Er Priti More

Priti More

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल. या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे. मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता https://www.youtube.com/@PritiMore धन्यवाद!

  1. 01/15/2023

    श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹

    *🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹*   *आजचा फकीर हा उद्याचा राजा होऊ शकतो आणि आजचा आजचा राजा उद्या भिखारी होऊ शकतो*  अरे स्वामीनंवरचा विश्वास उडवुन जाऊ देऊ नकोस* *मनात कदापि हा विचार आणू नकोस स्वामी नाहीत* *अरे ज्याच्या अज्ञेशिवाय झाडाचे पान सुध्दा हालत नाही मग कशामुळे आपण असे म्हणायचे स्वामी नाहीत ते अरे संपतील रे तुझे ही,दुःख अडचणी होईल रे सर्व ठिक झाले गेले सर्व विसरून जा मनापासुन स्वामीनंचरणी शरण जा मनापासून त्यांना विनंती कर मनोभावे सेवा सुरू कर स्वामीनंवरील विश्वास भक्कम कर अरे नक्कीच तुझे सर्व प्रश्न ,दुःख ,अडचणी संपल्या जातील ब्रम्हांड नायक कोणतेही संकट थोपवु शकतात मग आपले दुःख ,संकट त्याच्या पुढे काय होईल रे सर्व ठिक काळजी नको रे करू*

  2. 08/06/2022

    सुंदर विचार

    खुप छान नक्की वाचा . .✍✍🏼 ⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 📃✍🏼 *नारायण मूर्ती* . . ⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. 📃✍🏼- *स्वामी विवेकानंद*✨ . . ⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- 📃✍🏼 *विश्वनाथन आनंद*⚡ . . ✍🏼⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍🏼 *धीरूभाई अंबानी* . . ✍🏼⚡5) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. 📃✍🏼-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡ . .✍🏼⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... 📃✍🏼 -- *डाॅ. अब्दुल कलाम* . .✍🏼⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. 📃✍🏼 - *बिल गेट्स* . . ✍🏼⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. 📃✍🏼 - *कल्पना चावला* . .✍🏼⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. 📃✍🏼-- *बराक ओबामा* . ✍🏼⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. 📃✍🏼 -- *आयझॅक न्यूटन* . . ✍🏼⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. 📃✍🏼 -- *सर्वपल्ली राधाकृष्णन*

