Dehbhan

Niranjan Medhekar

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/

  1. 2d ago

    How to Stop Premature Ejaculation Naturally | Dr Aniket Kulkarni

    Does s*x need to last a certain amount of time? Does early ejaculation always mean premature ejaculation? And is it caused only by excitement or anxiety?लस्ट स्टोरीज या सिरीजचा तिसरा सिझन नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. तो मी अजून बघितला नसला तरी स्त्रीकेंद्री अशा या सिरीजमध्ये स्त्रियांची लैंगिकता, त्यांचं प्लेजर, इंटिमसी यावर बराच खल असून, बऱ्याचदा पुरुष स्त्रीला शरीरसुख देण्यात कमी पडतो का असा तक्रारवजा सूर दिसतो. इथं एक मूलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे सेक्स-समागम प्रत्यक्ष किती वेळ चालायला हवा? वीर्यस्खलन लवकर झालं म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास आहे का? आणि ही समस्या केवळ अतिउत्तेजनेमुळे किंवा मनातल्या भीतीमुळे निर्माण होते का?शीघ्रपतनाविषयी पुरुषांच्या मनात अनेक प्रश्न असतात; पण संकोचामुळे ते डॉक्टरांशी बोलत नाहीत. त्यातून इंटरनेटवरील उपाय, स्प्रे, तेलं किंवा तथाकथित शक्तिवर्धक औषधांचा आधार घेतला जातो आणि समस्या आणखी गंभीर होऊ शकते. शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं, त्यावर नियंत्रण मिळवता येतं का आणि त्यासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी या भागात आम्ही सविस्तर चर्चा केलीय. Credits: Guest: Dr Aniket Kulkarni, Consultant Sexologist, BeedContact No: 9168420242 | www.draniketkulkarni.in Co-Producer and Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPCo-Producer: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana

    How to Stop Premature Ejaculation Naturally | Dr Aniket Kulkarni
  2. Sep 19

    आपले कान १०० वर्ष जगलो तरी शाबूत राहू शकतात जर आपण...| Dr. Kalyani Mandke

    मोठ्या आवाजामुळे खरंच आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम म्हणजे hearling loss होऊ शकतो का? DJ, Dolby, ढोल-ताशा, हेडफोन आणि वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा आपल्या कानांवर नेमका काय परिणाम होतो? Djbandiढोल-ताशाच्या प्रॅक्टिसनंतर एका 17 वर्षांच्या मुलीला कानात दडा बसल्यासारखे वाटले. तपासणीनंतर तिच्या ऐकण्यावर परिणाम झाल्याचे समोर आले. अशा घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात — **मोठा आवाज किती वेळ ऐकणे सुरक्षित आहे?या भागात आपण जाणून घेणार आहोत:• DJ, Dolby आणि ढोल-ताशाचा मोठा आवाज किती धोकादायक ठरू शकतो?• किती Decibel आवाज सुरक्षित मानला जातो?• अचानक कमी ऐकू येणे तात्पुरते असते की कायमस्वरूपी?• कानात दडा बसल्यास काय करावे?• कानात तेल किंवा इतर घरगुती उपाय करणे योग्य आहे का?• Headphones वापरताना Volume किती ठेवावे?• ऐकण्याच्या क्षमतेत बदल झाल्याची सुरुवातीची चिन्हे कोणती?• तपासणी कधी करून घ्यावी आणि स्वतःच्या कानांची काळजी कशी घ्यावी?या महत्त्वाच्या विषयावर श्रवण शास्त्रज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांच्याशी निरंजन मेढेकर यांनी केलेला सविस्तर संवाद.05:17 — DJ ढोल-ताशा ऐकल्यामुळे कान खराब होतात का?07:55 — सततच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा येतो का?15:25 — किती Decibel आवाज कानांसाठी धोकादायक आहे?17:42 — कानात दडा बसल्यास काय करावे?35:47 — मोठ्या आवाजाचा प्राणी पक्ष्यांवर काय परिणाम होतो?50:22 — Headphones किती Volume वर वापरावे?🎧 ऐकण्याची क्षमता आपण सहज गृहीत धरतो. पण दैनंदिन जीवनातील मोठा आवाज, उत्सव, कामाचे वातावरण किंवा हेडफोन्स यांचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कानांच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे का महत्त्वाचे आहे, हे या भागातून समजून घ्या.#HearingLoss #DJ #ढोलताशा #NoisePollution #EarHealth #Headphones #Decibel #मराठीPodcast #देहभान

