन गोष्टी ह्या भागातून मला प्रकाशाने शिकायला मिळाल्या

    १) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी ध्यानी मनी नसताना, आपल्याला आपली passion सापडू शकते.

    ३) प्रयत्न करताना जरी फेल झालो तरी स्वतः वर प्रेम करणं सोडू नका

    ४) सातत्य हे perfection पेक्षा जास्त महत्वाचं आहे.

    मेहेक सोबतच्या ह्या गप्पा ऐकण्यासाठी भाग २ नक्की ऐका कारण हा खूप पॉवर प्याकडं भाग झाला आहे.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 8 min
    EP 63 - अडचणींवर मात करतांना

    EP 63 - अडचणींवर मात करतांना

    नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा.

    ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो.

    ४ मे २०२० ह्या दिवशी माझे हात थरथरत होते, खूप भीती वाटत होती, त्या सिटूएशन पासून, अँपल पॉडकास्ट च्या चार्ट वर १ नंबर वर येणे, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड मिळणे, दोन पुस्तक प्रकाशित होणे हा सगळा प्रवास भन्नाट होता.

    इन्स्पिरेशन कट्टा वर परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसोबत गप्पा करायला लवकर भेटणार आहोत, पण त्या आधी आपल्या जुन्या एपिसोडचा रिकॅप बघुयात, म्हणजे तुम्ही एखादा एपिसोड ऐकला नसेल तर त्यातला सार इथे मिळेल.

    ह्या सिरीयस चा हा पहिला एपिसोड.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

    • 9 min

Top podcasts em Educação

Psicologia na Prática
Alana Anijar
Flow Podcast
Estúdios Flow
Top Áudio Livros
Top Áudio Livros
6 Minute English
BBC Radio
Espresso English Podcast
Shayna Oliveira
TED Talks Daily
TED

Você Também Pode Gostar de

Why Not Mint Money
Mint - HT Smartcast
Whyfal (व्हायफळ) a Marathi Podcast
Suyog aka The fun Indian guy
Mitramhane Podcast by Soumitra Pote
Mitramhane Podcast by Soumitra Pote
नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam
Amuk tamuk Studio