Life of Stories

# 1858: बिघाड. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text

फ्रिज बिघडला.
टीवी बंद.
वाय-फाय डाऊन.

शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.

"आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.

सहा वेळा प्लग काढून लावला.
टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.
नेट कनेक्शन गायब.

सगळीकडे जणू "No Signal".

तो चिडून म्हणाला,
"हे घर आहे की सर्वसंकट केंद्र? दर आठवड्याला आपलं काहीतरी बिघडतंय."