मनDay with Anagha

Swayam Talks

दोन दिवसांच्या मस्त सुट्टीनंतरचा पहिला वार म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे कामाची चिंता, सोमवार म्हणजे काळजीचा गुंता. अशा या Monday Blues पासून दूर घेऊन जात आपल्याला Positive Energy चा एक झक्कास डोस द्यायला येतेय अनघा मोडक एका नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीजमधून. आता प्रत्येक सोमवारी न चुकता ऐका ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या नव्या आठवड्याची सकारात्मक सुरुवात करा. अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो.

Episodes

  1. Kailash Katkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha

    12/03/2023

    Kailash Katkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा | Manaday with Anagha

    व्हायरसपासून संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे जगाला कोव्हीडनंतर चांगलेच कळले आहे! गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कॉम्प्युटरचे व्हायरसपासून रक्षण करणारे Quick Heal कसे निर्माण झाले, त्याची सुरुवात कशी झाली व मिळालेले यश त्यांनी कसे टिकवले याविषयी Quick Heal चे संस्थापक-CEO कैलाश काटकर सांगतात. कंपनीबरोबरच आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याविषयी त्यांच्या पत्नी अनुपमा काटकर सांगतात. कॅलक्युलेटरच्या दुरुस्तीपासून ते कॉम्प्युटरच्या तंदुरुस्तीपर्यंतचा त्यांचा प्रवास ते सांगत आहेत या व्हिडीओ पॉडकास्टमधून! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message

    1h 40m
  2. Madhurani Gokhale Prabhulkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 1 | Manaday with Anagha

    11/06/2023

    Madhurani Gokhale Prabhulkar | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 - Ep 1 | Manaday with Anagha

    आई कुठे काय करते?' मालिकेमधून 'अरुंधती'च्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली मधुराणी खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीसोबतच कवयित्री, गायिका, संगीतकार आणि एक उत्तम रसिक आहे! 'आई' या भूमिकेविषयी बोलताना स्त्रीच्या भावनांचा पटच जणू ती उलगडते. लहानपणापासून लाभलेलं कलासक्त वातावरण, कलेविषयीचं प्रेम आणि उत्सुकता, जिद्दी वृत्ती याविषयी मधुराणी मोकळेपणाने सांगते. तिच्या मुलीशी असणाऱ्या तिच्या नात्याचे पैलूही ती उलगडते. या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया कलाकार, माणूस आणि स्त्री म्हणून समृद्ध होण्याचा मधुराणीचा संवेदनशील प्रवास! #anaghamodak #madhuraniprabhulkar #arundhati #marathipodcast --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message

    1h 11m

About