In the Rajapur raid of 1661, Shivaji Maharaj found this gem and made him the secretary of Swarajya. On the strength of his brilliant memory, intelligence and political diplomacy, Maharaj carried out many tasks of Swarajya. While Shivaji Maharaj was a prisoner of Agra, Balaji's skill and political diplomacy were unmatched that strengthened the maratha empire. But unfortunately, out of misunderstanding, Sambhaji Maharaj punished him under the elephant's feet. Later, when Chhatrapati Sambhaji Maharaj realized that he had made a big mistake, he became very remorseful. Sambhaji Maharaj later went to Aundha-Pali-Sudhagad and erected Balaji's Umbrella Samadhi. He gave the title of secretary to his son Khando Ballal.
राजापूरच्या १६६१ च्या छाप्यात महाराजांना हे रत्न सापडलं आणि त्यांनी त्याला स्वराज्याच्या चिटणिशीच कोंदण दिलं. बाळाजी आवजी चित्रे यांनी सन १६६१ पासून १६८१ पर्यंत स्वराज्याच्या चिटणिशीचे काम अगदी चोख रीतीने पार पाडलं. आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या, बुद्धिमत्तेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची अनेक कामे तडीस नेली. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराज असताना बाळाजींनी आपल्या चातुर्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे जे कसब दाखवले त्याला तोड नाही. पण दुर्दैवाने, गैरसमजुतीतून संभाजी महाराजांनी बाळाजींना, त्यांचे बंधू शामजी आणि मुलगा आवजी ह्यांना हत्तीच्या पायी दिले. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या हातून मोठी चूक घडल्याचं लक्षात येताच खूप पश्चाताप झाला. संभाजी महाराजांनी नंतर औंढा-पाली-सुधागड येथे जाऊन बालाजीची छत्री समाधी उभारली. त्यांचा मुलगा खंडो बल्लाळ ह्याला स्वराज्याची चिटणिशी दिली.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
信息
- 节目
- 频道
- 频率一周一更
- 发布时间2022年2月27日 UTC 14:47
- 长度11 分钟
- 季3
- 单集2
- 分级儿童适宜