  3. Sep 17

    Ganpati Special Podcast | Sukirt Gumaste's YouTube Journey

    Watch the complete podcast to discover famous YouTuber Sukirt Gumaste beyond the screen!‘कॉलेज के गेट के इस तरफ हम लाईफ को नचाते है और दुजी तरफ़ लाईफ हम को नचाती है.’ रंग दे बसंतीमधला हा हिट डायलॉग आठवण्याचं कारण म्हणजे आजच्या भागात आपल्यासोबत जो गेस्ट आहे त्याला मी कॉलेजच्या गेटच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्हीकडे बघितलंय. त्यामुळेच प्रसिद्ध फूड आणि ट्रॅव्हल vlogger ही आज ज्याची ओळख बनली आहे तो सुकीर्त गुमास्ते आपल्या ‘देहभाना’ची काळजी कशी घेतो तसंच स्क्रिनपलीकडचा सुकीर्त जी नेमका कसाय याविषयी देहभान पॉडकास्टच्या या गणेशोत्सव विशेष भागात आम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्याची ही एक खास झलक! Credits: Guest: Sukirt Gumaste, Content Creator, YouTuber and Entrepreneur Co-Producer and Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPCo-Producer: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneLinks Dehbhan Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaYouTube Masterclass with Urmila and Sukirt: https://www.nitome.com/courses/sukirt-gumaste-youtube-masterclassWhat does it really take to become a successful food and travel vlogger? Is travel vlogging simply about picking up a camera, tasting delicious food and exploring new places—or does it demand constant research, compelling storytelling and years of persistence?In this Ganeshotsav Special episode of Dehbhan, popular food and travel vlogger Sukirt Gumaste, better known as Sukirt G, opens up about his journey as a YouTuber and digital content creator. He talks about launching his own channel, combining food with travel, giving honest food reviews and using his experience in theatre, acting, journalism and audiobook production to become a better storyteller.Sukirt also reveals how he stays fit despite eating out regularly, whether a passion-turned-profession can lead to stress and burnout, and why taking a break often brings guilt. From the great Maharashtra misal debate to unforgettable travel experiences, online fame and practical advice for aspiring creators—this is a candid look at the person behind the camera.Watch the complete conversation to discover Sukirt beyond the screen.Timestamps : 00:00 - Intro 01:23 – Sukirt G's YouTube journey since 202302:58 – Was starting a new channel risky?04:00 – The initial struggle on YouTube05:50 – Combining food and travel content07:15 – Does Sukirt make videos for free food?08:26 – Why Sukirt gave a famous Pune thali a bad review10:20 – Pune, Nashik, Thane or Kolhapur: Who has the best misal?12:17 – Sukirt’s favourite misal14:37 – Is travel vlogging really easy?18:20 – Theatre and journalism in storytelling21:25 – How acting helps in travel vlogging24:30 – From college to a digital career25:30 – Producing audiobooks for Storytel28:30 – Research behind travel videos32:31 – How does Sukirt stay fit despite eating out?34:04 – Tired of eating out?35:18 – Unforgettable travel experiences36:28 – The downside of turning passion into a profession42:15 – The guilt of taking a break45:30 – How Sukirt deals with burnout50:00 – Does Sukirt feel like a celebrity?53:13 – Advice for aspiring content creators#sukirtgumaste #youtubejourney #ytsuccess #fitnesslifestyle #Sukirtg #foodvlogger #travelvlogger #marathiyoutuber #contentcreator #DehbhanPodcast #GaneshotsavSpecial #FoodAndTravel #marathipodcast

