Around The World

Veena World

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.   हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.   ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या  अर्थाने महत्त्व देतं.   तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना! ------------------------------------------------------ Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us. With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them. At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful. Stay tuned to be a part of this journey with us.

  1. Episode 17 ft. Dilip Prabhavalkar (दिलीप प्रभावळकर) | Around The World | Veena World

    5D AGO

    Episode 17 ft. Dilip Prabhavalkar (दिलीप प्रभावळकर) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत खास पाहुणे — दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर. अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखतेच; पण या मनमोकळ्या गप्पांमध्ये यजमान वीणा पाटील यांनी त्यांच्यातील ‘निरीक्षक’ प्रवाशाला बोलते केले आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर तो माणसे आणि संस्कृती जवळून अनुभवण्याचा एक मार्ग आहे — हे त्यांच्या गप्पांतून प्रकर्षाने जाणवते. या एपिसोडमध्ये ते त्यांचे वैयक्तिक प्रवासाचे तत्त्वज्ञान, जगाकडे पाहण्याची खास पद्धत आणि प्रवासातील काही अविस्मरणीय आठवणी शेअर करत आहेत. दोन अनुभवी व्यक्तिमत्त्वांचा हा समृद्ध संवाद तुम्हाला प्रवासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन नक्कीच देऊन जाईल. संपूर्ण एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा. Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! In this very special episode, host Veena Patil is in conversation with the legendary Dilip Prabhavalkar. While the world knows him for his incredible acting prowess, this chat explores his identity as a keen observer of life and a passionate traveler. From his personal philosophy on travel to how he perceives different cultures and people, Dilip ji shares insights that are as profound as they are engaging. This isn’t just a conversation about destinations; it’s a look at the world through the eyes of a master storyteller. Watch the full episode for a truly enriching experience. Subscribe to Veena World’s YouTube channel. Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production House: Evertale Studios

    2h 6m
  2. Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World

    FEB 6

    Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! ७ फेब्रुवारीपासून ‘Men’s T20 Cricket World Cup’ सुरू होत आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज असतानाच, या वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला आमच्या स्टुडिओमध्ये एक ‘चॅम्पियन’ व्यक्तिमत्त्व उपस्थित आहे — ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले. व्यावसायिक क्रिकेट पत्रकारितेमुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी मिळाली, पण या प्रवासात फक्त क्रिकेटच नाही, तर जागतिक खाद्यभ्रमंती आणि तिथल्या लोकजीवनाचाही मोठा वाटा आहे. स्वतःला मिश्किलपणे ‘इंटरनॅशनल बकासूर’ म्हणवून घेणारे सुनंदन सर या मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांच्या प्रवासातील अनेक पैलू उलगडतात. या संवादात ते पाकिस्तानमधील त्यांच्या भेटीबद्दल बोलताना मराठा साम्राज्याच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देतात. अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठा वीरांचा इतिहास त्यांना तिथे कसा आठवला, हे ऐकण्यासारखं आहे. न्यूझीलंडमधील निसर्गसौंदर्य, ऑस्ट्रेलियातील भन्नाट किस्से, तसेच यूके आणि आयर्लंडमधील अनुभव ऐकताना तुम्हालाही त्यांच्यासोबत प्रवासाची सफर घडेल. याशिवाय, हर्षा भोगले यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबतच्या त्यांच्या मैत्रीचे पडद्यामागचे रंजक किस्सेही त्यांनी या भागात शेअर केले आहेत. प्रवासाकडे मिश्किल, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच अभिमानास्पद नजरेतून पाहणारा हा एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.  Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! With the Men’s T20 Cricket World Cup kicking off on February 7, India is all set to defend its championship. On the eve of this major tournament, we have a true champion guest in our studio—renowned senior cricket journalist Sunandan Lele. While cricket has taken him across the globe, it is his sharp wit and love for food—earning him the nickname “International Bakasur”—that make his travel stories truly unforgettable. Sunandan reflects on his visit to Pakistan, recalling the legacy of the Maratha Empire at Attock. From calling New Zealand the most scenic destination to sharing hilarious anecdotes from Australia, the UK, and Ireland, he takes us on a captivating global journey. He also offers a peek into his long-standing friendships with icons like Harsha Bhogle, sharing fascinating behind-the-scenes travel stories. Watch the full episode for a unique perspective on travel through the eyes of a master storyteller. Subscribe to Veena World’s YouTube channel.  Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production House: Evertale Studios

    1h 46m
  3. Episode 15 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World

