
#1862: "पुस की रात" लेखक प्रेमचंद. तळटिपा : आसाराम लोमटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us a text
"तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते.
हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं.
बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता."
शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यावर अन्य लेखकाच्या कथेत शेतकऱ्याने आक्रोश केला असता, पण हा म्हणतोय, 'मरण्यातनांतून तरी सुटका झाली'! भारतीय शेतकऱ्याचं जिवंत चित्र प्रेमचंद यांनी 'पुस की रात' मधे रेखाटले आहे.
정보
- 프로그램
- 주기매일 업데이트
- 발행일2025년 9월 30일 오후 6:30 UTC
- 길이7분
- 등급전체 연령 사용가