  4. Sep 8

    Life of an Indian Air Force Officer | Sqn. Ldr. Priyanka Oswal

    From becoming an Indian Air Force officer to navigating life after the uniform, Squadron Leader (Retd.) Priyanka Oswal shares her inspiring journey on Dehbhan Podcast.हुजुरपागा प्रशालेतून मॅट्रिक मग गरवारे कॉलेजमधून बीएस्सी…प्रियांका ओसवाल यांचं आयुष्य चारचौघींसारखंच चाकोरीबद्ध सुरू होतं. पण बीएस्सी करतानाच त्यांनी एअरफोर्समध्ये पायलट व्हायचं वेगळं स्वप्न बघितलं. यासाठी त्यांनी पराकोटीची मेहनत घेतली. त्यामुळे एअरफोर्ससाठी घेण्यात येणारी एसएसबी ही प्रवेश परीक्षा त्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाल्या. आता एअरफोर्समध्ये पायलट होण्याचं स्वप्न अगदी जवळ आलं होतं. पण इथं एक वेगळंच आव्हान उभं राहिलं…त्यांनी त्यावर मात केली का? की स्वप्न भंगल्यानं त्यांनी तो मार्गच सोडून दिला? पडत्या काळात तिला तिच्या वडिलांच्या शब्दांनी उभारी कशी दिली? सांगताहेत भारतीय वायुदलात दहा वर्ष सेवा बजावलेल्या स्क्वाड्रन लीडर प्रियांका ओसवाल (निवृत्त). देहभानच्या या स्वातंत्र्यदिन विशेष भागात त्यांनी एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याचा सगळा प्रवास तर उलगडला आहेच पण आपल्या मराठी माध्यमातल्या पार्श्वभूमीचा कधी अडसर वाटला का, एअरफोर्समधल्या महत्त्वाच्या मोहीमा, सेनादलातून बाहेर पडताना आलेली पोकळी आणि सध्या नेमबाजीत सुरू असलेली त्यांची सेकंड इनिंग यांच्याविषयीही सविस्तर माहिती दिलीय. वेगळं काही करण्याची स्वप्न पाहत असलेल्या प्रत्येक मुलामुलीनं आणि त्यांच्या आईबाबांनी आवर्जून बघावा असा हा भाग आहे. Guest : Sqn. ldr. Priyanka Oswal (Retd.), Ex IAF Officer, Mentor and Athlete Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaIn this episode, she talks about clearing AFCAT and SSB on her first attempt, the challenges of adapting to Air Force life, her role as a Fighter Controller, and how she dealt with the disappointment of not being able to pursue the Flying Branch due to medical reasons.She also opens up about leaving the Air Force after a decade, transitioning to the corporate world, and finding a new challenge in competitive shooting at the national level.A candid conversation about courage, discipline, resilience, career choices and reinventing yourself when life takes an unexpected turn.Timestamps 00:00 - Intro 03:50 – How did your journey of joining the Air Force begin?07:30 – Did you have a family member with a defence background?11:12 – How did you enter the Air Force?15:00 – Why couldn’t you join the Flying Branch in the Air Force?22:00 – How did you feel when you first wore the Air Force uniform?25:06 – What did your role as a Fighter Controller involve?39:00 – Are daily sorties in the Air Force literally a matter of life and death?47:00 – How did you decide to leave the Air Force?47:54 – In your final year, you completed a course at IIM Indore. Could you tell us about that experience?52:25 – You are now competing in shooting at a competitive level. Tell us about this journey.57:24 – You also visit schools and colleges to inspire students. Tell us about that initiative.#iaf_motivational_video #iafofficer #priyankaoswal

