Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle

Pratik Takle

आपल्या धकाधकीच्या जीवनातून २ मिनिटे वेळ काढून थोड्यावेळ जर वेगळा विश्वात नेण्याचा प्रयत्न. कधी प्रेम, कधी नाती, कधी उपदेश तर कधी विद्रोह, पण भावना पोहचणार यायची शाश्वती! कविता, गझल, गोष्टी आणि बरंच काही!! आपल्याला जर आवडली तर नक्की इतरांना ही share करा

  1. 08/22/2024

    The Chronicles of Honest Self-Communication

    At the end of the day, the most crucial conversation I have is the one with myself. You know! we know OUR REALITY better than anyone else. When you strip away the layers and stand at ground zero, facing the mirror, there’s no escaping the truth. You are aware of your choices, your actions, and the reasons behind them. You even have a sense of the potential outcomes. That’s why it is vital to communicate with yourself honestly. It’s easy to get lost in the fantasies of a fairytale world, but life demands that we stay GROUNDED IN REALITY. The universe may have its balance and destiny may play its part, but on a basic level, YOU KNOW WHO YOU ARE. You know when you are not being TRUE TO YOURSELF or others - whether you’re procrastinating, lying, or hiding something. While others may offer their opinions or even give you a “CHARACTER CERTIFICATE,” only you know the truth of your character. If that external judgment doesn’t align with who you truly are, it doesn’t matter. What truly matters is that you remain honest with yourself, even when it’s UNCOMFORTABLE.FALSE HOPES are dangerous, especially when you know deep down that you are not prepared or capable of achieving them. It’s essential to recognize YOUR LIMITS and work within them. The world is complex, with countless elements interconnected, influencing each other in ways we might not fully understand. However, the one thing you can control is YOUR RESPONSE to the world around you. Focusing on what you can control, rather than what you can’t, is the key to PERSONAL GROWTH AND PEACE. Ultimately, everything falls into place when you approach life with SINCERITY. The equation of life balances out when you take responsibility for your actions and decisions. The UNIVERSE WITHIN YOU is powerful, and being truthful in your self-communication is how you harness that power. So, as you end your day, remember to be honest with yourself, because that honesty is the foundation upon which everything else is built. Good night. 🌟#SelfAwareness #HonestLiving #PersonalGrowth #InnerPeace

    The Chronicles of Honest Self-Communication
  2. 08/20/2024

    उस रात की यादें आज भी मेरे साथ हैं

    उस रात की यादें आज भी मेरे साथ हैंवो भीनी-भीनी सांसों की खुशबू वो पानी की बूँदों से भीगी पलकें वो हल्का सा बिखरा हुआ काजल वो बहती नदी जैसे पानी-पानी हुई कमर वो बस एक उलझी सी बात है उस रात की यादें, आज भी मेरे साथ हैं वो आख़िर रात जब हम मिले थे वो आख़िर लम्हा जो हमने साथ गुज़ारा था वो आख़िर पल जिस पल मेरे लबों पर लब थे तुम्हारे वो आख़िर अलविदा जिसके बाद मैं कभी रोया नहीं उस मंज़र की गवाह सारी कायनात है उस रात की यादें आज भी मेरे साथ हैं हो सकता था शायद हमारा फिर से मिलना हो सकता था शायद गुलदानों में फूलों का फिर से खिलना खिल सकती थी हमारे चेहरों पर मुस्कुराहट मिल सकती हर सुबह सिरहाने तुम्हारी आहट आज भी वही पर ठहरे सारे मेरे जज़्बात हैं उस रात की यादें आज भी मेरे साथ हैं संभाले हैं सारे खत आज भी तेरे चाहे वो कभी वो हो ना सके मेरे टूटी हुई आशिक़ी और टूटा हुआ ये दिल है सांस लूं या ना लूं यही मुश्किल है ना ज़िंदा हूँ ना मर चुका ऐसे मेरे हालात हैं उस रात की यादें आज भी मेरे साथ हैं

    उस रात की यादें आज भी मेरे साथ हैं
  3. 08/20/2024

    तसा मी बरा आहे!

    हो!तसा मी बरा आहे... फक्त काल परवा बसलो होतोजुन्या जखमेची खपली कोरत!काय करणार? आता रक्त पाहिल्याशिवाय रात्र रात्रीसारखी भासत नाही.. कधी कधी सुऱ्याने वार करतो स्वतःवरच, मग वण उठतात कधी हातावर, मानेवर तर कधी छातीवर!रोज ह्या घरात, काही ना काही पडतं असतं, तुटतं असतं!आणि शोकांतिका ही ते उचलायलाजोडायला साला कोणी येतचं नाही... कालच्या दिवशी कंदील फुटला,काचा पसरल्या - रुतल्या तरी अजून सगळं तसंच पडून आहे!मागच्या आठवडी "तो" आलेला,तोंडावर महिन्याचे पैसे फेकून निघून गेला...तो ही काय करणार म्हणा,त्यालाही ह्या दुनियेसमोर खोटं-खोटं हसत जगावं लागतं!पण माझं बरंय! ना कोणी विचारायला येतं, ना कोणी काळजी घ्यायला!ना प्रेम करायला, ना जवळीक साधायला!ना सुखं सांगायला, ना दुःख वर्तवायला!ना कुशीत घ्यायला, ना अंगाई गायला!ना माफी मागायला, ना प्रेम करायला!हा पण, अधून मधून त्याला विचारता,एक दोन जण त्याचा हाल-हवाल... तो ही तसंच नेहमीसारखं खोटं-खोटं हसून "ठीक आहे" सांगतो!आलेला तो त्या दिवशी अन सांगून गेला, अजून एक नातं तुटलं म्हणे,मग काय! मला निम्मीतच भेटलं,पून्हा जुनी जखम कोरायला... खपली तुटली, रक्त वाहू लागलं तर बिचारा घाबरला आणि निघून गेला.. फक्त जाता जाता त्याने विचारलं,"कसा आहेस?" आणि मी उत्तरलो,"तसा मी बरा आहे... फक्त काल परवा बसलो होतोजुन्या जखमेची खपली कोरत!"

