लालमपऱ्या आणि संगणेश Lalamparya Aani Sanganesh
बालमित्रांनो, तुम्हाला रोजच्या अगदी भरगच्च वेळापत्रकामुळे वैताग आला असेल ना ! तुमची मनाची मेमरी रिफ्रेश करायला ऐका हा छानसा कवितांचा संग्रह. निसर्ग, पर्यावरण, डोंगर-दऱ्या, चिमण्या-कावळे, पशुपक्षी अशा तुमच्या आवडत्या विषयांबरोबरच 'पाठीवरचे थोर दप्तराचे ओझे, पाहुनिया त्याला गाढवही लाजे' अशा आजच्या काळातील तुम्हा विद्यार्थ्यांची वेदना या कवितांमधील शब्दातून व्यक्त झालीये. त्याच बरोबर स्वप्न आणि गोष्टी मधली परिराणी चेटकीण हि आहे. झुक झुक गाडी अन थंडीची कूडकुडी ही तुम्ही यातून अनुभवालच. पण मोबाईल साठीचा हट्ट ही तुम्हाला वाटेल जणू आपणच करतोय !श्रीगणेशाच्या आगमनाचं किती कौतुक असतं ते कुणीही शब्दात सांगू शकणार नाही. पण ज्ञानरूपी गणेश-संगणेश म्हणजे तुमचा लाडका 'कम्प्युटर' त्याचा उंदीर रूपी माऊस वाहनासह तुम्हाला इथं भेटेल !... आणि मग तुम्ही अभ्यासासाठी रिफ्रेश व्हाल ! दिलीपराज प्रकाशन तर्फे या कविता तुमच्यासाठी घेऊन आल्या आहेत शोभाताई बडवे म्हणजेच लग्नाआधीच्या शोभाताई चिंधडे. या कवितांना स्वरबद्ध केलय गौरी कुबेर यांनी. या कवितांमधून तुमच्या मनातही संगीत रुंजी घालू लागेल. मग करा ऐकायला सुरुवात !
Episodes
- 9 Episodes
Shows with Subscription Benefits
About
Information
- Channel
- CreatorVoicemantra
- Years Active2K
- Episodes9
- RatingClean
- Show Website
- Provider
More From Bingepods
- Places & TravelUpdated Weekly
- FictionUpdated Weekly
- InvestingUpdated Weekly
- FitnessUpdated Weekly
- HistoryUpdated Weekly
- RelationshipsUpdated 12/21/2024
- BooksUpdated 04/20/2022