    JAN 30

    Episode 15 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे! वैधानिक इशारा: हा एपिसोड पाहण्याआधी पोटभर जेवून घ्या—नाहीतर व्हिडिओ पाहताना प्रचंड भूक लागेल! आजच्या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत आहेत ‘द कुणाल विजयकर’. एक उत्कृष्ट नट म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याहीपलीकडे ते अन्नाचे चालते-बोलते ‘इन्सायक्लोपीडिया’ आहेत. त्यांच्या पदार्थांच्या वर्णनानेच माणसाला भूक लागावी, अशी त्यांची हातोटी आहे! या खुसखुशीत गप्पांमध्ये कुणाल यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींपासून ते परदेशातील ‘फूड एक्सपेरिमेंट्स’पर्यंतचा प्रवास उलगडला आहे. पारसी, गोवन, केरळ ते अगदी ओरिसा आणि जपानी जेवणापर्यंत… प्रत्येक कुझिनची नसंनस त्यांना माहीत आहे. फक्त खाणंच नाही, तर रेस्टॉरंट बिझनेसमधले काही महत्त्वाचे ‘Do’s and Don’ts’, उत्तम सर्व्हिस म्हणजे नक्की काय, आणि सिझलर व फालुद्याबद्दलची खास ‘ट्रिव्हिया’ही त्यांनी शेअर केली आहे. परदेशात गेल्यावर आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडून तिथल्या स्थानिक अन्नाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे कुणाल यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. हा चविष्ट आणि माहितीपूर्ण एपिसोड नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा. ------------------------------------------------- Welcome to a brand-new, mouth-watering episode of the 'Around The World' podcast! Warning: Do not watch this episode on an empty stomach! In this episode, host Neil Patil is joined by “The Kunal Vijayakar.” While we know him as a fantastic actor, his knowledge of food is simply unrivalled. He has a rare talent for describing food in a way that can make anyone hungry instantly. In this candid conversation, Kunal traces his love for food back to his family roots and upbringing. He dives deep into the nuances of diverse cuisines—from Pathare Prabhu, Parsi, and Goan to Kerala, Odia, and Japanese. He also shares stories from his recent culinary trip to Madrid and talks about stepping out of one’s “Indian food comfort zone” to truly experience local cuisine. Beyond just tasting, the episode explores the business of food—what makes great restaurant service, the Do’s and Don’ts of dining, and some fascinating trivia about Sizzlers and Falooda. Listen to this delicious and insightful episode now! Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production House: Evertale Studios

    1h 6m
  4. Episode 14 ft. Hon. Shri Nitin Gadkari (नितीन गडकरी) | Around The World | Veena World

    JAN 23

    Episode 14 ft. Hon. Shri Nitin Gadkari (नितीन गडकरी) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्याया विशेष एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्षाच्यापार्श्वभूमीवर, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमाननीय श्री. नितीनजी गडकरी आणि वीणा पाटीलयांच्यातील हा विशेष संवादसादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. या एपिसोडचे वेगळेपण म्हणजे, पहिल्यांदाच आम्ही आमच्या पॉडकास्ट स्टुडिओच्या बाहेर जाऊन, थेट भारताच्या एकाकेंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी या भागाचे शूटिंगकेले आहे. ‘Highway Man of India’ अशी ओळख असलेल्यानितीनजींच्या कार्यामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातीलपर्यटन स्थळे एकमेकांशी अधिक सक्षमपणे जोडलीजात आहेत. या भागात इन्फ्रास्ट्रक्चरचा पर्यटनावर होणारा सकारात्मक परिणाम, ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवे प्रयोग, तसेचदिल्लीतील प्रदूषणापासून ते जलमार्गांच्या विकासापर्यंतअनेक महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली आहे. नितीनजींचाखवय्येगिरीतील उत्साह, शेतीबद्दलची त्यांची ओढ आणि वैयक्तिकप्रवासाचे अनुभव या संवादाला अधिकजिवंत बनवतात. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनीएकत्र येऊन भारताला ‘पर्यटनहब’ कसे बनवता येईल, यावर नितीनजींनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. वीणा वर्ल्डसाठीहे एक मोठे भाग्यआहे की आपल्याला अशामहान नेतृत्वाचे विचार ऐकायला मिळाले. हा संवाद नक्कीचप्रेक्षकांसाठी ज्ञानाची पर्वणी ठरेल. संपूर्ण एपिसोड नक्की ऐका! ============================================ Welcome to a landmark episode of the 'Around The World' podcast! Set against the backdrop of India’s 77th Republic Day, we are deeply honoured to present a special conversation between Hon. Shri Nitin Gadkari ji, Union Minister for Road Transport and Highways, and Veena Patil. Marking a significant milestone, this episode was recorded outside our podcast studio for the very first time - at the official residence of a Union Minister of India. Widely known as the ‘Highway Man of India,’ Nitinji’s visionary leadership has played a pivotal role in connecting India’s diverse tourist destinations like never before. In this insightful conversation, Nitinji discusses how infrastructure development is boosting tourism, shares his thoughts on innovations in the automobile sector, and addresses critical issues ranging from urban pollution in Delhi to the expansion of inland waterways. Beyond policy and governance, the episode also offers a glimpse into his love for food, his deep connection with agriculture, and his personal travel experiences. His vision of public and private sectors coming together to make India a global tourism hub is a powerful takeaway. For the Veena World team, this has been a truly humbling experience, resulting in an episode that stands apart in every sense. Listen to the full episode now! Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production house: Evertale Studios

