CORE Inner Work

Dr Amit Karkare

'CORE Inner Work' is a guided meditation and inner work process, developed by Dr Amit Karkare, for emotional healing, self-awareness and meaningful change. Explore anxiety, stress, confidence, self-image, procrastination, anger, fear, relationships, grief, trauma, cravings, habits and recurring emotional patterns. Combining mindful awareness, rational thinking, guided meditation and subconscious exploration, CORE helps you understand what keeps repeating and create a deeper inner shift. Understand the pattern. Change from within.

  1. 5h ago

    गर्भावस्थेतील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी विवेकी ध्यान | Dr. Amit's CORE Inner Work

    गर्भावस्था हा केवळ शरीरात होणारा बदल नाही, तर एका स्त्रीच्या आयुष्यातील एक खोल आणि सुंदर अंतर्मनाचा प्रवास आहे.या काळात आनंद, उत्सुकता आणि प्रेमासोबत अनेक प्रश्नही मनात येतात... “बाळाची वाढ नीट होईल ना?” “प्रसूती व्यवस्थित होईल ना?” “आई झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मला झेपतील ना?” “मी चांगली आई होईन ना?” या प्रश्नांमागे अनेकदा प्रेम असते, पण त्यासोबत भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि भीतीही असू शकते. या Pregnancy CORE Inner Work Meditation मध्ये त्या भावनांना दाबून न ठेवता, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हे ध्यान तुम्हाला हळूहळू भीतीपासून विश्वासाकडे, अस्वस्थतेपासून स्थैर्याकडे, नियंत्रणाच्या गरजेपासून स्वीकाराकडे आणि “मला हे सगळे झेपेल ना?” या प्रश्नापासून “मी एकावेळी एक पाऊल घेऊ शकते” या भावनेकडे घेऊन जाते. या ध्यानातील एक महत्त्वाचा भाग आहे “मुलगी ते आई” हा नैसर्गिक प्रवास. हे ध्यान गर्भावस्थेतील भावनिक स्थैर्य, शांतता आणि अंतर्मुखतेसाठी आहे. हे वैद्यकीय उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय नाही. गर्भावस्थेशी संबंधित कोणतीही वैद्यकीय चिंता असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. CORE Inner Work ही अंतर्मुख प्रक्रियेकडे पाहण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपल्या भावनिक आणि वर्तनात्मक patterns च्या मुळाशी जाऊन त्यांच्याकडे अधिक जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला जातो. Dr Amit Karkare CORE Inner Work #PregnancyMeditation #PregnancyMindfulness #PregnancyAnxiety #PrenatalMeditation #PregnancyWellness #MotherhoodJourney #COREInnerWork #GuidedMeditation #PregnancySupport #DrAmitKarkare

    गर्भावस्थेतील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी विवेकी ध्यान | Dr. Amit's CORE Inner Work
  2. Sep 13

    स्वामी समर्थ तारक मंत्र ध्यान | नि:शंक हो | डॉ. अमित करकरे | CORE Inner Work

    "नि:शंक हो" - स्वामी समर्थांच्या तारक मंत्रातले हे दोन शब्द आजच्या ध्यानाचा गाभा आहेत. साधे वाटणारे हे शब्द, पण त्यांच्या आत एक खोल अर्थ दडलेला आहे. रोजच्या आयुष्यात शंका, भीती आणि सतत सगळं आपल्या नियंत्रणात असावं ही जी आतली धडपड असते, तीच आपल्याला अस्वस्थ करत राहते. या ध्यानात आपण त्या धडपडीला जरा बाजूला ठेवून, श्रद्धा आणि विवेक यांची सांगड घालत, स्वामींवर अधिक खोल विश्वास ठेवण्याचा सराव करणार आहोत. शांत जागी बसा, शक्य असल्यास हेडफोन्स लावा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. हे संपूर्ण ध्यान आपल्या यूट्यूब चॅनेल @dramitkarkare वर ऐकता येईल. 🙏 #निशंकहो #स्वामीसमर्थ #तारकमंत्र #COREInnerWork #मराठीध्यान #डॉअमितकरकरे

    स्वामी समर्थ तारक मंत्र ध्यान | नि:शंक हो | डॉ. अमित करकरे | CORE Inner Work
  3. Feb 7

    पितृ दोष मुक्ती (हिंदी)

