Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

Team Story Junction

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in

  1. गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad

    06/02/2022

    गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad

    दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यातल्या भावना माणूस असो वा प्राणी, नाती असो वा निसर्ग प्रत्येकासाठी आजही ज्वलंत आहेत. म्हणून ही आपुलकी विरळ का होईना पण जिवंत तर आहे. आजची ही स्टोरीही तीन पिढ्यांची आहे. एका पिढीत माणूसपण जिवंत आहे तर दुसरीत लोप पावलंय, आता हे पुढच्या पिढीला काय देणार हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला ही स्टोरी ऐकायला हवी. गोष्टीचं नाव आहे, गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!  ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने व कंपोज केलीये आकाश जाधव ने. विरळ होत चालेल्या भावनेवर आजही नितांत प्रेम करणाऱ्यांना समर्पित. गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in instagram - @sjm_podcast

    9 min
  2. 02/23/2022

    मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot Com

    नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एकदा नक्की येते आणि आयुष्य वाटेवर अनन्या ऐवजी पार वाट लावून जाते. तुम्ही जर जॉबलेस असाल तर हि स्टोरी तुमचीच आहे आणि जॉबलेस नसाल तरीहि तुमचीच आहे . Enjoy करा - मूर्खांचा बाजार डॉट कॉम Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    9 min
  3. Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)

    नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आज विविध देशांमधून आपल्यासोबत ३०,००० हून अधिक लोक जोडले गेलेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या Series चे सगळे Episodes upload केलेत; तर तुमच्या Entertainment मध्ये कुठेही खंड पडणार नाही याची आम्ही खात्री देतो. Enjoy करा - 'The Last Chapter' चा पहिला भाग, ज्याचं नाव आहे, 'पुढे काय?' Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    11 min
  4. Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर)

    सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दयी माणसांची गर्दी आहे, तिला तोंड दिलं तर जिंकला, नाहीतर संपला. मुळात सचिन आता जाणार तरी कुठे? कुठे राहणार? प्रश्न खूप आहेत, म्हणून आता वेळ न घालवता ऐका 'The Last chapter' चा दुसरा भाग, गोदावरी! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    10 min
  5. Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)

    स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं,  कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक कोपरा आणि जीवाला क्षणिक विसावा दिला. पण रस्त्यातल्या मोजक्या काट्यांना सचिन फार लवकर कंटाळला. कदाचित त्याला आपल्या निर्णयावरच पश्चाताप झाला, पण गोष्ट इथे संपत नाही तर सुरु होते! कशी ते जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा तिसरा भाग, पुनर्जन्म! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    10 min
  6. Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर)

    मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक्त एकदा विचारपूर्वक असा विचार करायला हवा की, खरंच संपलं सगळं? यहां हर चीज का सोल्युशन हैं मेरे भाई, इथे कधीच पर्याय संपत नाहीत. असो, सचिनच्या आयुष्यात आता ही काय नवीन भानगड येऊन ठेपलीये हे जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा चौथा भाग बुकमार्क! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    14 min
  7. Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर)

    गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असले तरी त्यांची उत्तरं काही जास्त लांब नाही, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, त्यासाठीच ऐका 'The Last Chapter'चा पाचवा भाग, अनपेक्षित! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    17 min
  8. Ep. 6. Purnviram (The Last Chapter) | पूर्णविराम (द लास्ट चॅप्टर)

    05/31/2021

    Ep. 6. Purnviram (The Last Chapter) | पूर्णविराम (द लास्ट चॅप्टर)

    मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या भागात काय झालं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची घाई झालीये ना? सो उगाच वेळ न घालवता ऐका 'The Last Chapter'चा शेवटचा एपिसोड पूर्णविराम.. Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte  Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

    14 min

Trailer

About

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in