ग्रंथप्रेमी - Granthpremi

Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

  1. 5d ago

    कैलास एक अंतर्वेध पुस्तकाचे अभिवाचन

    कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान 'दोलमा पास'सारखा मृत्यूचा रस्ता पार करताना साक्षात भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडणे शक्य आहे का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात ऐका परमहंस वेदानंदजी लिखित आणि सौ. सिद्धेश्वरी ठोंबरे यांनी अनुवादित केलेल्या 'कैलास एक अंतर्वेध' या ग्रंथातून एका छोट्या भागाचे अभिवाचन. उणे तापमान, प्राणवायूची तीव्र कमतरता आणि तरी डोळ्यांत अश्रू आणणारे ते अलौकिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला कैलास शिखराच्या जिवंत सफरीवर घेऊन जातील. महत्त्वाचे मुद्दे: • दोलमा पासचे गूढ • वैश्विक ऊर्जेची अनुभूती • श्रीदत्त प्रभुंचे दर्शन • गौरीकुंडाचे रहस्य

  2. Sep 4

    What Triggered An Intese Kundalini Shift ? Ft Tejal Patrikar

    Uncover a powerful spiritual encounter that didn't make it to the main episode. The speaker reveals a startling dream experience where a moment of complete surrender triggered an intense, earthquake-like Kundalini shift within. This rare clip explores the hidden side of Indian classical art—from high-speed dance turning into deep meditation, to legendary flute maestro Keshav Ginde losing track of time during a 3.5-hour initiation by Gulawani Maharaj. What happens when music moves past external sound to unlock the unspoken inner sound (Anahata Nad)? Watch to find out. Key Topics Covered: A Divine Awakening: An experience triggering an intense Kundalini shift. Meditation in Motion: Entering deep states of bliss through music and dance. The Unspoken Sound: Moving beyond technical music to experience Anahata Nad. A Timeless Initiation: The story of Keshav Ginde and Gulawani Maharaj. मुख्य एपिसोडमध्ये न आलेली एक अलौकिक अध्यात्मिक अनुभूती या व्हिडिओमध्ये पाहा! एका स्वप्नात संपूर्ण शरणागत भाव पत्करल्यावर आतून तीव्र कुंडलिनी जागरण कसे घडले, याचा एक थक्क करणारा अनुभव इथे शेअर केला आहे. भारतीय कलेची एक अप्रकाशित बाजू उलगडणारी ही दुर्मिळ क्लिप आहे— वेगवान नृत्य थेट ध्यानावस्थेत रूपांतरित होते आणि बासरीवादक केशव गिंडे पूज्य गुळवणी महाराजांकडून दीक्षा घेताना ३.५ तास पूर्णपणे काळाचे भान हरपून बसतात. संगीत जेव्हा बाह्य सुरांच्या पलीकडे जाऊन अंतरात्म्यातील ‘अनाहत नाद’ उघड करते, तेव्हा काय घडते? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा!

  3. Aug 28

    Merit Is a Myth Created by the Rich

    दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर जगाची खबरबात'. सुरुवात झाली NEET पेपरफुटीपासून, आणि गप्पा येऊन थांबल्या अशा एका मुद्द्यावर ज्यावर फारसं कुणी बोलत नाही — "सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं का शोधतो..?" सरकारी शाळेचा दर्जा घसरला? मुलाला खाजगी शाळेत घाला. बस वेळेवर येत नाही? स्वतःची गाडी घ्या. महापालिकेचं पाणी येत नाही? टँकर मागवा. कमावलेल्या शंभर रुपयांतले चाळीस रुपये नेमक्या याच तीन गोष्टींवर खर्च होतात — ज्या मुळात सरकारने करायच्या होत्या. अजून काय पाहाल या भागात? गुणवत्तेचं मिथक, सत्योत्तर जग (post-truth) म्हणजे नेमकं काय · वाजपेयींनी २००० साली संशोधनासाठी दिलेलं वचन काय होते, जे सव्वीस वर्षांनंतरही अपूर्ण आहे · आणि AI मुळे आपली प्रतिभा खरंच धोक्यात आहे का? श्रीधर लोणी यांनी लिहीलेल्या "सत्योत्तर जगाची खबरबात" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/satyottar-jagachi-khabarbat

  4. Aug 21

    Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest

    धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी! राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest. लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात अरुणिमा सिन्हा यांच्या 'बोर्न अगेन ऑन द माउंटेन' (अनुवाद: फिरुनी पुन्हा जन्मले मी - बापू करंदीकर) या आत्मचरित्राचे हृदयस्पर्शी अभिवाचन करण्यात आले आहे. ही फक्त शिखर सर करण्याची गोष्ट नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची गोष्ट आहे - शेवटपर्यंत नक्की ऐका.

About

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi