राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

Rajhans Prakashan

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.

  1. सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book

    MAR 4

    सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book

    स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोप आवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या आवाजात... Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suman-kalyanpur-samana-kalyanaepara Book: Suman Kalyanpur Author: Aparna Sant Podcast Host: Shirish Sahasrabuddhe Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    34 min
  2. Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration

    FEB 25

    Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'...डंदॅट् बींदेअर् या आपल्या नवीन पुस्तकातील काही निवडक भाग सादर करताहेत लेखिका मेघना पेठे Book - Done That Been There Author and Publisher - Meghana Pethe Distributor - Rajhans Prakashan Recording - AK Studio Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    16 min
  3. धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review

    FEB 4

    धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review

    Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी... Book: Dhulakshare Te Shalyakaushalya Author: Dr. Dyaneshwar Dusane Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    26 min
  4. हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan

    JAN 21

    हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan

    हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं...दिलीप कुलकर्णी लिखित हरित हिंदुत्व या पुस्तकातील निवडक भाग आपण ऐकणार आहोत ओंकार थोरात यांच्या आवाजात. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    17 min
  5. वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan

    JAN 14

    वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan

    ‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या त्यांच्या काळ्यानिळ्या रेषा या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. #marathipodcast #rajhansimohor Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    37 min
  6. नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati

    12/24/2025

    नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati

    नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'. सुनीता लोहोकरे लिखित नाट्यभारती हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलं आहे. यानिमित्तानं या सुनीता लोहोकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम जोग यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    36 min
  7. 12/10/2025

    मेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book Narration

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं पुस्तक - मेड इन चायना Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    11 min
  8. 12/03/2025

    ऑक्सिजन: पर्यावरणाच्या समस्येला भिडणारी भविष्यवेधी कादंबरी

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/oxygen-oikasajana पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं?आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी! Book: Oxygen Author: Dr Ranjan Garge Narrator: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #bookreading #marathipodcast #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    12 min

About

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.