  5. Sep 7

    Nagraj Manjule आणि Amey Wagh सोबत काम करणं म्हणजे... | Ft. Vikram Patwardhan

    🎬 नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांना घेऊन पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव नेमका कसा होता?देहभान पॉडकास्टच्या या खास भागात युवा लेखक-दिग्दर्शक विक्रम पटवर्धन त्यांच्या पहिल्या चित्रपट ‘Frame’ च्या निर्मितीमागची गोष्ट, दिग्दर्शनाचा प्रवास आणि सेटवरचे अनेक खास अनुभव उलगडून सांगतात.राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना मुख्य भूमिकेत दिग्दर्शित करणं, तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेता अमेय वाघ यांच्यासोबत काम करणं — तेही आपल्या पहिल्याच चित्रपटात — हा अनुभव विक्रम पटवर्धन यांच्यासाठी कसा होता?‘Frame’ ची कल्पना नेमकी कुठून आली? कथा ते प्रत्यक्ष चित्रपट असा प्रवास कसा घडला? दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाच्या सेटवर कोणती आव्हानं आली? स्वतः एक अत्यंत अनुभवी आणि पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांना अभिनेता म्हणून दिग्दर्शित करताना दबाव जाणवला का? त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे? आणि अमेय वाघसारख्या अनुभवी अभिनेत्यासोबत काम करताना एका नव्या दिग्दर्शकाला काय शिकायला मिळतं? दुसरीकडे विक्रमचा प्रेस फोटोग्राफर ते दिग्दर्शक हा प्रवास, त्यातली आव्हान, insecurities याविषयी देखील तो मोकळेपणी व्यक्त झाला आहे.Guest : Vikram Patwardhan, Director, Writer - "Frame - marathi feature film"Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana00:00 - Intro ​03:00 - From Press Photographer to Film Director: An Incredible Journey08:13 - Quitting a Stable Job for Cinema: Overcoming Industry Insecurity & Struggle10:00 - Does a Photography Background Help in Film Direction?15:20 - Overcoming the Fear of Missing Out (FOMO) & Falling Behind in Your Career17:20 - How I Started My Journey as a Screenwriter21:10 - Is 'Frame' Based on Real Life? The Story Behind the Movie25:00 - Does Covering Dark News Make Journalists Cynical?27:00 - The Photojournalist's Dilemma: Document the Tragedy or Help the Victim?28:31 - Working with Nagraj Manjule & Amey Wagh in the Debut Film31:15 - Behind the Scenes: Emotions on Day 1 of Shooting32:42 - Directing a director: What Is It Like Working with Nagraj Manjule?36:40 - 'Frame' Winning the State Film Award37:28 - What It Really Means to Release Your First Directed Film38:50 - Is Dreaming Big Worth It Even If You Don't Succeed?44:40 - Do Certain Demanding Careers Destroy Work-Life Balance?47:30 - Director as a Leader: Managing Teams & Handling On-Set Challenges50:00 - Advice for Mid-Life Crisis at 40 & Chasing Unfulfilled Dreams51:00 - Passion vs. Financial Security: Choosing Between Dreams & Stability53:55 - My Definition of True Successया संवादात विक्रम पटवर्धन केवळ ‘Frame’ च्या शूटिंगबद्दल बोलत नाहीत, तर filmmaking च्या पडद्यामागचं वास्तवही सांगतात. एखादी कथा चित्रपटात रूपांतरित करताना दिग्दर्शकाला घ्यावे लागणारे निर्णय, कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात तयार होणारं नातं, सेटवरील अनुभव, creative process आणि पहिल्या चित्रपटातून मिळालेलं learning यावरही मनमोकळी चर्चा होते.#fragmovie #nagrajmanjule #vikrampatwardhan #framefilm #zee5marathi In this special episode of the Dehbhan Podcast, young filmmaker Vikram Patwardhan shares the fascinating journey behind his debut film ‘Frame’, featuring acclaimed filmmaker-actor Nagraj Manjule in the lead role alongside renowned Marathi actor Amey Wagh. Vikram opens up about directing experienced performers in his very first film, the challenges and pressures of being a debut director, his creative process, memorable moments from the shoot, and what he learned while working closely with two remarkable personalities from Marathi cinema. An insightful conversation for anyone interested in Marathi films, direction, acting and the realities of filmmaking.

