Life of Stories

# 1865: जाहिरातीतील खाचाखोचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Send us a text

जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.