749 episodes

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्‪ट‬ BBC Marathi Audio

    • Health & Fitness

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

    वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi

    वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi

    भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय.
    जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात.
    वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?
    समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - विशाखा निकम
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 4 min
    NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय? BBC News Marathi

    NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय? BBC News Marathi

    NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली.
    या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती.
    देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय.
    रिपोर्ट - उमंग पोद्दार
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 4 min
    नितीश, नायडूंना हवा असलेला विशेष राज्याचा दर्जा काय आहे? BBC News Marathi

    नितीश, नायडूंना हवा असलेला विशेष राज्याचा दर्जा काय आहे? BBC News Marathi

    भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीचं सरकार आता भारतात स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागी विजय मिळाला पण पूर्ण बहुमत मिळालं नसल्याने त्यांना संयुक्त जनता दल (JDU) आणि तेलगु देसम पार्टी (TDP)ची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागेल.
    आंध्र प्रदेशला Special Category Status - विशेष श्रेणी दर्जा देण्यात यावा ही मागणी गेल्या दशकभरापासून अधिक काळ करण्यात येतेय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आंध्र प्रदेशाला असा विशेष दर्जा देण्याचा मुद्दा होता आणि आपण हे वचन पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 4 जूनला निकालाच्या दिवशी याबद्दलचं सूचक ट्वीटही केलं होतं.
    भाजपला आता चंद्राबाबू नायडू आणि तेलगु देसम पार्टीची गरज असताना चंद्राबाबू राज्याला विशेष दर्जा देण्याची मोठी मागणी ठेवतील असा कयास आहे. सोबतच भाजपला पाठिंबा जाहीर करणारे नितीश कुमारही बिहारला असा विशेष श्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
    हा स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय असतो? असा विशेष दर्जा मिळाल्याने राज्यासाठी काय बदलतं?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 4 min
    एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

    मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - इक्बाल अहमद
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 5 min
    मोठाल्या शहरांमुळे तापमान जास्त वेगाने वाढतंय का? BBC News Marathi

    मोठाल्या शहरांमुळे तापमान जास्त वेगाने वाढतंय का? BBC News Marathi

    दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

    • 5 min
    पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

    पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

    पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का?
    हेच मुद्दे आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.
    लेखन - गणेश पोळ
    निवदेन - विशाखा निकम
    एडिट - निलेश भोसले

    • 5 min

Top Podcasts In Health & Fitness

On Purpose with Jay Shetty
iHeartPodcasts
Huberman Lab
Scicomm Media
The Psychology of your 20s
iHeartPodcasts
The Mindset Mentor
Rob Dial
Ten Percent Happier with Dan Harris | 5 minute podcast summaries
5 minute podcast summaries
Health Psychology and Human Nature
André Sturesson

You Might Also Like

तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
3 Things
Express Audio
The Morning Brief
The Economic Times
Finshots Daily
Finshots

More by BBC

Learning English Conversations
BBC Radio
Learning English Grammar
BBC Radio
Global News Podcast
BBC World Service
6 Minute English
BBC Radio
Learning English Vocabulary
BBC Radio
The Documentary Podcast
BBC World Service