Life of Stories

# 1857: तपस्वी महर्षी धोंडो केशव कर्वे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text

डॅा. राजेंद्रप्रसाद  भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतल्या त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी!
'ती व्यक्ती कोण आहे,' हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनतेने राष्ट्रपतींच्या या कृतीला पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करून मनमुराद दाद दिली. कारण, *ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नव्हतं तर साक्षात अण्णा होते. अण्णा म्हणजेच ' महर्षी धोंडो केशव कर्वे'!