Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ] श्री गोंदवलेकर महाराज भक्त संप्रदाय
-
- Religión y espiritualidad
-
Manache Shlok - shloka 10
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक -
Manache Shlok - shloka 9
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक -
Manache Shlok - shloka 8
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक -
Manache Shlok - shloka 7
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक -
Manache Shlok - shloka 6
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक -
Manache Shlok - shloka 5
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥
as explained by - श्री. रवींद्र पाठक