Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

  1. 5D AGO

    # 1870: आपण चॅाकलेट का खातो? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us a text लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉकलेटल)  म्हणजे ‘कडू पाणी’! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवीचवीने पीत. नंतरच्या ऍझटेक संस्कृतीनेही मायन लोकांकडून ते कडू देवपेय हट्टाने घेतलं. स्पॅनिशांनी ते युरोपात नेलं.

    8 min
  2. OCT 5

    # 1867: चिन्ह-भाषेचा अर्थ-अनर्थ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us a text परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच.

    8 min

About

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.