  3. 08/05/2022

    स्त्री सूक्त माहात्म्य

    *।। श्री स्वामी समर्थ ।।* 🪷 *श्रीसूक्त महात्म्य* 🪷 श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या परिशिष्टात समाविष्ट आहे. यामध्ये मूळ १५ ऋचा, १ फलश्रुतीची ऋचा आणि शिवाय १ स्वतंत्र फलश्रुती आहे. या स्वतंत्र फलश्रुतीमध्ये ९ ऋचा व १ लक्ष्मी-गायत्री यांचा समावेश आहे. श्री मध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या सर्व गोष्टी मानवाच्या समृद्ध जीवनाला आवश्यक आहेत. आयुष्य भरपूर आहे परंतु निरोगी नाही, निरोगी आहे परंतु पुत्र नाही, धन नाही, वाडवडील लवकर निवर्तले, सत्ता कोठेही नाही असे असले तर माणसाला जिणे नकोसे होईल. श्री मध्ये या गोष्टींचा समावेश आहे. व्यवहारात लक्ष्मी म्हणजे पैसा, असा अर्थ आहे पण तो श्री या पदाचा मात्र नाही ! श्री या एका पदामध्ये ज्या गुणांचा किंवा वैभवाचा समावेश आहे त्याबद्दल फलश्रुतीमध्ये एक ऋचा समाविष्ट आहे ती पुढील प्रमाणे :- *श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ।* *धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।* या सुक्ताचे ऋषी :- लक्ष्मी, आनंद, कर्दम, चिक्लीत आणि इंदिरासुत असे आहेत. या सुक्ताची देवता लक्ष्मीनारायण असे मानण्यात येते. श्रीसूक्ताचा उपयोग संसारी आणि पारमार्थिक जीवनात कसा करावा हे माहीत असणे आवश्यक ठरते. हे सूक्त साधकाला पैसा प्रदान करते अशी समजूत असली तरी केवळ पैशाच्या प्राप्तीसाठी या सुक्ताचा पाठ करणे उचित नाही. *प्रापंचिक ऐश्वर्याच्या मागे जी पारमार्थिक समृद्धी दडली आहे त्याचा विचार करणेही योग्य ठरते.* श्री या पदाच्या विस्तारात ऐश्वर्याची स्वामिनी म्हणून महालक्ष्मी गौरविली जाते. या अंबामाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवतेचे स्थान म्हणजे कोल्हापूर ! भक्तांचे आर्त पूर्ण करण्यासाठी ती त्या ठिकाणी प्रदीर्घकाळ तिष्ठत आहे. सामान्य साधकासमोर मूर्ती असल्याशिवाय उपासना होत नाही. म्हणून प्रारंभिक अवस्थेत मूर्ती समोर ठेवून पूजा - प्रार्थना केली जाते. या सर्व उपासनांचा केंद्रबिंदू महालक्ष्मी, श्रीसूक्त किंवा श्रीयंत्र हे आहेत ! मंत्र, तंत्र आणि यंत्र हे तीन उपासनेचे भाग आहेत. १५ ऋचांपर्यंत श्रीसूक्ताचा पाठ केला जातो. या पुढील ऋचा फलश्रुती म्हणून गणली जाते. जो कोणी नियमितपणे नित्य श्रीसुक्ताच्या १५ ही ऋचांचा पाठ करील अगर तुपाच्या साहाय्याने मंत्रांच्यायोगे हवन करील त्याला सर्वसंपन्नता प्राप्त होईल. प्रापंचिक सुविधा लाभावी म्हणून मानवाचा प्रयत्न चालू असतो परंतु यासाठी माणूस जे प्रयत्न करतो त्याचे अधिष्ठान परमेश्वर असते. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा हा एक स्वतंत्र मंत्र आहे. श्रीमद् भागवतगीता, सप्तशती या ग्रंथातील प्रत्येक श्लोक जसा स्वतंत्र मंत्र आहे तसे श्रीसूक्ताच्या १५ ऋचांचे आहे. *मंत्राच्या व्यावहारिक अर्थापेक्षा पारमार्थिक अर्थ आणि त्यापेक्षाही त्या मंत्रातील अक्षरांच्या उच्चारामुळे निर्माण होणारे नादतरंग यांचे परिणाम सूक्ष्म आणि प्रभावी आहेत.* श्रीसूक्त जसे प्रापंचीक सुविधा प्राप्त करून देते तसेच पारमार्थिक वैभवही देते. पारमार्थिक उपासनेत त्या देवतेची भेट होणे महत्त्वाचे असते. *देवासाठी निर्भेळ उपासना करणारा उपासक क्वचित आढळतो. या उपासनेने प्राप्त होणारे फळ कायम टिकणारे असते. एवढेच नाही तर त्या उपासनेचा फायदा पुढील पिढीलाही मिळतो.* जेथे सौंदर्य, विद्वत्ता, सत्ता, चैतन्य आहे तेथे या देवतेचे वसतीस्थान आहे. साधकाच्या अंतःकरणातील स्फूर्ती या देवतेचे वसतीस्थान आहे. शूचिर्भूत झाल्यावर या उपासनेला प्रारंभ करावा. त्यात ध्यान महत्त्वाचे ठरते. देवीची मूर्ती हृदयात निर्माण करून तिची प्रतिष्ठा करावी. श्रीसूक्ताच्या एकेका मंत्राने मनाने तिची पूजा करावी. *१६ आवर्तने रोज करावी* त्यायोगे मनावर उत्तम प्रकारचे सुसंस्कार घडून सद्गुण अंगी वाढू लागतात. सांसारिक लिप्तता कमी होते. पारमार्थिक बंधता आवडू लागते. *यामधील महत्त्वाचा अडथळा म्हणजे मी उपासक आहे हा अहंकार निर्माण होणे. तो अधोगतीला नेतो म्हणून याकडे दुर्लक्ष करावे.* सिद्धींचा त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वतःच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. यामध्ये दुसऱ्यासाठी काही करणे चूक ठरते. उदा. ब्राह्मणाकडून जप करून घेणे या व्यवहाराला या उपासनेत स्थान नाही. चैत्र, अश्विन, पौष या महिन्यांमध्ये देवीची उपासना केली जाते. *- अक्कलकोट स्वामीदर्शन, दिवाळी अंक २००१ मधून साभार.* 🚩🙏📿 *श्री स्वामी समर्थ* 📿🙏🚩

