Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

  1. 30 DE SET.

    #1862: "पुस की रात" लेखक प्रेमचंद. तळटिपा : आसाराम लोमटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us a text "तुम्ही इथे   आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि  तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी  नवऱ्याला जागं करते.   हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं.  बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल."  हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता."  शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यावर अन्य लेखकाच्या कथेत शेतकऱ्याने आक्रोश केला असता, पण हा म्हणतोय, 'मरण्यातनांतून तरी सुटका झाली'! भारतीय शेतकऱ्याचं  जिवंत चित्र प्रेमचंद यांनी 'पुस की रात' मधे रेखाटले आहे.

    7min
  2. 29 DE SET.

    # 1861: "शिक्षण विद्या देतय तशी लाजबी देतय" लेखक विशाल गरड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us a text टपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं  ऐकलं म्हणून न राहवून ते  महाद्याला म्हणाले   "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय.  नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आरं त्येला इंग्रजी येत असून त्येनं काय दिवा लावलाय अख्या गावाला ठाव हाय की. महाद्या तू जर शिकला असता तर आता जी काम करतूय ह्यातलं एकबी काम त केलं नसतंस, कारण शिक्षण विद्या देतंय, तशीच लाजबी देतंय बाबा.”

    4min
  3. 28 DE SET.

    # 1860: "पाऊस आपल्यासारखंच वागतोय" लेखक समीर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us a text पावसाचंही तसंच झालंय. आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो. कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो. अचानक येतो मग. सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन.  विचारलं तर म्हणतो "आता मन रमत नाही गं आई".  पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही. आता तो बसरतो फक्त 'बॅकलॉग' भरण्यासाठी. त्याच्याकडे वेळ उरला नाही. तो कुणाची विचारपूस करत नाही की कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही. दोस्तहो पाऊस बदललेला नाही आणि चुकलेलाही नाही तो तर आपल्यासारखंच वागतोय. मग त्याला दोष देऊन कसं चालेल? तरीही एका गोष्टीने व्याकूळ व्हायला होतं.  अपराध, चुका करतात वेगळेच लोक. आणि त्याचे 'वेदनासूक्त' गावे लागते भुकेजलेल्या श्रमलेल्या अर्धपोटी निरपराधांना. हा कसला न्याय म्हणायचा ?

    9min
  4. 25 DE SET.

    # 1857: तपस्वी महर्षी धोंडो केशव कर्वे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us a text डॅा. राजेंद्रप्रसाद  भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतल्या त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी! 'ती व्यक्ती कोण आहे,' हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनतेने राष्ट्रपतींच्या या कृतीला पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करून मनमुराद दाद दिली. कारण, *ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नव्हतं तर साक्षात अण्णा होते. अण्णा म्हणजेच ' महर्षी धोंडो केशव कर्वे'!

    7min

Sobre

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.