  6. Sep 6

    GLP 1 Weight Loss Results: Are These Medicines Safe?

    Weight loss, GLP-1 medication, Ways to lose weight healthily, Dr Priyanka BapatWeight loss करायचंय रे पण रोज जिमला जायला वेळच नाहीये. त्यात डाएट बिएट माझ्याच्यानं काही होत नाही, ही वाक्य आपल्या नेहमी कानावर येतात. त्यातच अलीकडे वेटलॉससाठीची GLP 1 ही खास औषधंही बाजारात यायला लागली आहेत. ही अशी औषधं घेऊन वजन झपटप कमी करावं का असंही अनेकांच्या मनात यायला लागलंय. पण ही GLP 1 औषधं नेमकी कोणती आहेत आणि त्याचे काही साईडइफेक्ट्स असतात का? हेल्दी वेटलॉसची सगळ्यात योग्य पद्धत कोणती? मुळातच वेटलॉस हे उद्दिष्ट हवं की body recomposition? याच सगळ्या महत्त्वाच्या मुद्दयांवर या भागात Nutrition Scientist डॉ. प्रियांका बापट यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. Guest: Dr. Priyanka Bapat, Nutrition Scientist Contact details of Dr Priyanka: Email id- bapat.priyanka@gmail.comInstagram- https://www.instagram.com/themacrodoc_official Google form link: https://forms.gle/PVtAdukcgxZUyo479Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaTimestamps 00:00 - Intro 03:50 – What Was Your Own Weight Loss Journey Like?05:05 – How Long Did It Take You to Reach Your Target Weight?06:00 – Weight Loss Tips Based on Your Own Experience08:20 – What Are GLP-1 Drugs and How Do They Help With Weight Loss?09:40 – The Science Behind Weight Loss Medications: How Do They Work?11:00 – Weight Loss Medication Side Effects: How Serious Can They Be?13:40 – Why Are People Attracted to Weight Loss Drugs Despite the Side Effects? How Quickly Do They Work?14:31 – Fat Loss While Using Weight Loss Drugs: Is There a Risk of Losing Muscle?16:01 – Should Influencers and Doctors Be Promoting Weight Loss Drugs?17:26 – Who Should Take GLP-1 Drugs? Why Expert Guidance Matters18:20 – Weight Loss Drugs vs Bariatric Surgery vs Liposuction: How Should We Look at Them?20:18 – Lifestyle Changes for Weight Loss: What Should You Actually Do?22:22 – Is One Hour of Exercise or Gym Workouts Every Day Enough?23:12 – What Is “Thin Obesity” and Why Does It Matter?25:35 – Why Is Body Recomposition More Important Than Weight Loss?28:21 – Maharashtrian Diet: What Are the Nutritional Gaps and How Can We Fix Them?30:20 – Should You Eat Eggs Every Day?32:40 – Should Vegetarians Take Protein Supplements?35:40 – Weight Loss Followed by Cravings and Weight Gain: What’s the Solution?38:40 – Indian vs American Mindset Around Weight Loss and Nutrition41:00 – Final Weight Loss Advice: What Should You Focus On?With GLP-1 medications and weight loss drugs becoming increasingly popular, many people are wondering whether these medicines can help them lose weight quickly — and whether they are safe.But what exactly are GLP-1 drugs? How do GLP-1 medications work for weight loss? What are their possible side effects? Is medication-assisted weight loss right for everyone? And when it comes to getting healthier, should the goal simply be weight loss, or should we focus on body recomposition?In this episode of Dehbhan, we speak to Nutrition Scientist Dr. Priyanka Bapat about the science behind weight loss, GLP-1 medications and sustainable fat loss.If you’re trying to understand GLP-1 weight loss drugs, healthy weight loss, fat loss, weight loss medication, or body recomposition, this episode will help you make sense of the science behind these increasingly popular approaches.Watch the full episode with Dr. Priyanka Bapat on Dehbhan.#WeightLoss #GLP1 #GLP1Drugs #GLP1Medication #WeightLossMedication #BodyRecomposition #HealthyWeightLoss #FatLoss #Dehbhan #drpriyankabapat

