गेल्या तीन महिन्यात आपण दर रविवारी भेटत आलो. २०२१ सोबत आपण मेतकूट पॉडकास्टच्या पहिल्या सत्राची सांगता सुद्धा केली. या प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही दिलेली साथ, सल्ले, सूचना, आणि महत्वाचं म्हणजे प्रतिक्रिया खूपच आवडल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार.
आता as promised, आम्ही मेतकूट पॉडकास्टचे दुसरे सत्र तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत. जशी साथ, जे प्रेम तुम्ही गेल्या तीन महिन्यात दिलं, ते वृद्धिंगत होईल ही आशा करतो. लवकरच नवे भाग प्रदर्शित करू. त्यासाठी पॉडकास्टच्या चॅनेलला spotify, apple podcast, google podcast किंवा youtube यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे subscribe करून ठेवा. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल.
यंदाच्या सत्रामध्ये आमच्या काही मित्र मैत्रिणींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम, आणि म्हणून घडलेला त्यांचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे. यातून ज्या काही गप्पा जमल्या, त्यांची सरमिसळ करून बनलेलं हे मेतकूट. हे लोक कोण आणि त्यांचे विषय कोणते हे लवकरच सांगू.
सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram: @metkootpodcast
#marathipodcast #podcast #म #marathi #मराठीभाषा #metkoot
信息
- 节目
- 发布时间2022年1月10日 UTC 11:00
- 长度1 分钟
- 季2
- 分级儿童适宜