Life of Stories

# 1859: देवाचा ओव्हरटाईम. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text

परवा देव भेटला होता.
माणसं बनवतांना काय त्रास होतो ते सांगत होता.
म्हणाला, फार कष्टाचे काम, जरा उसंत नाही, नाही आराम.
म्हणजे आकार साधारण सारखे असले तरी चालतात;
पण डिझाईन्स वेगवेगळी बनवावी लागतात.
म्हणून साचा बनवून भागत नाही,

कारण सरळ नाकावर प्रत्येक वेळी टपोरे डोळे शोभतीलच असं नाही.
आणि गोल चेहऱ्याला एक सारखी जिवणी लावून चालत नाही, म्हणूनच त्रास होतो.