110 episodes

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

गोष्ट दुनियेच‪ी‬ BBC Marathi Audio

    • Science

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

    लठ्ठपणा आणि स्थूलता खरंच औषधांनी कमी करता येते का? BBC News Marathi

    लठ्ठपणा आणि स्थूलता खरंच औषधांनी कमी करता येते का? BBC News Marathi

    'मला वजन कमी करायचं आहे, पण डाएट आणि जिमचा तर कंटाळाच येतो' अशी चर्चा तुमच्या कानावर अनेकदा पडली असेल किंवा तुम्ही स्वतः वाढलेल्या वजनाविषयी कधी ना कधी विचार केला असेल.
    ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ही काही देशांमध्ये तर राष्ट्रीय समस्या बनली आहे आणि वजन कमी करण्यासाठी सरकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी काहीवेळा वजन घटवणाऱ्या औषधांचा वापरही केला जातो.
    हॉलिवूडमधले कोणते सेलिब्रिटी वजन घटवण्यासाठी असं औषध घेतात, याविषयी सोशल मीडियावर गरमागरम चर्चा रंगताना दिसते. पण ही औषधं सर्रास सर्वांसाठी नाहीत. अशा औषधांनी लठ्ठपणाची समस्या खरंच दूर होते का, याच प्रश्नाचं उत्तर आपण गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत.
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 16 min
    सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi

    सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi

    मार्च 2024 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांंनी व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक आयोगासमोर बोलताना सांगितलं की अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्स किंवा ओपियॉइड्स.
    एका अहवालानुसार 2022 साली सिंथेटिक ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला.
    आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत?
    प्रेझेंटर : जान्हवी मुळे
    ऑडियो: तिलक राज भाटिया

    • 17 min
    चॉकलेट उत्पादन हवामान बदलामुळे कमी होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

    चॉकलेट उत्पादन हवामान बदलामुळे कमी होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

    चॉकलेट कुणाला आवडत नाही? पण सध्या कोको आणि चॉकलेटच्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. फेब्रुवारी 2024 मध्ये तर चॉकलेटच्या किंमतीनं नवा विक्रम रचला. अमेेेरिकेतत कोकोची किंमत दुप्पटीनं वाढली आणि कोको आता तिथे प्रतिटन 5874 डॉलर्सला पोहोचलं आहे.
    कोको उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देेशांना सध्या हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहेे. त्यामुळेच या किंमती वाढल्या आहेत का?
    प्रेझेेंटर : जान्हवी मुळेे
    ऑडियो एडिटिंग : तिलक राज भाटिया

    • 16 min
    भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi

    भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का? BBC News Marathi

    जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आणि त्यात अर्ध्याहून अधिक लोक शहरांत राहतात. येत्या 25 वर्षांत शहरात राहणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसेल.
    मग शहरातली वाढती गर्दी आणि हवामान बदलामुळे वाढलेली गर्मी यांचा सामना शहरं कसा करतील? त्यावर उपाय म्हणून जमिनीखाली शहरांचा विस्तार करण्याची योजना काहीजण आखत आहेत.
    खरंच असं शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 16 min
    इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi

    इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi

    इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला.
    पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे.
    आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार?
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
    एडिटिंग - तिलक राज भाटिया

    • 16 min
    'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

    'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

    अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का?
    प्रेझेंटर : जान्हवी मुळेे
    ऑडियो: तिलक राज भाटिया
    मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

    • 18 min

Top Podcasts In Science

Ologies with Alie Ward
Alie Ward
Science Vs
Spotify Studios
Hidden Brain
Hidden Brain, Shankar Vedantam
Crash Course Pods: The Universe
Crash Course Pods, Complexly
Making Sense with Sam Harris
Sam Harris
Radiolab
WNYC Studios

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
Finshots Daily
Finshots
Daybreak
The Ken
The Morning Brief
The Economic Times