Grantha Vachan - ग्रंथ वाचन

Shirish Shevade

Grantha Vachan - ग्रंथ वाचन

  1. श्री गजानन महाराज आरती Gajanan Maharaj Aarti

    08/27/2025

    श्री गजानन महाराज आरती Gajanan Maharaj Aarti

    जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया । जयदेव जयदेव ॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी । लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा । करूनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना ।धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना । जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥ लीला अनंत केल्या बंकटसदनास । पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥ व्याधी वारून केले कैकां संपन्न । करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥

    2 min
  2. अध्याय १९ - श्री गजानन विजय ग्रंथ : Adhyay 19 - Shri Gajanan Vijay Granth

    08/27/2025

    अध्याय १९ - श्री गजानन विजय ग्रंथ : Adhyay 19 - Shri Gajanan Vijay Granth

    कथा एकोणविसाव्यासी | दिला काशीनाथपंतासी | आशीर्वाद तो अतिहर्षी | तो येता दर्शना || गोपाळ मुकिंद बुटी भला | नागपुरासी घेऊन गेला | श्रीगजाननस्वामीला | आपुल्या गेहाकारणें || त्याच्या मनीं ऐसा हेत | महाराज ठेवावें नागपुरांत | परी हरि पाटलांनीं परत | आणिले समर्थ शेगांवीं || धार-कल्याणचे रंगनाथ | साधु आले भेटण्याप्रत | समर्थासी शेगांवांत | ऐसे आणि कितीतरी || श्रीवासुदेवानंद सरस्वती | जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति | दृष्टादृष्ट होतां नुसती | आनंद झाला उभयतातें || तेव्हां बाळाभाऊला | जो कां होता संशय आला | तो समर्थांनीं निवटिला | करुनियां उपदेश|| केलें खळ्याचें संरक्षण | गाढवाचे पासून | समर्था मारितां आलें मरण | नारायणासी बाळापुरीं || गजाननाचे कृपें भलें | जाखडयाचें लग्न झालें | कपीलधारेसी दिधलें | दर्शन निमोणकराला || तुकारामें आपुला | पुत्र समर्था वाहिला | नारायण नामें भला | सेवा करावयाकारणें || पंढरीतें जाऊन | विठ्ठलातें विचारुन | महाराज आले परतून | शेगांवाकारणें || पुढें भाद्रपदमासासी | ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं | आधुनिक कालाचा हा ऋषि | समाधिस्त जहाला ||

    40 min

About

Grantha Vachan - ग्रंथ वाचन