Jamal Ho Jamal - Marathi Matrimonial Website

Jamal Ho Jamal
Podcast de Jamal Ho Jamal - Marathi Matrimonial Website

मराठी तरूणांनी मराठी लोकांसाठी बनवलेली वधूवर सुचक वेबसाईट "जमलं हो जमलं" लवकरच आपल्या सेवेत रूजू होत आहोत. जमलं हो जमलं च्या सोशल मिडीया पेजेसला एकदा नक्की भेट द्या. लाईक, फाॅलोव, सबस्क्राईब आणि शेयर करून आपल्या मराठी वधूवर सुचक वेबसाईटला सपोर्ट करा. Facebook : https://www.facebook.com/JamalHoJamal Instagram : https://instagram.com/jamalhojamal Twitter : https://twitter.com/JamalHoJamal Youtube : http://www.youtube.com/c/JamalHoJamal

Episodios

  1. 28/10/2020

    विवाह जुळवतानाचे 36 गुण | जमलं हो जमलं

    नमस्कार मंडळी, कसे आहेत? आपल्या जमलं हो जमलं ला फॉलोव करताय ना? अजूनही तुम्ही जमलं हो जमलं ला सोशल मीडिया वर फॉलोव केलं नसेल आपलं युट्युब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आटा आवर्जून करा. कारण आम्ही आपल्यासाठी घेऊ येत असतो लग्नासंबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती. आपल्याकडे विवाह जुळवताना वधू-वरांची पत्रिका जुळतेय का पाहिली जाते. अनेकांना प्रश्न पडतो की गुणमिलन करताना कोणत्या बाबी पहिल्या जातात आणि त्याला किती गुण असतात? आज आपण त्याबद्दल माहिती घेऊ : #विवाह_जुळवतानाचे_३६_गुण (टीप : पत्रिका पाहणे किंवा न पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा असते किंवा नसते पण. जमलं हो जमलं त्याबद्दल काहीही टिपण्णी करत नाही. #जमलं_हो_जमलं च्या माध्यमातून आम्ही फक्त माहिती देत आहोत.) सुरु करूयात विवाह जुळवतानाचे ३६ गुण - १) वर्ण (१ गुण) : या प्रकारात १२ राशींची ४ चार प्रकारच्या वर्णात विभागणी केली आहे. विप्र, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. वैचारिक पातळीवर यांची विभागणी केली आहे. २) वश्य (२ गुण) : या प्रकारात चंद्र नक्षत्रानुसार वधू-वरांची स्वभाव वैशीष्ट्ये एकमेंकासाठी किती अनुकूल आहेत हे पाहीले जाते. यात जलचर, वनचर, किटक, मानव, चतुष्पाद यानुसार विभागणी केली जाते. ३) तारा (३ गुण) : याला नक्षत्रगुण असेही म्हणतात. वधू-वरांची चंद्रकुंडली आधारीत जन्मनक्षत्र एकमेकांपासून किती अतंरावर आहेत ते पाहीले जाते. जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यारी, साधक, बाधक, मित्र आणि अतीमित्र अशा ९ प्रकारात याची विभागणी केली आहे. ३, ५ आणि ७ क्रमांकाचे नक्षत्र सोडून इतर जन्मनक्षत्र एकमेंकासाठी पुरक आहेत अस मानतात. ४) योनी (४ गुण) : जातकाचा जन्म अश्व, गज, मेष, सर्प, श्वान, मार्जार, गौ, व्याघ्र, वानर, मंगुस, सिंह, मृग, उंदीर, म्हैस या १४ पैकी नेमक्या कोणत्या यो

    5 min
  2. 17/10/2020

    Marathi Matrimonial Website Jamal Ho Jamal Introduction | जमलं हो जमलं वर रजिस्टर का करायचं?

    नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या मराठी माणसाची हक्काची आणि विश्वासाची वधुवर सूचक वेबसाईट 'जमलं हो जमलं' आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 'जमलं हो जमलं' वर रजिस्टर का करायचं? मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, ज्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचं? वधुवर संशोधन करताना आपण अनेक वधुवर मेळाव्यांमध्ये नाव नोंदणी करतो. एका मेळाव्यात नावनोंदणी करण्यासाठी साधारणपणे २५० रुपये खर्च तरी येतोच. शिवाय मेळाव्याच्या ठिकाणी जाणे येण्याचा खर्च होतोच. एकंदरीत एका मेळाव्यासाठी ५०० रुपये सहज खर्च होऊन जातात. शिवाय तो पूर्ण दिवस जातो. असे आपण वर्षातून किमान २ ते ३ मेळावे तरी करतो. म्हणजेच वधुवर संशोधनासाठी आपण एका वर्षात कमीत कमी १००० रुपये सहज खर्च करतो. त्याचसोबत आपला वेळ सुद्धा खर्च करतो. नावनोंदणी केल्यानंतर महिन्याभराने आपल्याला पुस्तक मिळते मग आपण स्थळे पाहतो. ते सुद्धा मर्यादितच. 'जमलं हो जमलं' वर आपण अमर्याद स्थळे बघू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या २४ तासात आपली प्रोफाइल आधार कार्ड वरून पडताळली जाते आणि आपण स्थळं बघायला सुरवात करू शकतो, संपर्क करायला सुरु करू शकतो. आणि 'जमलं हो जमलं' ही सेवा फक्त ८२८ रुपयांत देते ते सुद्धा संपूर्ण १ वर्षासाठी. म्हणजेच आपण १ वर्षात घरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरून अमर्याद स्थळांची माहिती घेऊ शकतो, त्यांना संपर्क करू शकतो ते ही फक्त ८२८ रुपयांत. बाकीच्या वेबसाईट सोडून 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचे? 1. 'जमलं हो जमलं' वर प्रत्येक प्रोफाइल ही आधार कार्ड पडताळून सक्रिय केली जाते. रजिस्टर करताना आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे 'जमलं हो जमलं' वर खोट्या प्रोफाइल अजिबात नाहीत.

    8 min

Acerca de

मराठी तरूणांनी मराठी लोकांसाठी बनवलेली वधूवर सुचक वेबसाईट "जमलं हो जमलं" लवकरच आपल्या सेवेत रूजू होत आहोत. जमलं हो जमलं च्या सोशल मिडीया पेजेसला एकदा नक्की भेट द्या. लाईक, फाॅलोव, सबस्क्राईब आणि शेयर करून आपल्या मराठी वधूवर सुचक वेबसाईटला सपोर्ट करा. Facebook : https://www.facebook.com/JamalHoJamal Instagram : https://instagram.com/jamalhojamal Twitter : https://twitter.com/JamalHoJamal Youtube : http://www.youtube.com/c/JamalHoJamal

Para escuchar episodios explícitos, inicia sesión.

Mantente al día con este programa

Inicia sesión o regístrate para seguir programas, guardar episodios y enterarte de las últimas novedades.

Elige un país o región

Africa, Oriente Medio e India

Asia-Pacífico

Europa

Latinoamérica y el Caribe

Estados Unidos y Canadá