  7. Sep 5

    Is Sunscreen Necessary For Indian Skin | Cosmetics Myths-Facts | Neha Kundarap

    Are your skincare and cosmetic products really safe? सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री कामावरून घरी आल्यावर फेसवॉशने चेहरा धुण्यापर्यंत दिवसभर आपण असंख्य कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरत असतो. यात साबणापासून ते डिओड्रंटपर्यंत आणि सनस्क्रीनपासून ते मॉइश्चरायझरपर्यंत शेकडो गोष्टी येतात. पण आपण जे वापरतोय ते खरंच सुरक्षित आहे का? किंवा ठराविक प्रॉडक्टची आपल्याला खरंच गरज आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारत नाही. दुसरीकडे Natural, Organic, Chemical Free अशा जाहिरातींमध्ये जे दावे केले जातात, ते कितपत खरे असतात? हे सगळं तपासायचं कसं? याच महत्त्वाच्या विषयावर 'देहभान'च्या या नवीन भागात कॉस्मॅटिक रेग्युलेशन्स एक्सपर्ट आणि या विषयात जनजागृती करणाऱ्या नेहा कुंदारप यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केलीय. एपिसोड नक्की बघा! Timestamps00:00 - Intro 04:28 – Is Skincare Just Makeup? Common Myths About Men's & Women's Skincare06:05 – Should Men Consult a Skincare Expert Before Using Cosmetic Products?07:44 – Why Men's Skincare Awareness Is Growing Rapidly08:16 – Do You Really Need a 10-Step Skincare Routine?10:23 – Are Face Wash, Moisturiser & Sunscreen Enough for Healthy Skin?10:42 – How to Choose the Right Sunscreen for Your Skin Type12:36 – Should You Apply Sunscreen During the Monsoon?13:37 – Can Excessive Use of Cosmetics Increase the Risk of Skin Cancer?16:08 – Anti-Ageing Creams: Science or Marketing Hype?20:27 – A Simple Skincare Checklist for Busy People22:37 – What Is Cosmetorexia? The Dangerous Obsession With Skincare25:48 – What Does a Cosmetic Regulations Expert Actually Do?28:41 – Why Neha Started Beauty Foundry Lab30:45 – Every Skin Is Different: How Cosmetics Affect Different Skin Types34:37 – "Herbal", "Toxin-Free" & "Natural" Products: How True Are These Claims?37:40 – Grandma's Home Remedies: Are They Still Relevant Today?39:10 – How Regulated Is the Indian Cosmetics Industry?44:10 – The Growing Role of the FDA in Cosmetic Regulation48:17 – Real-Life Cosmetic Industry Case Studies & Consumer Lessons49:32 – Are Anti-Ageing Products Worth Buying?51:45 – Is the Skincare Industry Creating New Needs or Solving Real Problems?53:35 – Cosmetic vs Medicine: What's the Difference?58:10 – Smart Tips for Buying Safe & Effective Cosmetic ProductsGuest: Neha Kundarap, Cosmetic Regulations Expert and Educator Reach out to Neha through her website - https://www.nehakundarap.com/Neha's education platform - https://www.beautyfoundrylabs.com/ Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaFrom brushing your teeth in the morning to washing your face before bed, we use dozens of cosmetic products every single day—soap, face wash, sunscreen, moisturisers, deodorants, shampoos, serums, and much more.But have you ever wondered whether these products are actually safe? Do you really need every product you buy? And what do claims like Natural, Organic, Chemical-Free, Dermatologically Tested, and Clinically Proven actually mean?In this episode of Dehbhan Podcast, Neha Kundarap, the Cosmetic Regulations Expert and Educator uncovered the science behind skincare, cosmetic regulations, ingredient marketing, sunscreen, labels, skincare routines, and misleading beauty claims.Topics covered in this episode:* What qualifies as a cosmetic product?* Cosmetic vs Medicine vs Ayurvedic products* How cosmetic regulations work in India* Truth behind "Natural", "Organic" & "Chemical-Free" claims* Ingredient marketing explained* Sunscreen myths and facts* Skincare routines: Do you really need 10 steps?* How to read cosmetic labels correctly* Red flags in beauty product advertising* Safe skincare choices for teenagers

