Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका

  1. EP 67 - Find Your 'Why'

    05/26/2024

    EP 67 - Find Your 'Why'

    भाग ६७ Find Your 'Why' Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ? ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे. पण त्यांनी हे कसं केलं ? सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे म्हणणे आहे, की ‘आपण कुठलीही गोष्ट ‘का’ करतो हे आधी माहिती हवं आणि मग ती कशी करायची हे आपण, आपणहून शोधून काढतो. त्याने बऱ्याच व्यावसायिक संस्थांचे उदाहरण त्यात दिले आहेत, जसे अँपल. अँपलला कल्ट फॉलोइंग आहे. त्याची काय कारणं आहेत याबद्दल विस्तृतपणे पुस्तकात दिले आहे, पण मुख्य मुद्दा हाच आहे की, कुठलंही काम करायच्या आधी आपल्याला आपण ते का करतो आहे, हे माहिती हवं. आपल्याला ‘का’ करायचं हे माहिती असलं की काय आणि कसे हे आपण शोधून काढतो. त्याने जी उदाहरणे दिली आहेत, ती सगळी अमेरिकन असल्यामुळे मी आपल्या उदाहरणांना हे लागू होतंय का याचा विचार करून बघितला आणि ते अक्षरशः खरं आहे, असं माझ्या लक्षात आलं. आजच्या भागात त्या बद्दल थोडा ऊहापोह केला आहे.

    11 min
  2. EP 63 - अडचणींवर मात करतांना

    05/04/2024

    EP 63 - अडचणींवर मात करतांना

    नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२० ह्या दिवशी माझे हात थरथरत होते, खूप भीती वाटत होती, त्या सिटूएशन पासून, अँपल पॉडकास्ट च्या चार्ट वर १ नंबर वर येणे, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड मिळणे, दोन पुस्तक प्रकाशित होणे हा सगळा प्रवास भन्नाट होता. इन्स्पिरेशन कट्टा वर परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसोबत गप्पा करायला लवकर भेटणार आहोत, पण त्या आधी आपल्या जुन्या एपिसोडचा रिकॅप बघुयात, म्हणजे तुम्ही एखादा एपिसोड ऐकला नसेल तर त्यातला सार इथे मिळेल. ह्या सिरीयस चा हा पहिला एपिसोड.

    10 min
  3. EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant

    11/24/2023

    EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant

    कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुलांवर चिडचिड आणि मानसिक आजार ह्या पर्यंत होतो. ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटायला सुरवात होते ना कि हे काम माझ्या साठी नाही, त्या वेळेलाच ह्या सगळ्याची सुरवात कदाचित झालेली असते. पण आपण ते सहन करत राहतो आणि एक दिवस ज्याला टिपिंग पॉइंट म्हणतात तिथे येऊन आपण पोहचतो. त्यापुढे सहन करत राहणं ह्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण आपल्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात. टिपिंग पॉइंट पर्यंत पोहचण्या आधीच आपण बाहेर पडू शकतो का? स्वतः साठी वेगळे पर्याय शोधू शकतो का? कुठलं काम आवडत आहे ह्याचा शोध आधीच घेऊन ठेऊ शकतो का ? comfort zone च्या बाहेर पडायला काय लागत ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न ह्या भागात आपण केला आहे. आजची आपली पाहुणी शरयू सावंत हि अनेक वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन आता स्वतः एक लाईफ कोच बनली आहे आणि ती लोकांना आणि विशेषतः महिलांना करिअर आणी व्यवसायासंबंधी कोचिंग करते. Instagram: https://www.instagram.com/iamsharayusawant PODCAST LINK: Apple Podcast: https://apple.co/3g9fekx Spotify: https://spoti.fi/3gpYdS5 FREE EBBOK: 'EMBODIED SUCCESS' The Art of Overcoming Limitations & Stress to Achieve Greater Success & Abundance https://go.sharrayu.com/ebook-optin पुस्तकं विकत घेण्यासाठी लिंक्स जो जे वांछील - https://amzn.to/3QVShUq पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया - https://amzn.to/49DUj2X ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी

    51 min

Trailer

About

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका

More From मी पॉडकास्टर | Mi Podcaster