    1h 19m
  5. Episode 13 ft. Bharat Gothoskar (भरत गोठोसकर) | Around The World | Veena World

    JAN 16

    Episode 13 ft. Bharat Gothoskar (भरत गोठोसकर) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!  मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. आज आपल्यासोबत आहेत भारत गोठोसकर, ज्यांनी 'खाकी टूर्स'च्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाला आणि वारशाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. होस्ट नील पाटील यांच्यासोबतच्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये, भारत आपल्याला मुंबईच्या त्या भागात घेऊन जातात जिथे सहसा पर्यटकांची पावलं वळत नाहीत. परळ, लालबागपासून ते दादर, माहिमपर्यंत—इथल्या गल्ल्या, इथले लोक, कोळी बांधवांचा वारसा, इराणी कॅफेज आणि इथल्या मातीने जपलेल्या आठवणी... या सर्वांतून मुंबईचं Tourism Potential कसं उलगडतं, हे या संवादातून समजते. इतिहासाला केवळ पुस्तकात न ठेवता, तो आपल्या भविष्यासाठी प्रेरणादायी कसा ठरू शकतो, हे सांगणारा हा एपिसोड मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण एपिसोड नक्की ऐका!  वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा.  ================================================== Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!  In this episode, host Neil Patil is in conversation with Bharat Gothoskar, the founder of 'Khaki Tours', who has given a fresh identity to Mumbai’s rich history and heritage. This casual yet profound conversation explores the parts of Mumbai where tourists seldom wander. From the industrial roots of Parel and Lalbaug to the historic lanes of Dadar and Mahim, we dive into the diverse communities, Irani cafes, and the rich Koli heritage that define the city. Bharat discusses why preserving these stories is key to unlocking Mumbai’s true Tourism Potential. Experience your city through the eyes of a master storyteller and discover a unique perspective on travel. Listen to the full episode now!  Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production house: Evertale Studios

    1h 29m
  6. Episode 12 ft. Ravi Jadhav & Meghana Jadhav | Around The World | Veena World

    JAN 9

    Episode 12 ft. Ravi Jadhav & Meghana Jadhav | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! सिनेमा बनवणारे जेव्हा स्वतः ‘प्रवासी’ बनतात, तेव्हा काय घडतं? या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्मात्या मेघना जाधव. 'नटरंग' आणि 'टाइमपास' सारख्या सुपरहिट कलाकृती देणाऱ्या या जोडीने या पॉडकास्टमध्ये आपल्या भटकंतीचे अनेक पैलू उलगडले आहेत. जपानमधील संस्कृती, तिथलं मनोरंजन आणि शिस्त पाहून ते कसे भारावून गेले, याचे किस्से त्यांनी शेअर केले आहेत. पण जगभर फिरतानाही त्यांना खरी ओढ लागते ती आपल्या मातीची! कोकणातील untouched किनारे आणि हिमालयातील तो दैवी अनुभव… हे सगळं त्यांच्यासाठी कसं खास आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव आणि सिनेमासाठी लोकेशन्स निवडतानाची त्यांची नजर… हे ऐकताना तुम्हालाही प्रवासाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. प्रवास म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर तो एक बदल आहे जो आपल्याला आतून घडवतो—हा विचार मांडणारा हा एपिसोड नक्की पाहा! ----------------------- Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! What happens when storytellers become travellers? In this episode, host Veena Patil is in conversation with renowned director Ravi Jadhav and producer Meghana Jadhav. The creative duo behind hits like Natarang and Timepass opens up about their global wanderlust. They share fascinating stories from Japan—Tokyo and Osaka—describing how the culture, entertainment, and discipline there left them mesmerized. Yet, despite travelling the world, their hearts remain deeply connected to India. They draw beautiful parallels between the untouched beaches of Konkan and the divine serenity of the Himalayas. From thrilling scuba diving adventures to their unique “director’s eye” for selecting film locations, this conversation is packed with insights. Travel isn’t just about sightseeing; it’s a transformation that shapes us from within. Listen to this inspiring episode now!   Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production House: Evertale Studios

