에피소드 17개

तुला माहितीये त्या दिवशी काय झालं.. अस जरी कोणी म्हटलं तरी आपले कान उभे राहतात. कारण किस्से, गोष्टी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजीच्या राजा-राणीच्या गोष्टींपासुन मोठमोठ्या कादंबरीकारांच्या कल्पनाविस्तारात रमतोच आपण..
लिखाण दोन प्रकारचं असतं..
एक, जे आपण वाचु शकतो आणि स्वत:च्या वैचारीक कुवतीप्रमाणे रंजन करू शकतो..
दुसरे, कोणीतरी शब्दांना छान लयीत ऐकवुन.. डोळ्यासमोर चित्र उभा राहतील अशी अनुभूती देणारं...
आम्ही दुसरा पर्याय निवडला... गोष्टी ऐकवण्याचा.
इच्छा एकदम साधी... ऐकणाऱ्यानं जीवाचे कान केले की आपण शब्दांचा पसा त्याच्या झोळीत रिकामा करायचा.
आता तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आहोत.

GoshtiBishti GoshtiBishti

    • 예술

    जाणुन होतात ना सारं

    जाणुन होतात ना सारं

    कवितेमागची कथा..
    अनेक वर्ष सोबत संसार केलेल्या दोघांपैकी एकजण अचानक साथ सोडून गेल्यानंतर दुसऱ्याची अवस्था चावी हरवलेल्या कुलूपासारखी होते. कुलूप आणि चावी, दोहोंपैकी एक जरी गहाळ झाला तरी दुसरा अस्तित्वहीन आणि उपयोगशुन्य होतो. अडगळ.

    • 3분
    Photogenic

    Photogenic

    गोरं-गोमटं रंग-रूप ही सुंदरतेची व्याख्या नाही. कधी कधी असण्या पाठीमागच्या गोष्टी दिसण्या मुळे ही तुम्हाला ती व्यक्ती सुंदर वाटुच शकते. कॅमेरा हा आरसा नसुन माध्यम आहे आठवणी जमा करण्याचं.

    • 4분
    Connectivity

    Connectivity

    नोकरी व्यवसाय आणि कुटूंब कर्तव्य याचा समतोल साधताना कर्त्या व्यक्तिला आणि त्या गृहिणीला सारख्याच मानसिक स्थितीतुन जावं लागतं. दोघांचा हेतु आणि योगदान सारखच असलं की नातं जिवंत राहतं.
    थोडा देवावर आणि थोडा दैवावर ‘विश्वास’ असला कि कनेक्टिवीटी टिकून राहते.

    • 14분
    Smile Please

    Smile Please

    आपली माणसं घरातच शोधायची नसतात फक्त, बाहेरच्या जगातही ती सापडू शकतात. कोरोना मध्ये आपलं कुटुंब हरवून बसलेल्या माणसाची हृदयस्पर्शी कथा.

    लेखक: प्रा. कौस्तुभ केळकर
    अभिवाचक: विराज मुनोत

    • 4분
    धर्म

    धर्म

    खरा धर्म कोणता ?

    कारण कोणासाठी धर्म अफूची गोळी ठरला तर कोणाला तो तांबडा फॉस्फरस वाटला....
    तर कोणाला तो जीवन जगण्याची कला
    मात्र, खरा धर्म तोच ठरेल
    जो धर्म हा विसंवादी जगात संवाद निर्माण करणारे माध्यम बनेल......

    कवितेमागची कथा :- 'धर्म'

    लेखक:- प्रा. शशिकांत शिंदे
    अभीवाचक:- प्रसाद बेडेकर

    • 9분
    म्हातारी शिवाय

    म्हातारी शिवाय

    घरातल्या म्हातारा म्हातारी चे रूपांतर ग्रँड फादर आणि ग्रँड मदर मध्ये ज्या वेळेला झालं त्या वेळेला हळूहळू त्यांचं आपल्या कुटुंबातले अस्तित्व सुद्धा कमी व्हायला लागले,
    'त्यांच्या शिवाय' आणि 'त्यांच्यासह' याच्यातला फरक ठळकपणे आपल्याला जाणवायला लागला कोणत्याही सृर्जनशील कलाकारासाठी असे विषय नेहमीच नवनिर्मिती साठी पोषक ठरतात...

    कवितेमागची कथा
    लेखक :- प्रा.शशिकांत शिंदे
    अभिवाचन :- प्रसाद बेडेकर

    • 8분

인기 예술 팟캐스트

알릴레오 북's
사람사는세상노무현재단
잠 못 이룬 그대에게
지혜의서재
책읽아웃
예스24
두말하면 잔소리
hemtube 햄튜브
라디오 북클럽 김소영입니다
MBC
이동진의 빨간책방
위즈덤하우스