स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Santosh Deshpande

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

  1. मृत्युनंतर घडतं काय?

    -7 Ч

    मृत्युनंतर घडतं काय?

    मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या लेखिका डॉ. मनिषा अन्वेकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला विशेष संवाद. व्यक्ती मरते म्हणजे काय घडते, माणसाला मृत्युची चाहूल लागते का, जन्म-मृत्यू आणि कर्माचा संबंध असतो का, मृत्यू हा विधिलिखत असतो का, आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीत काय घडतं, आत्म्याशी खरंच संवाद होऊ शकतो का, श्राद्धकर्मे गरजेची असतात का या व अशा अनेक गूढ दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा वेगळा पॉडकास्ट.  हा पॉडकास्ट युट्यूबवर पाहण्यासाठी - https://youtu.be/iPootIBEITs

    42 мин.
  2. उद्योजकांचा सॅटर्डे क्लब!

    10 СЕНТ.

    उद्योजकांचा सॅटर्डे क्लब!

    मराठी लोकांमध्ये उद्यमशीलतेचा अभाव असल्याने ते उद्योग-व्यवसायात मागे पडतात, मुळात उद्योग करणे हा त्यांचा पिंडच नाही ही सामाजिक धारणा अजूनही आपल्याकडे आहे. ती मोडीत काढून व्यवसायात असणाऱ्या मराठीजनांना एका सूत्रात बांधत एकमेकांच्या साहाय्याने उद्योगात यश मिळवता येते, हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने दाखवून दिले. कै. माधवराव भिडे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रेरणेतून रुजलेले हे बीज आता चळवळ बनून अनेक मराठी उद्योजकांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आले आहे. `एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत` हे ब्रीद सार्थ करण्यासाठी आता `सॅटर्डे क्लब` महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तसेच परदेशातही विस्तारते आहे. या पार्श्वभूमीवर, सॅटर्डे क्लबची सुरवात, आजवरचा प्रवास, त्यातील वैशिष्ट्ये आणि त्यातून उद्योजकांना मिळत असलेले फायदे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी संतोष देशपांडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस (सेक्रेटरी जनरल) सुहास फडणीस यांना बोलता केलं आणि उलगडत गेला एका उद्यमशील चळवळीचा प्रेरणादायी पट. प्रत्येक मराठीजनाने आवर्जून ऐकावा, जाणून घ्यावा असा हा विषय आणि त्यातील प्रेरक आशय.

    34 мин.
  3. ढोल-ताशा आणि `आमचा` आवाज!

    4 СЕНТ.

    ढोल-ताशा आणि `आमचा` आवाज!

    ढोलताशा पथक हे पुण्याच्याच नव्हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतील एक अविभाज्य अंग आहे. विशेषतः गणेशोत्सवातील ढोलताशांचा निनाद हा सर्वांनाच भुरळ घालतो. अशा ढोलताशा पथकांमध्ये महिलावर्गाचाही फार मोठा सहभाग असतो. या महिलावर्गाचा विशेषतः पथकांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे जग काय असते, त्यांच्यापुढची आव्हाने काय असतात, त्यावर त्या कशी मात करतात, त्यांचे अनुभव काय आहेत...याबाबतचा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच असे नाही. म्हणूनच, त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुण्यातील अग्नि या ढोलताशा पथकाच्या मनिषा गोसावी आणि गायत्री शिरोडकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ढोलताशांमधील महिलांचा हा आवाज उलगडून दाखवतो.  हा एपिसोड यूट्यूबवर पाहायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा-  https://youtu.be/TbvFdxPkYzw

    30 мин.
  4. `संस्कृत`ला भवितव्य आहे?

    23 АВГ.

    `संस्कृत`ला भवितव्य आहे?

    भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतची आधुनिक काळात पिछेहाट झाली. मात्र, अजूनही तिचे अस्तित्व टिकून आहे. किंबहुना, तिला आता उर्जितावस्था येते आहे. बदलत्या काळात संस्कृतचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ते कसे, याच विषयी `संस्कृत भारती`चे अ.भा. प्रचार प्रमुख डॉ. सचिन कठाळे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. या संवादातून संस्कृत का मागे पडली इथपासून ते संस्कृतमध्ये असे काय आहे, ज्यामुळे येत्या काळात तिचे महत्त्व वाढणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टींची उलगड होते. संस्कृतकडे एक विषय म्हणून नव्हे तर एक भाषा म्हणून पाहिले गेले तर ज्ञान-रंजनाचे मोठे भांडार जगापुढे उलगडेल, याकडेही हा संवाद लक्ष वेधतो.

    39 мин.
  5. भाषा अनेक तर संधी अनेक!

    14 АВГ.

    भाषा अनेक तर संधी अनेक!

    बदलत्या जगात तुम्हाला जितक्या भाषा अवगत असतील तितक्या पुढे येण्याच्या संधीही लाभतील. म्हणूनच, `स्टोरीटेल कट्ट्या`वर संतोष देशपांडे यांनी संस्कृतपासून मराठी-कन्नड-मल्यालम अशा कैक भाषांमध्ये पारंगत असणारे विद्वान अभ्यासक, अनुवादक वासुदेव डोंगरे यांना बोलतं केलंय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठीवर प्रभुत्व मिळवून अन्य भारतीय भाषांवरही तितकेच प्रेम करणारे आणि त्यात आपले वेगळे करिअर घडवणारे भाषातज्ज्ञ वासुदेव डोंगरे यांचा आजवरचा प्रवास त्यांच्याकडून ऐकणे हा एक वेगळा अनुभव ठरतो. हा अनुभव केवळ भाषांवर प्रेम करण्याची प्रेरणाच देत नाही तर स्वतःला नव्याने शोधण्याची ऊर्मी जागवतो.हा पॉडकास्ट युट्यूब वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://youtu.be/g9Gw1U_aMaI

    56 мин.
  6. पी.आर.चं बदलतं जग..

    9 ИЮН.

    पी.आर.चं बदलतं जग..

    पब्लिक रिलेशन्स (पीआर) किंवा जनसंपर्क क्षेत्रात मागील काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. मूळात हे `पीआर` क्षेत्र कसे विकसित झाले, सध्या ते कुठे आहे, भविष्यात त्यातील संधी काय असणार या विषयी अनेकांना कुतुहल आहे. अनेक नामवंत संस्था व वलयांकित व्यक्तींसाठी `पीआर`चा चेहरा म्हणून प्रसिद्ध असणारे या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ तुषार जोशी यांच्याशी संतोष देशपांनी यांनी याच विषयावर संवाद साधला आणि त्यातून  अनेक विषयांची सहज उलगड होत गेली. चाकोरीबाहेरील काही जाणू इच्छिणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा पॉडकास्ट.

    1 ч. 12 мин.

Оценки и отзывы

5
из 5
Оценок: 8

Об этом подкасте

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.

Вам может также понравиться