Harsha's Ear Treat.

Harsha Shethji

गीत रामायण!

  1. Aug 3

    #कोठे सीता जनकनंदिनी #गीत रामायण भाग 32##जयश्रीराम!@harshaseartreat

    याचका थांबू नको दारात! अशा प्रकारे सीतेच्या आक्रोशाला न जुमानता रावणाने लंकेचा रस्ता धरला.इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत आणि लक्ष्मण त्यांच्या दृष्टीस पडतो.तेव्हा प्रभू श्रीरामांच्या हृदयात चर्र होतं.काहीतरी अशुभ घडलं असावं असं त्यांना वाटतं. दोघे आश्रमामध्ये येतात. पर्ण शाळेमध्ये सीता नव्हती.साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम आजूबाजूला हिंदू लागले, शोध करू लागले आणि व्याकुळतेने सीतेला हाका मारू लागले आणि काय म्हणू लागले ऐकू या....... #कोठे सीता जनकंदिनी! गीत रामायण भाग 32

    #कोठे सीता जनकनंदिनी #गीत रामायण भाग 32##जयश्रीराम!@harshaseartreat
  2. 02/11/2025

    सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण! भाग-29

    'कोण तू कुठला राजकुमार! 'असे लाडीगोडीने श्रीरामांना विचारणाऱ्या शूर्पणखेला प्रभू श्रीराम लक्ष्मणाकडे पाठवितात आणि बंधू लक्ष्मण परत तिला प्रभू श्रीरामांकडे पाठवितो . दोघेही बंधू आपल्याला ऐकत नाहीत हे पाहून शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावून जाते तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा करतात या राक्षसीला विरूप करून टाक . ती विरूप राक्षसीआपले बंधू खरदूषण यांचा प्रभू श्रीरामांनी वध केल्यानंतर आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर जाऊन उभी राहते .सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला काय म्हणते ऐकू या.... सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण भाग- 29!@harshaseartreat

    सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण! भाग-29
  3. 12/06/2024

    कोण तू कुठला राजकुमार! गीत रामायण भाग 28

    "मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!" हे भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले दान प्रभू श्रीराम नाकारू शकले नाहीत. भरताने त्या पादुकांना राज्याभिषेक केला आणि स्वतः त्या राज्याचा कारभारी म्हणून कारभार पाहू लागले. इकडे प्रभू श्रीरामाने चित्रकूट सोडला आणि ते दक्षिणेला निघाले. वाटेत त्यांनी अनेक राक्षसांचा नायनाट केला .10 वर्षानंतर ते गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा या पर्णशाळेच्या ओट्यावर प्रभू श्रीराम,बंधू लक्ष्मण आणि माता जानकी सह वार्ता विनोद करत असताना एक अद्भुत स्त्री तिथे आली .ती प्रभू श्रीरामांना न्याहाळत हलके हलके मंजुळ स्वर काढत प्रभू श्रीरामांना काय म्हणाली ? ऐकू या ...... कोण तू कुठला राजकुमार !गीत# रामायण भाग 28 जय #श्रीराम​!@harshaseartreat.

    कोण तू कुठला राजकुमार! गीत रामायण भाग 28

About

गीत रामायण!