
काव्यातले काही (KavyaTale) | Episode 24 | तो नाराज आहे (To Naraj Ahe) | Marathi Podcast
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Shagird (1967)". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
ती: जरासा तो नाराज आहे, नयनांत पण लाज आहे
तो: अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
अवसेची चांदणी धाडे तू रुसल्याचा सांगावा
आवरे ना मुळीच रडू, जीव माझा टांगावा
तो:
सारे मनीचे खेळ तुझ्या, ऐकू नकोस हा कांगावा
जवळी तू येऊनी माझ्या आपला शृंगार रंगावा
तीच अगोचर चांदणी आता तुझा साज पाहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
तो:
सुमसौरभ दरवळे घेऊन तुझ्या बटांचा ठाव
निशेने क्षीरकेशर पिऊन मांडला रंगीत डाव
ती:
केशर आकाशात नाही तोवर आहे वाव
छाती छप्पर हात भिंती तूच माझा गाव
तो:
धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदणारी गाज वाहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
भाकते करुणा तुझी चुकवू नकोस माझा ठोका
लाल माना गाल रक्तिमा कसे काय सांगू लोका
तो:
अजून रात्र गुलाबीच, खांद्यावर माझ्या घे झोका
झोप आगंतुक आली, त्याचा फक्त आहे धोका
तुझ्या ओष्ठ कमलांचे अमृत मला पाज ना हे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
आता नयनांत लाज नाही, पण गोडसर माज आहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
Background score by
Muhammad Usama from Pixabay
Concept and Execution by
Unmesh Joshi
資訊
- 節目
- 頻率隔週更新
- 發佈時間2024年12月11日 下午10:41 [UTC]
- 長度11 分鐘
- 季數1
- 集數24
- 年齡分級兒少適宜