काव्यातले काही (KavyaTale) | A Marathi Podcast for poems

unmeshjoshi

काव्यातले काही is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! In each episode, I will focus on one Hindi song and recite the Marathi interpretation of the same, sometimes accompanied by stories about the lyrics, song creation and the film.

  1. 25.12.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 25 | कोजागिरीची रात्र (Kojagirichi Ratra) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular gazal by Ibn-e-Insha. Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: कोजागिरीची रात्र होती चर्चेत मात्र होतीस तू कुणी म्हणाले चंद्र आला कुणी म्हणाले होतीस तू जात होतो तिथून आम्ही विचारले गेले आम्हाला हसून शांत ओलीस आम्ही पडदा नशीन होतीस तू रिकामे समारंभ सारे भेटू कुणाला शहरात या तुझे नाव तोंडी प्रत्येक होते अनामिका जरी होतीस तू संन्यासीच होणार होतो आम्ही, वगळून असणे तुझे थेंब घनाचा, अनिल वनाचा, ठाव मनाचा झालीस तू आमचे त्याग राजरोस उद्विग्न आमची अजीजी करून उपकार चोरटे निष्काळजी होतीस तू दोन थेम्ब अश्रुंचे आहेत पापणीवरी थांबले एक होता तुझ्या साठी दुसऱ्यात खुद्द होतीस तू संकोच नाही आवास नाही तक्रार तरी केली कुठे पळून गेलीस ही "कल्पना" विलासात होतीस तू कीव केलीस फक्त माझी घातलीस भीक नाही धरला नाही पदर तुझा काय सोडवीत होतीस तू आहेस तू खाण रूपाची पण अनाठायी गर्व त्याचा रचल्या कविता किती कवींनी, प्रसिद्धी पावलीस तू रचावी कृष्णकृत्ये चांगली गज़ल निर्दयी असावी निंदून शायरीत जपलेले उन्मेषित मोरपीस तू Background score by Music by pianocafe_Kumi from Pixabay Concept and Execution by Unmesh Joshi

    20 мин.
  2. 11.12.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 24 | तो नाराज आहे (To Naraj Ahe) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Shagird (1967)". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: ती: जरासा तो नाराज आहे, नयनांत पण लाज आहे तो: अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे ती: अवसेची चांदणी धाडे तू रुसल्याचा सांगावा आवरे ना मुळीच रडू, जीव माझा टांगावा तो: सारे मनीचे खेळ तुझ्या, ऐकू नकोस हा कांगावा जवळी तू येऊनी माझ्या आपला शृंगार रंगावा तीच अगोचर चांदणी आता तुझा साज पाहे अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे तो: सुमसौरभ दरवळे घेऊन तुझ्या बटांचा ठाव निशेने क्षीरकेशर पिऊन मांडला रंगीत डाव ती: केशर आकाशात नाही तोवर आहे वाव छाती छप्पर हात भिंती तूच माझा गाव तो: धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदणारी गाज वाहे अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे ती: भाकते करुणा तुझी चुकवू नकोस माझा ठोका लाल माना गाल रक्तिमा कसे काय सांगू लोका तो: अजून रात्र गुलाबीच, खांद्यावर माझ्या घे झोका झोप आगंतुक आली, त्याचा फक्त आहे धोका तुझ्या ओष्ठ कमलांचे अमृत मला पाज ना हे अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे ती: आता नयनांत लाज नाही, पण गोडसर माज आहे अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे Background score by Muhammad Usama from Pixabay Concept and Execution by Unmesh Joshi

    11 мин.
  3. 27.11.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 23 | लवत नाही पापणी (Lavat nahi PapaNi) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Kabhi Kabhie". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: पाहिले टक लावुनी तरी लवत नाही पापणी पाहिले रम्य देखावे , झोपेत की जागेपणी भेटी झाल्या हुरहुर तरीही शहारे उरलेच आणि पाहिले रम्य देखावे , झोपेत की जागेपणी वितळले अंग माझे नजर तुझी धगीची बर्फात उमले बहावा ऋतूचक्रे सुगीची लपेटून आग घेई काया ही आरस्पानी पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी रंग सगळे सुगंध सगळे रचू लागले डाव चंद्रधनू अन् सूर्य चांदणे, स्वप्नपाखरा धाव वाटते जग संपावे सोनकेशरी या क्षणी पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी पापणीवरी पडली पापणीची तुझ्या सावली चेहऱ्याची लाली तुझी गाली माझ्या विसावली अवीट उन्मादक या अदा आहेस तू यक्षिणी पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी Background score by Music by Kalpesh Ajugia from Pixabay Concept and Execution by Unmesh Joshi

    8 мин.
  4. 14.11.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 22 | रमणीय सहल (Ramaniy Sahal) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Madhumati". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: भूल पडे जगाची असली भीती वाटे मजला रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला परागमिषे जाती फुलांचे निरोप उन्मेषित डोले दंग मनी रोप रुणझुणता पाऊसही आषाढाचा रुजला रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला घेई वळणे कमनीय सरिता साजरा झरा तिच्याकरिता रिता रानवारा बरा वाहे "बनी" दुरिता यमुनातीरी जणू कृष्णपावा वाजला रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला गगन भिडे या जादुई जागी धरा मीलन असले देवाजीच्या घरा कल्पनाविलासी माझा मन-मानस लाजला रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला Background music by https://www.youtube.com/watch?v=V8UaPtzk6t8 Concept and Execution by Unmesh Joshi