    2h 25m
  7. Episode 11 ft. Sarang Sathaye & Paula McGlynn | Around The World | Veena World

    JAN 2

    Episode 11 ft. Sarang Sathaye & Paula McGlynn | Around The World | Veena World

    तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! २०२६ च्या पहिल्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागाची सुरुवात थोडी रोमँटिक आणि तितकीच अ‍ॅडव्हेंचरस आहे. होस्ट सुनीला पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत भाडीपा फेम आणि नवविवाहित जोडी—सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन. पुणे ते कॅनडा हे अंतर प्रवासाने कसं मिटवलं आणि त्यांच्या नात्याचा पाया ‘प्रवास’ कसा ठरला, याची ही गोष्ट आहे. या गप्पांमध्ये सारंगने वाराणसीतील त्याचे आयुष्य बदलणारे अनुभव शेअर केले आहेत, तर पॉलाने जपानमधील तिच्या सोलो ट्रिपच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बर्लिन, अमेरिका ते स्कॉटलंड अशा अनेक ठिकाणचे किस्से आणि “रोड ट्रिपवर गेल्यावरच समोरचा माणूस खरा कळतो” हे त्यांचे निरीक्षण… हे सगळं काही या एपिसोडमध्ये! त्यांच्या लग्नाचा आणि प्रवासाचा हा सुंदर प्रवास नक्की पाहा. वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला सबस्क्राइब करा. ---------------------------------------------------- Wishing you all a very Happy New Year! Welcome to the first episode of 2026. We begin the year with a perfect blend of romance and adventure. Host Sunila Patil is in conversation with the BhaDiPa-fame newlyweds—Sarang Sathaye and Paula McGlynn. This is the story of how travel bridged the distance between Pune and Canada, becoming the foundation of their relationship. In this candid chat, Sarang shares his life-changing experiences from Varanasi, while Paula reminisces about her memorable solo trip across Japan. From stories of Berlin, the USA, and Scotland to their insightful observation that “you only truly get to know a person on a road trip,” this episode has it all. Join us on their journey of love and travel. Listen to the full episode now! Subscribe to Veena World’s Spotify channel.

    1h 12m
  8. Episode 10 ft. Sukirt Gumaste (सुकीर्त गुमास्ते) | Around The World | Veena World

    12/26/2025

    Episode 10 ft. Sukirt Gumaste (सुकीर्त गुमास्ते) | Around The World | Veena World

    'Around The World' पॉडकास्टच्या या वर्षातील (२०२५) शेवटच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आपल्या प्रत्येकासाठी ‘जेवण’ हे गरजेचं असतं, पण काही जणांसाठी ती एक ‘भावना’ (Emotion) असते. या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत असेच एक अस्सल खवय्ये आणि प्रसिद्ध यूट्यूबर, सुकीर्त गुमास्ते. सुकीर्तसाठी प्रवासाचं प्लॅनिंग ‘डेस्टिनेशन’वरून नाही, तर तिथे काय ‘खायला’ मिळणार आहे, यावरून ठरतं! या गप्पांमध्ये त्यांनी अन्नाचं आणि मानवी भावनांचं असलेलं हे घट्ट नातं उलगडून दाखवलं आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या झणझणीत चवी असोत, भारताच्या विविध प्रांतांमधील स्ट्रीट फूड असो किंवा जागतिक स्तरावरील खाद्यसंस्कृती… सुकीर्त यांचा हा प्रवास तुमच्या तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या नजरेतून (आणि जिभेचे चोचले पुरवत!) जग कसं पाहायचं, हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा. पूर्ण एपिसोड आता उपलब्ध आहे. वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा! Welcome to the final episode of the 'Around The World' podcast for 2025! For most, food is a necessity but for some, it is an emotion. In this episode, host Neil Patil sits down with one such passionate foodie and popular YouTuber, Sukirt Gumaste. For Sukirt, travel planning doesn’t start with ‘where to go’, but with ‘what to eat’! In this conversation, he dives deep into the profound connection between food and human emotion. Whether it’s the spicy, rustic flavors of Maharashtra, the vibrant street food across India, or culinary gems from around the world, Sukirt’s journey is sure to leave you craving for more. Tune in to discover how to see the world through the lens of a true foodie. Listen to the full episode now! Don’t forget to follow Veena World’s Spotify channel. Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production House: Evertale Studios

    1h 3m

About

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.   हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.   ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या  अर्थाने महत्त्व देतं.   तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना! ------------------------------------------------------ Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us. With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them. At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful. Stay tuned to be a part of this journey with us.