श्री.मनोहर वाघ सर (तालुका आय.टी.समन्वयक)

BRC SHIRPUR NEWS

BRC SHIRPUR RADIO

Episodes

  1. 07/19/2020

    🎙मा.ना वर्षाताई गायकवाड (शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा टीलिमिली मालिके बाबत चा स

    शालेय शिक्षण विभाग महा.राज्य.व एमकेसीएल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आपत्ती काळात सुरु होत असलेल्या टिलिमिली या सह्याद्री उपग्रह वाहिनी वरील शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित भागांच्या मालिकेचे प्रसारण होत आहे त्याबद्दल हा आजचा रेडिओ संदेश आपल्यासाठी देत आहोत हा संदेश सर्व विद्यार्थी पालक व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून सह्याद्री उपग्रह वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या टिलिमिली या मालिकेचे सर्व भाग सर्व इथेच या विद्यार्थ्यांनी बघावेत ही अपेक्षा निवेदन श्री मनोहर वाघ सर शिरपूर

  2. 07/09/2020

    📺शैक्षणिक बातमी : 20 जुलैपासून ऑनलाईन लर्निंग 1 ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ मालि

    📺 *शैक्षणिक बातमी : 20 जुलैपासून ऑनलाईन लर्निंग; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ मालिका भेटीला* 🌐‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने 20 जुलैपासून ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठय़पुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे शिक्षण मोफत देण्याचे ठरवले आहे. 📖 रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा 1 पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसांत 60 भागांद्वारे सादर केले जातील. सलग 10 आठवडे सोमवार ते शनिवार असे 6 दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. मालिकेचे आठही इयत्तांचे मिळून 480 भाग 20 जुलै ते 26 सप्टेंबर या कालावधीत प्रसारित केले जातील. 🕐 *मालिकेचे वेळापत्रक-* 👉🏼 वेळ : इयत्ता ▪️ सकाळी 7.30 ते 8 - आठवी ▪️ सकाळी 8 ते 8.30 - सातवी ▪️ सकाळी 9 ते 9.30 - सहावी ▪️ सकाळी 9.30 ते 10 - पाचवी ▪️ सकाळी 10 ते 10.30 - चौथी ▪️ सकाळी 10.30 ते 11 - तिसरी ▪️ सकाळी 11.30 ते दुपारी 12 - दुसरी ▪️ दुपारी 12 ते 12.30 - पहिली 🎤निवेदन:-श्री.मनोहर वाघ सर 9763236070

About

BRC SHIRPUR RADIO