    यह ध्यान “पितृ दोष” की अवधारणा को अंधविश्वास की बजाय वंशपरंपरा से मिले मानसिक-भावनात्मक प्रभावों को विवेकपूर्ण दृष्टि से देखता है।पिछली पीढ़ियों के दुःख, अपमान, असफलताएँ, भय या अविवेकी मान्यताओं के संस्कार अनजाने में हमारे विचारों, भावनाओं और जीवन की दिशा को प्रभावित कर सकते हैं। इस RSS (Rational Self-Soothing) आधारित ध्यान में, साक्षीभाव से निरीक्षण करते हुए हम वह सब शांतिपूर्वक छोड़ देते हैं जो वास्तव में हमारा नहीं है—आदर और कृतज्ञता के साथ। यह साधना किसी भी कर्मकांड या भय का निर्माण नहीं करती।यह आंतरिक स्पष्टता, स्थिरता और हल्केपन का अनुभव देने वाली शांत, सुरक्षित और विवेकपूर्ण ध्यान-प्रक्रिया है। 🎧 शांत स्थान पर, आँखें बंद करके सुनें।अतीत का सम्मान रखते हुए,शांत और मुक्त भविष्य की ओर आगे बढ़ने के लिए।

    पितृ दोष मुक्ती (हिंदी)
  4. Feb 6

    पितृ दोष मुक्ती (मराठी)

    हे ध्यान “पितृ दोष” या संकल्पनेकडे अंधश्रद्धेऐवजी वंशपरंपरेतून आलेल्या मानसिक-भावनिक ठशांच्या विवेकी दृष्टिकोनातून पाहते. मागील पिढ्यांमधील दुःख, अपमान, अपयश, भीती किंवा अविवेकी समज यांचे संस्कार नकळत आपल्या विचारांवर, भावनांवर व आयुष्यातील प्रवाहावर परिणाम करू शकतात. या RSS (Rational Self-Soothing) आधारित ध्यानात, साक्षीभावाने निरीक्षण करत आपण जे आपले नाही ते शांतपणे सोडून देतो—आदर व कृतज्ञतेसह. ही साधना कोणतेही कर्मकांड किंवा भय निर्माण करत नाही. ती अंतर्गत स्पष्टता, स्थैर्य व हलकेपणा देणारी शांत, सुरक्षित आणि विवेकी ध्यानप्रक्रिया आहे. 🎧 शांत ठिकाणी, डोळे मिटून ऐका. भूतकाळाचा सन्मान राखत, शांत व मुक्त भविष्याकडे पुढे जाण्यासाठी.

    पितृ दोष मुक्ती (मराठी)
  5. Jan 28

    सोsहम् सोsहम्

    विचार आणि जबाबदाऱ्या बाजूला ठेवून विश्वचैतन्यशक्तीशी जोडणारा प्रवास हे १५ मिनिटांचं विवेकी-ध्यान (Rational Self-Suggestion) आपल्याला बाह्य जगाच्या कोलाहलापासून मुक्त करतं आणि विश्वातील सर्वोच्च दिव्य ऊर्जेशी जोडतं. या ध्यानाचा उपयोग तुम्हाला खालीलसाठी होईल: 🌿 कामाचे ताण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, अपराधीपणा, पश्चात्ताप, आर्थिक चिंता—हे सगळं हलकं करून सोडून देण्यासाठी 🧘‍♀️ काही क्षणांसाठी शांत, स्थिर, निर्विचार अशा स्थितीत जाण्यासाठी ✨ ‘मी कोण आहे?’ याच्या पलीकडे जाऊन शुद्ध शांततेचा अनुभव घेण्यासाठी 🌌 आणि पुन्हा एकदा आपल्या अंतरात्म्याशी व विश्वातील चैतन्य ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी सोsहम् हे ध्यान Rational Self-Suggestion (RSS) या तंत्रावर आधारित आहे. मनाच्या गाभ्याशी पोहोचून, ते शांती, स्थैर्य आणि जागरूकतेकडे नेण्याचे हे प्रभावी साधन आहे. जर तुम्ही सध्या तणाव, गोंधळ, किंवा विचारांच्या ओझ्याने थकल्यासारखं वाटत असेल, तर हे विवेकी-ध्यान तुम्हाला एक नितळ, निर्मळ, अंतर्मुख शांतीचा अनुभव देईल. 🎧 कृपया शांत जागी, डोळे बंद करून, हेडफोन्ससह ऐका.

    सोsहम् सोsहम्

About

'CORE Inner Work' is a guided meditation and inner work process, developed by Dr Amit Karkare, for emotional healing, self-awareness and meaningful change. Explore anxiety, stress, confidence, self-image, procrastination, anger, fear, relationships, grief, trauma, cravings, habits and recurring emotional patterns. Combining mindful awareness, rational thinking, guided meditation and subconscious exploration, CORE helps you understand what keeps repeating and create a deeper inner shift. Understand the pattern. Change from within.