  4. 07/13/2022

    स्वामी सेवेकरी म्हणून जगण्यासाठी

    *स्वामी सेवेकरी म्‍हणून जीवन जगण्यासाठी* ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा. ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या. ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. ☞ (०४) आभार मानायला विसरू नका. ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. ☞ (०६) सतत हसतमुख रहा. ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. ☞ (११) कृती पुर्व विचार करा. ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा. ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. ☞ (१७) विचार करून बोला. ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* _कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻* *हा जन्म पुन्हा नाही...😊* विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏 कृपया वेळ काढून नक्की वाचा. *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की .... 👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात *"हितचिंतकांची"* आणि *"निंदकांची"* आवश्यकता आहे.... आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........ कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. 🐾 👄बोलायच्या आधी….❕ 👂ऐकायला शिका............❗ 🎁खर्च करायच्या आधी….❕ 💰कमवायला शिका.......❗ 📝लिहायच्या आधी ……❕ 😇 विचार करायला शिका....❗ हार मानण्याआधी.....❕ 👉 प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी .....❗ 👉 जगायला शिका......❕ 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. 🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे..... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... *" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"* 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 2:-"समाज" स्मशाना पर्यंत 3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त *"कर्म"* शेवट l पर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,* आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.* यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन...... *नक्की वाचा* *जन्म* : दूस-याने दिला ... *नाव* : दूस-याने ठेवलं ... *शिक्षण* : दूस-यांनी दिलं ... *रोजगार* : दूस-यांनीे दिला ... *इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ... *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... *आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती विचित्र आहे ना...?? माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा. 🙏🙏🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏

  5. 07/13/2022

    भगवंताची मिठी

    🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷 *भगवंताची मिठी...* *भगवंताचं होणं .......सोप्प नसतं हो भगवंताचं होणं...प्रचंङ निरागसता लागते...स्वच्छ मन लागतं.* *तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना.....* *कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा.......कुणाच्या यशात भक्कम साथ द्या.......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *कुणी कुणाचं नसतं हो.....तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा.....कुणाची ताई व्हा......कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ....मग बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना.....कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा....मग बघा..भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या.....थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.....मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल.* *आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय.....स्वतःच स्टेटस वाढवायचय्* *प्रत्येकाला....कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा....खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल....अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल....* *व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या....अन्न द्या....ते आमरस नाही हो मागत....तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात......कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *आपल्याकङे आपलं असं काय आहे? ....भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो......मग त्यानी दिलेलं .....कघी कुणाला मनापासुन द्या.......मग बघा* *भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही*

  6. 07/10/2022

    स्वामी कृपा म्हणजे काय?

    *स्वामी कृपा म्हणजे काय?* पैसा गाडी बंगला म्हणजे स्वामी कृपा नव्हे... आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात *ते टळलेले संकट म्हणजे स्वामी कृपा..!!* गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो *ते सावरणे म्हणजे स्वामी कृपा..!!* एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच *पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा..!!* कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, *ती ताकत म्हणजे स्वामी कृपा..!!* 'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते *ती उमेद म्हणजे स्वामी कृपा..!!* आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" *हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे स्वामी कृपा..!!* प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता *पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा..!!* पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे ते नसताना *आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे स्वामी कृपा..!!* *🌺।।जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🌺*

  7. 07/10/2022

    अन्न दानाचे महत्त्व

    *💢अन्नदानाचे महत्व महादान💢* १. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो. २. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. ३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. ४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. ५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. ६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. ७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. ८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे. ९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो. १०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो. ११. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते. १२. अन्नदाता परमात्मा आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव `सात्विक आहार' होय. १३. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो. १४. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. १५. भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात. ॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ! ! श्री स्वामी समर्थ ! !

About

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल. या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे. मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता https://www.youtube.com/@PritiMore धन्यवाद!