कर्तव्य साधना | Kartavya Sadhana

Kartavya Sadhana | कर्तव्य साधना

माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!

  1. ऑडिओ - मित्रभूषण पं. भीमसेन जोशी | भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने..

    02/04/2022

    ऑडिओ - मित्रभूषण पं. भीमसेन जोशी | भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने..

    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिवर्षाची सांगता 4 फेब्रुवारी 2020 रोजी होते आहे. 4 फेब्रुवारी 1922 ते 24 फेब्रुवारी 2011 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भीमसेनजींनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एक मोठा काळ गाजवला आहे. सवाई गंधर्वांकडून किराणा घराण्याची तालीम त्यांनी घेतली, मात्र स्वतःला भावलेल्या इतरही अनेक ज्येष्ठ गायकांच्या संगीतातील गुणवैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली आणि स्वतंत्र शैली घडवली. ख्यालासह ठुमरी, अभंग, नाट्यपदे, सिनेगीते अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली आहे. 'साधना'चे भूतपूर्व संपादक, कवी वसंत बापट हे भीमसेनजींच्या निकटवर्तीयांपैकी. भीमसेनजींच्या 'अभंगवाणी' या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी वसंत बापट अनेकदा निरुपण करत असत. भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 2003 च्या दिवाळी अंकातील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी' हा लेख ऑडिओ स्वरूपात पुन्हा भेटीला आणतो आहोत. साहित्य-संगीताचे मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी यांचा हा लेख, त्यांच्या आणि भीमसेनजींच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत भीमसेनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनवट पैलू उलगडणारा आहे. 50 मिनिटांच्या या ऑडिओसाठी सुहास पाटील यांनी अभिवाचन केले आहे. साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवरील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी'  वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हेही वाचा : अमृताचे डोहीं अमृततरंग - वसंत बापट भारतीय संगीताचा मानदंड : पंडित भीमसेन जोशी - श्रीराम पुजारी  बहुजनगायक - विनय हर्डीकर

    49 min
  2. Women Farmers, their Problems, Issues are aloof...

    01/12/2022

    Women Farmers, their Problems, Issues are aloof...

    On the occasion of National Youth Day, Kartavya Sadhana is publishing an audio series titled- “In Conversation with.....” The series is comprised of three interviews of individuals working in their field for a long time. Their lives, work, and their life choices have a lot to inspire, inspire youth, young people of society.  In this insightful conversation with Kavitha Kuruganti, we tried to understand her life journey, her area of work i.e. agriculture. Kavitha witnessed an entire farmer protest at the Singhu border. We touched upon contemporary issues of farmers. How she looks at agriculture and youth! Kavitha is a food activist, a Founder Convener of the Alliance for Sustainable & Holistic Agriculture (ASHA) which played a huge role in ripping off the Pepsico rights over the FC5 potato variety. She has dedicated her life to ensure sustainable farm livelihoods and farmers' rights.   National Youth Day is commemorated in the honor of a great philosopher and monk Swami Vivekananda. In 1985, the Government of India declared Swami Vivekananda's birthday – January 12 - National Youth Day. The day is marked to celebrate his life and teachings that have encouraged millions across the world. On the backdrop of National Youth Day, we are publishing comprehensive interviews of people who can be an inspiration for youth.   - - - - - - - - - - - - Follow / Subscribe us on:  Website - www.kartavyasadhana.in/  Facebbok - www.facebook.com/kartavyasadhana1/  Instagram - www.instagram.com/kartavya_sadhana/  Telegram Channel - https://t.me/kartavyasadhana

    1 hr
  3. निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

    08/19/2021

    निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

    1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 'लढे अंधश्रद्धेचे' या पुस्तकातून मांडली. 2018 मध्ये साधना प्रकाशनाकडून या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. हे पुस्तक आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel.com) आले असून त्याचे वाचन केले आहे हर्षल लवंगारे यांनी. या पुस्तकातील 'निपुत्रिकांना संतती देणारी पार्वती माँ' हे एक प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. या पुस्तकातील इतर प्रकरणे स्टोरीटेलवर ऐकता येतील, त्यासाठी  स्टोरीटेलचे subscriptions आवश्यक आहे.   - - - - - - - - - - - -  Follow us on:  www.kartavyasadhana.in/  www.facebook.com/kartavyasadhana/  www.instagram.com/kartavya_sadhana/

    20 min
  4. 07/16/2021

    इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल? | The Future of Israel-Palestine Conflict

    कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल? आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? - - - - - - - - - Follow us on: www.kartavyasadhana.in/ www.facebook.com/kartavyasadhana/ www.instagram.com/kartavya_sadhana/ www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana

    33 min
  5. 07/15/2021

    इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? | How to look at Israel-Palestine Conflict

    कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? | How to look at Israel-Palestine Conflict आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? - - - - - - - - - Follow us on: www.kartavyasadhana.in/ www.facebook.com/kartavyasadhana/ www.instagram.com/kartavya_sadhana/ www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana

    21 min

About

माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!