  8. Sep 4

    आपण विसरलो ते मसालेच आरोग्य वाचवतील? Diabetes, Gut Health आणि दीर्घायुष्याचं विज्ञान | Dr. Anjali K

    indian spices, मसाल्याचे आरोग्य फायदे, Diabetes, Cancer, Gut Health आणि दीर्घायुष्य यामागे खरंच विज्ञान आहे का? जिरे, हळद, काळी मिरी, मेथी आणि आपल्या रोजच्या फोडणीवर शास्त्रीय संशोधन काय सांगतं, जाणून घ्या या विशेष देहभान Podcast मध्ये.आपल्या स्वयंपाकघरातला मसाल्याचा डबा फक्त जेवणाची चव वाढवतो की आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतो?या विशेष भागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अंजली कुलकर्णी मसाल्यांमधील शक्तिशाली molecules, त्यांच्यावर सुरू असलेले संशोधन आणि आपल्या पारंपरिक आहारामागचं विज्ञान सोप्या मराठीत उलगडून सांगतात.जिरे आणि शहाजिरे यांचा मधुमेहाशी काय संबंध आहे? हळद जास्त प्रमाणात घेणं खरंच फायदेशीर आहे का? काळी मिरीला “Black Gold” का म्हटलं जात होतं? आमसूल, तिरफळ आणि नागकेशरासारखे पारंपरिक मसाले आपण का विसरत आहोत? मसाल्यांचा Gut Health आणि आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंवर काय परिणाम होऊ शकतो?तसंच प्रत्येक घराच्या मसाल्याच्या डब्यात कोणते 8 ते 10 मसाले असायला हवेत, मसाले कसे भाजावेत, पावडर मसाले कसे साठवावेत आणि पारंपरिक फोडणीमागे नेमकं कोणतं विज्ञान आहे—यावरही या भागात महत्त्वाची चर्चा आहे. Episode मध्ये मसाल्यांचा वापर प्रमाणात करण्यावर आणि नियमित औषधे स्वतःहून बंद न करण्यावर स्पष्ट भर दिला आहे.आपल्या आजी-आईच्या स्वयंपाकघरातलं ज्ञान आणि आधुनिक प्रयोगशाळेतलं विज्ञान यांना जोडणारा हा देहभान Podcast चा अत्यंत महत्त्वाचा भाग नक्की पाहा.09:11 भारताचा मसाल्याचा इतिहास, spice route, leader of spice trade. 19:12 Diabetes Control साठी जिऱ्याचे फायदे, What lab says?31:55 मसाले Store करण्याची योग्य पद्धत36:30 Turmeric Latte is good for health? जास्त हळद खाण्याचे फायदे की Side Effects जास्त ?38:40 मसाल्याच्या डब्यात कोणते मसाले असावेत?44:00 Diabetes, Heart Disease आणि Cancer मध्ये मसाल्यांची भूमिकातुमच्या मसाल्याच्या डब्यात कोणते मसाले कायम असतात? Comment मध्ये नक्की सांगा.देहभान Podcast Subscribe करा आणि अशाच महत्त्वाच्या, दुर्लक्षित विषयांवरील तज्ज्ञांच्या गप्पांसाठी आमच्यासोबत रहा.

About

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/