    तसा मी बरा आहे!
  4. 08/16/2024

    फक्त आणि फक्त शांततेची

    सरते शेवटी छोट्या मोठ्या गोष्टींना तोंड देत मी अश्या ठिकाणी येऊन पोहचतो कि तिथे मला कोणत्याचं गोष्टीचं किंवा प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याची ताकद नसते. त्यावेळी, मनात चाललेल्या विचारांचा गदारोळ शांत करता येत नसतो. थकून जातो! काही सुचत नसतं. कसलीच ऊर्जा नसते अंगात, अगदी स्वतःशी संवाद करायचीसुद्धा! आणि मग असेच कितीतरी दिवस जातात शांतपणे, काहीच न बोलता. विचारांनी गोंधळलेला जीव त्याच्या चकव्यामध्ये अडकलेला असतो. कोणावरही कसलीही जबरदस्ती लादता येत नाही. अनेकदा मनात असा विचार येतो की "नेमकं कोणी आहे का?", "कोणी समजणार का?", "समजलं आणि कळालं तर ते वळणार का?" आणि अशीच विचारांची अतिशयोक्ती होते. त्यालाच इंग्रजीत काय ते "ओव्हर र्थिंकिंग" म्हणतात म्हणे. एखादी गोष्ट एवढी तानली जाते की नंतर ती संभाषणात असावी-नसावी याने काहीच फरक पडत नाही. उदाहरणार्थ जसा उसाचा रस काढल्यावर चोथालाही चोखून बघतो तसंच काहीतरी होतं. पण या उलट काही इसमांची बाजू दुसरी असते, त्यांना कशाशीच "मतलब" नसतो. ते त्यांचा रस पिऊन मोकळे झालेले असतात, चोथा असू दे नसू दे ते तिथून निघून जातात. कोणती बाजू चुकीची? कोणती बाजू बरोबर? या तर्कट ते पडत नाहीत. आणि मग "अतिशयोक्ती विचार" करणारे लोक त्यांना "वरवरचं जीवन जगतात" असं म्हणतात. आता, प्रत्येकाची जीवन जगण्याची एक वेगळी शैली असते. "कोणती बरोबर","कोणती चुकीची" हे कोण ठरवू शकतं? शेवटी काय आहे ना! "आयुष्य" हा एक खेळ असतो. तो कसा खेळायचा? कोणासोबत खेळायचा? किती वेळ खेळायचा? हे जो-तो ज्याचं-त्याचं ठरवतो. आणि ह्या खेळात "स्वार्थ" हा येतोच! तस निस्वार्थी राहणं हे खूप अवघड आहे. हा, आपण असलेल्या स्वार्थाची तीव्रता तेवढी कमी-जास्त करू शकतो. तसं पाहायला गेलं तर साधं-सरळ जीवन जगणं हे खरच सोपं आहे. त्यात कोणाच्या काही फंदात नाही पडायचं, आपलं आपलं काम करायचं, आपले आपले नियम पाळायचे आणि आपली काळजी घ्यायची. पण कसं आहे ना, ह्या व्यवस्थित आणि साधेपणाने जीवन जगत असतानांसुद्धा, बऱ्याच गोष्टींचा ताण सहन करावा लागतो. जसं की, एवढे पैसे पुरतील का? एखादी गोष्ट व्यवस्थित होईल का? आणि ती नाही झाली तर परिणाम त्याचे काय होतील? एखादा इसम आपल्या आयुष्यातून गेला तर काय होईल? हे कसं संभाळू? होणाऱ्या बदलांवर विश्वास कसा ठेवू? अश्या बऱ्याच गोष्टी. आणि शेवटी मग थकून जातो, एवढं सगळा विचार करून आपण शांतपणे बसतो. आणि एक वेळ अशी येते की फक्त शांतता हवी असते. प्रेम नको, वस्तू नको, वासना नको, जवळीक नको. अभिलाषा असते ती फक्त शांततेची... "फक्त आणि फक्त शांततेची!"

    फक्त आणि फक्त शांततेची
  5. 08/16/2024

    कोण्या जुन्या जखमेचे घाव

    आणि मग एखादया रात्री,कोण्या जुन्या जखमेचे घाव हिरवे होतात !खपल्या गळून पडतात... रक्त वाहू लागतं!वेदना असह्य होते!मनात विचारांचं काहूर माजतं!अस्वस्थता थांड मांडून बसते,उत्तर न मिळालेले प्रश्न,पुन्हा डोकावू लागतात!सगळं काही छिन्न-विछिन्न होतं,समजवायला कोणीच नसतं,हात पकडायला कोणीच नसतं,घट्ट मिठी मारायला कोणीच नसतं... आपण चालत जातो फक्त,माहित नसलेल्या वाटांवर... विश्वासघाताची पिशाच्च तिथे दबा धरून बसलेली असतात!आणि तीच बसतात मग, आपल्या मानगुटीवर येऊन!गळाघोट करता आपला त्यांच्या विश्वासघाताने... कोलमडून पडतो आपल्यातला जीव... काहीच अस्तिव राहतं नाही त्याचं!नसा-नसा कापल्या जातात,आतडी-काडती रक्तभंभाळ होते,हाडं-काडं बाहेर येतात,खोबणीच्या बाहेर डोळे लटकतात!आणि "हृदय" तडफडत-तडफडत बंद पडतं.. हे असच होतं जेव्हा... आणि मग एखादया रात्री,कोण्या जुन्या जखमेचे घाव हिरवे होतात !- प्रतिक

    कोण्या जुन्या जखमेचे घाव
  6. 08/12/2024

    ह्या अंतहीन दुःखाच्या गाभाऱ्यातून!

