27 episodes

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..

संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.

सृजन सख्या ची माहिती 
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha Ep.Log Media

    • Religion & Spirituality

Listen on Apple Podcasts
Requires subscription and macOS 11.4 or higher

    आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

    आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

    सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक  श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात  हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला पुस्तके, ग्रंथ, काही मान्यवर व्यक्ती आणि अर्थातच एपिलॉग मीडियाचे अभिजीतसर, रोहन व सर्व तंत्रज्ञ यांची मदत झाली. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. ह्या आमच्या पॉडकास्ट मालिकेतील सर्व भागांविषयी संक्षेपात माहिती देण्याचा प्रयत्न, आम्ही ह्या शेवटच्या भागात केला आहे. आम्हाला खात्री आहे, की, ही माहिती ऐकल्यावर जर तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणताही भाग मिस केला असाल, तर तो नक्कीच ऐकाल आणि सर्व सणांची माहिती नक्की एन्जॉय कराल... याच नोटवर आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद🙏

    सहभाग -डॉक्टर सौ. स्वाती कर्वे, सरोज करमरकर,अपर्णा मोडक.
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 19 min
    होळी रे होळी, पुरणाची पोळी

    होळी रे होळी, पुरणाची पोळी

    नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी  संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती  रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून.  भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.  सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...मग नक्की ऐका... 

    संकल्पना व सहभाग -सौ.अपर्णा मोडकवैद्या स्वाती कर्वेसौ.सरोज करमरकर
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 12 min
    जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है

    जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है

    भारतामध्ये  26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो.  देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो. या दिवशी ,भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. ह्या संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची माहिती या पॉडकास्ट मधून आपणास मिळेल. बीटिंग द रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते .'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है' ह्या आजच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून, आपल्या देशातील शहिदांना मानवंदना देऊया.याचबरोबर माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती आणि महाशिवरात्र ह्या  उत्सवांबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया.

    संकल्पना व सहभाग -वैद्या स्वाती कर्वे,सौ.अपर्णा मोडक,सौ.सरोज करमरकर
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 8 min
    तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola

    तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola

    नमस्कार श्रोतेहो, "तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!" मनातील सर्व भेदभाव, कटुता बाजूला सारून प्रेमाचे, आपुलकीचे नाते नव्याने जपण्याचा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण... मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मिरवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ, तिळाची वडी तिळाचा काटेरी हलवा, गुळपोळी यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचा दिवस... मग याच मकर संक्रांतिविषयी व त्याबरोबर पौष महिन्यातील काही दिनविशेषांची माहिती घेऊया आपल्या आजच्या पॉडकास्टमधून. सादरकर्त्या आहोत... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...मग नक्की ऐका... 

    संकल्पना व सहभाग -सौ.अपर्णा मोडकवैद्या स्वाती कर्वेसौ.सरोज करमरकर

    Hello listeners,

    Wish you all great Makarsanskranti !!!

    Our today's podcast will enlighten your Makarsankranti festival celebrations. This is the festival of building the relationship of love, affection, empathy. Keeping away all differences, bitterness and rejuvenating the lovely relations as sweet as the teelgul (sesame seeds laddu). It's also the festival of kite flying.  Let's learn more about it.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists - Mrs. Aparna Modak Mrs. Saroj Karmarkar Vaidya Mrs. Swati Karve
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 18 min
    कर्मण्येवाधिकारस्ते

    कर्मण्येवाधिकारस्ते

    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

    मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गीता जयंतीबद्दल जाणून घेऊया. सुमारे 5000 वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाचा दिव्य संदेश आणि महान विचार दिला. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे सार म्हणजे भगवद्गीता असं म्हटलं जातं. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेले कित्येक विचार भगवद्गीतेत सांगितले गेले आहेत. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटाच्या क्षणी आधारग्रंथ ठरणारी, आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्रस्थापित करण्यासाठी आपला खरा मार्गदर्शक ठरणारी ती भगवद्गीता. संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता, सामान्य माणसांना कळावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती प्राकृत भाषेत आणली.चला ह्या गीतेचे सार ऐकुया विदुषी स्वाती कर्वे यांच्याकडून....

    संकल्पना व सहभाग -वैद्या स्वाती कर्वे,सौ.अपर्णा मोडक,सौ.सरोज करमरक

    Hello listeners,

    Our new podcast is on air. This podcast 'Karmanyevadhikarste…' will give you an overview of Bhagavad Gita..Our Sacred Hindu Book. Margashirsha Shukla Ekadashi or Mokshada Ekadashi is celebrated as Geeta Jayanti. It is the day on which Lord Krishna gave the archer Arjun the divine message of life and thought through the Bhagvad Gita, about 5000 years ago. It is celebrated everywhere in India as well as outside of It.In today's days, when people are confused and misdirected, the Gita becomes more relevant for them as individuals and for the society at large in bringing back the stability and happiness in life.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists - Mrs. Aparna Modak Mrs. Saroj Karmarkar Vaidya Mrs. Swati Karve
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 17 min
    लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी | Diwali Special

    लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी | Diwali Special

    Hello listeners,

    Wish you all a great, healthy, and prosperous Diwali !! We have brought today's podcast ' Lakh lakh chanderi tejachi aali Diwali' to enlighten your festival celebrations. Diwali or Deepavali is the festival of lights (Deep). It is considered the king of festivals in India. In the middle of autumn i.e. on the occasion of the Ashwin-Kartika months, this festival occurs. We start getting nostalgic with Diwali and it's all about abhyang bath, special rangoli, earthen lamp lighting, kandil (lantern), new clothes, new ornaments, greeting cards, sweet snacks, delicious mouth-melting desserts, forts made by children and firecrackers are all things that make our heart happy.

    So join us and listen to the podcast..Happy listening 😊

    Concept and Arists - Mrs. Aparna Modak Mrs. Saroj Karmarkar Vaidya Mrs. Swati Karve

    "लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी" - नमस्कार श्रोतेहो, दीपावली हा दिव्यांचा उत्सव. भारतामध्ये हा सणांचा राजाच मानला जातो. शरद ऋतूच्या मध्यभागी म्हणजे अश्विन-कार्तिक महिन्यांच्या संधीवर, हा सण येतो. दीपावली म्हटलं की अभ्यंग स्नान, दरवाजासमोर रांगोळी, पणत्यांचा दीपोत्सव, नवीन कपडे, नवीन अलंकार, आकाश कंदील शुभेच्छापत्र, गोड गोड फराळ, मिष्टान्न  भोजन, बच्चेकंपनीने बनवलेले किल्ले आणि फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या गोष्टी अगदी मनाला आनंदित करणाऱ्या. दिवाळी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, गरीब श्रीमंत या सर्वांना आनंद प्राप्त करून देत असते. आज.. मी, सरोज आणि स्वाती तुमच्यासाठी दीपावलीच्या निमित्ताने ‘लखलख चंदेरी तेजाची आली दिवाळी’ हा खास पॉडकास्ट घेऊन आलो आहोत.मग नक्कीच ऐकणार ना... तुम्हा सर्वांना दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
    See omnystudio.com/listener for privacy information.

    • 30 min

Top Podcasts In Religion & Spirituality

The Bible in a Year (with Fr. Mike Schmitz)
Ascension
The Bible Recap
Tara-Leigh Cobble
followHIM: A Come, Follow Me Podcast
Hank Smith & John Bytheway
Joel Osteen Podcast
Joel Osteen, SiriusXM
BibleProject
BibleProject Podcast
The Catechism in a Year (with Fr. Mike Schmitz)
Ascension