पुस्तक गप्पा (पुस्तकगप्पा)

PustakGappa Podcast

मराठी साहित्य, नाटके , सिनेमे इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणी Pustak Gappa PustakGappa

  1. FEB 7

    सानियाशी गप्पा आणि ’स्थलांतर’ची इ-आवृत्ती

    पुस्तकगप्पा सत्र चोविसावे या वर्षातल्या पहिल्या #पुस्तकगप्पा सानियाशी. निमित्त आहे ’भास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ’स्थलांतर’ या तिच्या कादंबरीच्या इ-प्रतीचं. मांजरपावलांनी येणार्‍या आणि त्यांच्या वेगळेपणानं थक्क करून जाणार्‍या; अनाग्रही, मितभाषी आणि लखलखीत विधान करणार्‍या तिच्या कथा. तशाच तिच्या कादंबर्‍याही. त्यातही ’स्थलांतर’ विशेष आवडीची. ती प्रथम प्रकाशित झाल्याला तीस वर्षं उलटून गेली. सानियाचं मनोगत, मेघनाचं आजचं आकलन सांगणारं एक टिपण, आणि तेजस मोडकची काही सुरेख रेखाचित्रं असं घालून तिची इ-प्रत प्रकाशित करतो आहोत. https://www.amazon.com/dp/B0FQ6PS4QK

    1h 21m
  2. 01/06/2025

    पपायरस प्रकाशनच्या भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांच्या भौतिक रूपाबद्दल केलेल्या गप्पा.

    आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा पुष्कळ विचार आणि ठाम मतं आहेत.  मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल केलेल्या गप्पा.  सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट  युट्युब ब्लॉग  फेसबुक

    1h 59m
  3. 12/14/2024

    पेगी मोहन यांच्या "वाँडरर्स किंग्स मर्चंट्स" बद्दल चिन्मय धारूरकर यांच्याशी गप्पा

    पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची ग्वाही देणारंही आहे. त्याचं भाषांतर मनोविकास प्रकाशानातर्फे प्रकाशित होतंय. त्याबद्दल भाषावैज्ञानिक चिन्मय धारूरकर यांच्याशी जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय धारूरकर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.

    2h 20m

About

मराठी साहित्य, नाटके , सिनेमे इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणी Pustak Gappa PustakGappa