    आणि मग सगळी बंधने तोडून बाहेर पडतो तो, ह्या अंतहीन दुःखाच्या गाभाऱ्यातून! झालेल्या वेदनांचे घाव लपवत-लपवत, रक्तभंबाळ झालेल्या खपल्यांना मलम लावतं! खोलामध्ये घुसलेल्या कट्यारी-तलवारी उपसून काढतं, आणि झालेल्या नुकसानाचा हिशेब करतं! जीर्ण झालेल्या मनाला मग त्याला, देवाच्या अस्तित्वाचे धडे द्यावे लागतात! सांगावं लागतं की "उद्या आपण जिंकणार" "उद्या निवांत झोप येणारं" "उद्या रक्त दिसणार नाही" आणि "उद्या किंचाळ्या ही फुटणार नाही" पण हा उद्या आजवर आलंच नाही! आजवर होताच आहेत, लढाया, युद्ध आणि रणसंग्राम! स्वतःशी, अस्तित्वाशी आणि दुःखाशी.. अशी, जिंकणार असतो लढाई आणि तितक्यात, तितक्यात, समोर येतात पिशाच्च, दाणवं, शत्रू... मोडून टाकतात सगळा रचलेला चक्रव्यूह, कापून-कापून, लख्तर-लख्तर करतात त्याच्या लढणाऱ्या सैनिकांना! छाटून टाकतात त्यांची मुंडकी आणि पुन्हा टाकून देतात त्यांना त्याच दुःखाच्या आणि पिडेच्या नरकामधे.. सरतेशेवटी, चितांची गर्दी एवढी होते कि मोजता येतं नाही.. जळत राहतात त्या दिवसेंदिवस... कौटी फुटायचे आवाज सुद्धा घंटानादासारखे वाटतात! आणि तेव्हा शरीर सोडून संचार करायला मोकळे होतात ते त्यांचे आत्मे... आणि मग सगळी बंधने तोडून बाहेर पडतो तो, ह्या अंतहीन दुःखाच्या गाभाऱ्यातून! - प्रतिक

  7. 07/27/2023

    Self-Worth and Healing: Finding Strength after Betrayal

    Why did this happen to us? In certain periods of life, we come across people whom we love dearly. We share a special bond with them and have a unique attachment. They become an integral part of our lives, and we confide in them about every detail of our day. We develop spiritual connections with them. However, at some point, they unexpectedly leave without any explanation, leaving us puzzled and hurt. We start questioning ourselves, thinking that something is wrong with us, that we might be a bad person. This self-doubt can lead to feeling inferior about our choices and thoughts, ultimately affecting our mindset and turning us into toxic individuals. This situation is not ideal. The reason behind such behavior can be complex and varied. People might leave due to personal issues, changes in priorities, or even their own emotional struggles. Sometimes, they might not even fully understand why they made the decision to leave. To cope with this situation and heal, it's essential to recognize that their departure may not be about our worth or actions. It's crucial to prioritize our own well-being and self-worth, understanding that we can't control others' actions. Focus on self-improvement and building a strong sense of identity independent of others' opinions. Surround yourself with supportive and caring individuals who value you for who you are. Healing takes time, so be patient with yourself during the process. Embrace self-compassion and remember that we all face challenges and experiences that shape our lives. By focusing on growth and learning from the situation, you can move forward positively and avoid becoming a toxic person.

    Self-Worth and Healing: Finding Strength after Betrayal

About

आपल्या धकाधकीच्या जीवनातून २ मिनिटे वेळ काढून थोड्यावेळ जर वेगळा विश्वात नेण्याचा प्रयत्न. कधी प्रेम, कधी नाती, कधी उपदेश तर कधी विद्रोह, पण भावना पोहचणार यायची शाश्वती! कविता, गझल, गोष्टी आणि बरंच काही!! आपल्याला जर आवडली तर नक्की इतरांना ही share करा