    7 мин.
  5. 30.10.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 21 | विरहोत्सव (Virahotsav) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Bobby". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: शकले हृदयाची घेऊन छातीचा पिंजरा कैद भावना मरणप्राय त्या सांगू पाहतो जरा एक डोळा खरा सोबती दुसरा निलाजरा एकमेकां साथ करती विरहोत्सव साजरा एक नाही या दुःख जगी, पण दुष्कर प्रेमवियोगाचे दडपण खऱ्या प्रेमात विरते दोघांचे मीपण आणि होतात पाणीदार नजरा एकमेकां साथ करती विरहोत्सव साजरा नावालाच फक्त आहे आनंद आता जगी या उपयोग नाही त्याचा, तुझ्या शिवाय मी जोगीया उदासीतही या मी आता सुखे विरह भोगिया जपला आहे चिरगंध तुझ्या वेणीतला गजरा एकमेकां साथ करू विरहोत्सव साजरा Background score by https://www.youtube.com/watch?v=FRVnUiZlctk Recording by Onkar Tarkase https://open.spotify.com/artist/0xduvOCrxqfpnTU46KuyHC?si=i6t0iPbWRIig_tZThbwEvQ Concept and Execution by Unmesh Joshi

    7 мин.
  6. 16.10.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 20 | स्वप्नपरी (SwapnaPari) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Zehreela Insaan". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: परी माझी स्वप्नपरी तू, कशी संचारी आकाशी अभिलाषा घेऊन माझ्या पसरले पंख सावकाशी श्वासांत माझ्या जाणवे तुझा गजरा अबोली निशा माझ्या बहरती कल्पून तुझी देहबोली येशील तू कधी जीवनी अशी मला हवी तशी परी माझी स्वप्न परी तू कशी संचारी आकाशी रमणी तू हंसा नराची, जो सरोवराज असतो परंतु वेचत असतो तुझ्याचसाठी मनोभावे कमलतंतू सेवन तू तयाचे करता पक्षिराज तो राहतो उपाशी परी माझी स्वप्न परी तू कशी संचारी आकाशी Background by https://www.youtube.com/watch?v=rV8hOBJmdhE Concept and Execution by Unmesh Joshi

    11 мин.
  7. 02.10.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 19 | पावसाची रात्र (Pawasachi Ratra) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Barsaat ki raat". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: विसरणार नाही चुकूनही पावसाची रात्र ती एक रसिका अनामिका गवसलेली मला ती रेशमाच्या केशांतुनी ओथंबले तुझ्या पाणी गालमैदानात सोडी थेंब ओली निशाणी काबीज ते मैदान करण्या ओठांना येते गती एक रसिका अनामिका गवसलेली मला ती वीज मग धावून येते बिलगते ती मला पुरती आलिंगनास त्या आता युगे आम्हा न पुरती जादुई रजनी अशी न भूतो न भविष्यति एक रसिका अनामिका गवसलेली मला ती पदर ओला गच्च तिने असा टाकला पिळून नजरबाणाने भेदक तिच्या गेलो मी खिळून उष्ण झाले श्वास आणि गुंग झाली मती एक रसिका अनामिका गवसलेली मला ती यमक आणि प्रास माझ्या कवितेची होती तारुण्यसहज भावनांचा परिपाक ती होती स्वर्गातील ती रती अमर केली एक राती एक रसिका अनामिका गवसलेली मला ती Background score by https://www.youtube.com/watch?v=HHF_o3RAxS4 Concept and Execution by Unmesh Joshi

    10 мин.
  8. 18.09.2024

    काव्यातले काही (KavyaTale) | Episode 18 | घनसावळा मी (Ghansavala mi) | Marathi Podcast

    काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! This episode features a popular song from the film "Chhaya". Listen to the podcast to know which one it is! Marathi poem: घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी घनसावळा बेघर तू आवडे हीच गोष्ट खरी जन्मोजन्मीची साथ आपुली मी तुझ्यातल्या सरी थांबला तो संपला हे ब्रीदवाक्य माझ्या चवरी फरफट माझ्यासोबत अशी येशील कुठवरी घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी रे गगनाच्या सदनिकेतला अनिकेत असलास तरी स्वार होईन धुक्याच्या रथात होऊन मी अपंख परी घनसावळा बेघर तू आवडे हीच गोष्ट खरी जन्मोजन्मीची साथ आपुली मी तुझ्यातल्या सरी का प्रेमात सारे विसरुनी होतेस वेड्या कुणाचीतरी राधेसम हरले यमुनेच्या तीरी तूच माझा हरी घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी Background score by https://www.chosic.com/free-music/all/ Mozart Symphony No. 40 In G minor Concept and Execution by Unmesh Joshi

    10 мин.

Об этом подкасте

काव्यातले काही is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi! In each episode, I will focus on one Hindi song and recite the Marathi interpretation of the same, sometimes accompanied by stories about the lyrics, song creation and the film.