754 épisodes

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्‪ट‬ BBC Marathi Audio

    • Forme et santé

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

    जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रंप - अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi

    जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रंप - अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi

    अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे.
    नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 6 min
    अंमली पदार्थांचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC News Marathi

    अंमली पदार्थांचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC News Marathi

    26 जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी 1987मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली.
    Drugs म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो. ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे शरीरावर, आयुष्यावर काय परिणाम होतात?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 7 min
    वजन घटवण्यासाठी औषधं घेताय? सावधान! आधी हे ऐका | BBC News Marathi

    वजन घटवण्यासाठी औषधं घेताय? सावधान! आधी हे ऐका | BBC News Marathi

    वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे.
    हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल...हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय?
    Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय. पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. आणि याचविषयीचा खबरदारीचा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलाय.
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

    • 6 min
    प्राण्यांना तुमच्या-आमच्यासारख्या जाणिवा, संवेदना असतात का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

    प्राण्यांना तुमच्या-आमच्यासारख्या जाणिवा, संवेदना असतात का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

    प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय.
    पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं.
    मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का?
    जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - पल्लब घोष
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 4 min
    भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

    भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

    GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.
    आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात?
    समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 7 min
    वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi

    वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi

    भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय.
    जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात.
    वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?
    समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    रिपोर्ट - अमृता दुर्वे
    निवेदन - विशाखा निकम
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 4 min

Classement des podcasts dans Forme et santé

ALIGNÉ par Major Mouvement
Major Mouvement
Émotions : le podcast pour mettre des mots sur vos émotions
Louie Media
Métamorphose, éveille ta conscience !
Anne Ghesquière
Notes Vocales (envoyées par Margot YMF)
Margot YMF
Somnifère, le podcast pour s'endormir
Morphée
Tais-toi (aka t'es toi)
WellnessByJade

D’autres se sont aussi abonnés à…

तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
ThePrint
ThePrint
The Morning Brief
The Economic Times
Osho Hindi Podcast
Mahant Govind Das Swami

Plus par BBC

6 Minute English
BBC Radio
Global News Podcast
BBC World Service
Learning English Conversations
BBC Radio
Learning English from the News
BBC Radio
Learning English Vocabulary
BBC Radio
Learning English Grammar
BBC Radio