"राज"कारण " Rajkaran

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

  1. 3d ago

    RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेट

    विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबतचं त्यांचं राजकीय नातंही विशेष चर्चेत राहिलं. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. त्यांच्या बंडखोर राजकारणाची, संघर्षाची आणि राजकीय प्रवासाची ही कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jambuwantrao Dhote, Jambuwantrao Dhote History, Vidarbha Politics, Vidarbha Tiger, Maharashtra Politics, Jambuwantrao Dhote Biography, Maharashtra Political History, Balasaheb Thackeray, Forward Bloc, Separate Vidarbha

  2. Sep 25

    RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं रा

    कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि त्याच काळात नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी श्रीधर नाईकांकडे आली आणि काँग्रेसचा मोठा विजय झाला. मात्र काही महिन्यांतच कणकवली बाजारपेठेत त्यांची हत्या झाली. या प्रकरणात 13 जणांवर आरोप झाले, त्यात नारायण राणेंचाही समावेश होता. 1997 मध्ये राणेंसह नऊ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. या हत्याकांडानंतर कोकणातील राजकीय संघर्षाला वेगळं वळण मिळालं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shridhar Naik, Narayan Rane, Konkan Politics, Sindhudurg Politics, Shridhar Naik Murder, Maharashtra Politics, Youth Congress, Kankavli Murder Case, Political History Maharashtra, Konkan Political Rivalry

  3. Sep 18

    RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट रा

    काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच पद्धतीने झाला. कोयना धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी थेट विचारलं, ‘काँग्रेसचे सभासद कधी होणार?’ आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहितेंनी काँग्रेस सदस्यत्वावर सही केली. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या मोहितेंच्या काँग्रेस प्रवेशाची संपूर्ण राजकीय कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Yashwantrao Mohite, Yashwantrao Mohite Congress Entry, Yashwantrao Chavan, Jawaharlal Nehru, Congress Maharashtra Politics, Shetkari Kamgar Paksha, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra Politics History, Yashwantrao Mohite Biography, Maharashtra Congress History

  4. Sep 11

    RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अड

    स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिवस राजभवनाचा घेराव सुरू राहिला. राज्यपालांनी गुपचूप बाहेर पडल्यावर निर्माण झालेला तणाव शरद जोशींनी शांततेने हाताळला. शेतकरी संघटनेपासून राज्यसभा खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि अत्यंत साधं वैयक्तिक आयुष्य या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sharad Joshi, Sharad Joshi Farmer Leader, Shetkari Sanghatana, Punjab Farmers Protest, Chandigarh Raj Bhavan Protest, Maharashtra Farmer Movement, Sharad Joshi Biography, Indian Farmer Movement, Farmers Protest History, Sharad Joshi Politics

  5. Sep 4

    RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली

    १९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सल्ल्याने अंतुलेंचा लातूरमध्ये भव्य सत्कार आयोजित केला. याच कार्यक्रमात विलासरावांनी अंतुलेंकडे एक मागणी केली—लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्या. अंतुलेंनी व्यासपीठावरून क्षणार्धात ही मागणी मान्य केली. प्रशासकीय अडचणींवर मात करत १९८२ मध्ये लातूर स्वतंत्र जिल्हा झाला. तब्बल २५ वर्षांनी, २००७ मध्ये मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांनी लातूरच्या रौप्य महोत्सवासाठी अंतुलेंना विशेष निमंत्रित करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. नाराजीपासून सुरू झालेली ही कथा पुढे राजकीय कृतज्ञतेच्या भावनिक नात्यात बदलली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, A R Antulay, Vilasrao Deshmukh, Latur District, Latur District Formation, Maharashtra Politics, Maharashtra Political History, Latur History, Abdul Rahman Antulay, Vilasrao Deshmukh Biography, Maharashtra Chief Ministers

  6. Aug 28

    RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले

    ११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९ मध्ये त्यांचं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. त्यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार असतानाही गणपतरावांना मुख्यमंत्री करण्याचा विचार झाला आणि त्यावर सहमतीही झाली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र हे समीकरण प्रत्यक्षात आलं नाही. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया गणपतआबांच्या राजकीय प्रवासाची आणि त्या अपूर्ण राहिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या गोष्टीची कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ganpatrao Deshmukh, Ganpat Aaba, Maharashtra Politics, 11 Time MLA, Sangola Politics, Shetkari Kamgar Paksha, Maharashtra Chief Minister, 1999 Maharashtra Politics, Ganpatrao Deshmukh Biography, Maharashtra Political History

  7. Aug 21

    RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वे

    पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीवर त्यांनी विलासराव देशमुखांसाठी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यानंतर २००३, २००४, २००८, २००९ आणि २०१० मध्ये त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा झाली; मात्र प्रत्येकवेळी संधी हुकली. तरीही मंत्री म्हणून शिक्षण, पाणी, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहिलं. त्यांच्या संघर्षाची आणि राजकीय कारकिर्दीची ही रंजक कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Patangrao Kadam, Patangrao Kadam Political Journey, Maharashtra Politics, Maharashtra Chief Minister, Vilasrao Deshmukh, Shankarrao Chavan, Congress Politics, Maharashtra Congress, Patangrao Kadam Biography, Palus Kadegaon Politics

  8. Aug 14

    RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देणार होते; पण एका निर्धारानं सगळं चित्रच

    बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे आणीबाणीला दिलेला पाठिंबा. इंदिरा गांधींच्या काँग्रेससोबतची जवळीक, १९७७ आणि १९७८ मधील निवडणुकीतील पराभव, शिवाजी पार्कवरील राजीनाम्याचा भावनिक प्रसंग आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली हिंदुत्वाची वाटचाल, या सगळ्याने पक्षाचं राजकारण बदललं. एकेकाळी काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या शिवसेनेने पुढे काँग्रेसशी संबंध तोडत भाजपसोबत हिंदुत्वाच्या राजकारणाची आघाडी कशी उभी केली? बाळासाहेबांच्या एका निर्धाराने शिवसेनेचं पुढचं राजकीय भविष्य कसं घडलं? जाणून घ्या या पॉडकास्टमध्ये शिवसेनेच्या राजकीय प्रवासाची ही महत्त्वाची कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Emergency 1975, Indira Gandhi, Congress, Maharashtra Politics, Shiv Sena History, Hindutva Politics, Shivaji Park, Indian Politics

About

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

More From Bingepods